बेभान झाले मराठे भुरळ घातली तक्ताने ..
महाराष्ट्राच्या नद्या वाहिल्या, काठ भरुन
आमच्या रक्ताने ..
छातीत भडकल्या ज्वाला, गनिमांच्या रक्ताने न्हाला ..
जाऊनी गगनाशी भिडला, होरपळुन काढले सुर्याला ..
औरंग्या सारखा पहाड लोटला छातीनं, लाथ मारुन
पाणीच काढले मराठ्यांच्या जातीनं ..
आभाळापुढं आधिकार गाजविला सह्याद्री पुढे हिमालय
झुकविला ..
भाले करुन गवताच्या पातीला मारुनथाप मांडीला ..
भिरभिरती डोळे गनिम पाहुन हात पिळविती मिशीला ..
आमच्या करारी नजरेला टक्कर नाही जगात
मराठ्यांच्या जातीला ..
आमच्या मातीत येऊन नडला तो आम्ही याच मातीत
गाडला ..
ज्यानं हात लावले मंदिराच्या कळसाला फाडुन फेकले
कोथाळ्याला ..
रन माजविला लाल महल बाटविला खान
कसा पळतांना तोडला ..
अशी कित्येकदा भाल्याची टेभें करुन आग
लावली आभाळाला ..
माय समजतो मातीला वाघच म्हणतात या जातीला ..
स्वताःच रक्त पाजलं आम्हीच तलवारीला
बायकाचं कुंकू पुसून रक्तानं भिजवलं याच मातीला ..
कैकांचा माज उतरवुन सह्याद्रीला साज चढविला ..
http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.
धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले
माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
Thursday, 21 February 2013
ईतिहास घडविणारे आम्ही मराठेऐसे जन्मीले ना कोठे
ईतिहास घडविणारे आम्ही मराठे
ऐसे जन्मीले ना कोठे
झुकविले त्या हिमालया
पुजतो आम्ही फक्त शिवराया
सहण होत नाही आम्हाला स्वराज्याशी फरेब
... जातिवंत मराठ्यांच्या छातित धडकतात
आऊसाहेब
अजुनही शरीरावर त्याच जखमा उभळतात
शंभु अठवला कि डोळ्यातले अश्रृ आपोआप
ढळतात
विसरलो नाहीत त्या लाखो मावळ्यांचे बलिदान
मराठयांला आजही वाटतो त्यांचा अभिमान
जिथे पडती पाऊल आमचे त्याच
ईतिहासाच्या वाटा
वाकत तर नाहीच पण मोडणार
हिनाही आता हा मराठा
चमकतात तेज तलवारीच्या धारा
दिशा बदलतो पाहुन आम्हाला वादळी वारा
मराठे आम्ही जगने आमचे ताठ आहे
आडवे जाण्याआधी विचार करा या मर्द
मराठ्यांशी गाठ आहे.
जय शिवराय..!!

शिवनाम हाच आमचा श्वास..
शिवनाम हाच आमचा श्वास..
शिवकार्य हाच आमचा ध्यास..
कारण इतिहासात रमायला आणि
सह्याद्रीत फिरायला आमच्या रक्तात
जन्मापासुन भिनलंय ..
जय जिजाऊ जय शिवराय
शिवकार्य हाच आमचा ध्यास..
कारण इतिहासात रमायला आणि
सह्याद्रीत फिरायला आमच्या रक्तात
जन्मापासुन भिनलंय ..
जय जिजाऊ जय शिवराय
कोणी नडत असेल तरत्याला मराठ्यांची जात दाखवा !!!
भवानी मातेचा लेक तो
मराठयाचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर
मुघलांचा तो बाप होता..
कोणी चुकत असेल तर
त्याला सत्याची वाट दाखवा..
कोणी नडत असेल तर
त्याला मराठ्यांची जात दाखवा !!!
जय भवानी !!
जय शिवाजी !!
जय महाराष्ट्र !!
मराठयाचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर
मुघलांचा तो बाप होता..
कोणी चुकत असेल तर
त्याला सत्याची वाट दाखवा..
कोणी नडत असेल तर
त्याला मराठ्यांची जात दाखवा !!!
जय भवानी !!
जय शिवाजी !!
जय महाराष्ट्र !!
स्फुतींचा जिवंत झरा
स्फूर्तिदाता : शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले,अशक्य
होते ते शक्य करून दाखवले,म्हणूनच शिवरायांचे चरित्र पुन्हापुन्हा सांगावेसे
वाटते आणि पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते.त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते.
मातृपितृभक्ती : शिवराय नेहमी मासाहेबांच्या आज्ञेत वागले.
मासाहेबांच्या सगळ्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या.शहजीराजांविषयी
त्यांच्या मनात अपार आदर होता.एकदा शहाजीराजे त्यांना भेटायला
आले.शिवरायांना खूप आनंद झाला.त्यांनी वडिलांना पालखीत
बसवले .त्यांचे जोडे आपल्या हातांत घेऊन पालखीबरोबर ते चालू
लागले.केवढी ही पितृभक्ति ! शहाजीराजे व जिजाऊ या थोर
मातापित्यांचे हिंदवी स्वराजाचे मनोरथ शिवरायांनी पूर्ण केले.
साधुसंतांचा आदर : शिवरायांची कुलदेवता भवानीदेवी .तिच्यावर
शिवरायांची अपार भक्ती होती.ते साधुसंतांना फार मान देत.त्यांना
मंदिरे प्रिय होती.त्यांनी माशिदिंचेही रक्षण केले.त्यांना भगवद्गीता पूज्य
होती.त्यांनी कुराआन शरीफचाही मान राखला.ख्रिस्ती लोकांच्या
प्रर्थानामंदिरानाही ते जपत.शिवराय विद्वानांचा आदर करत.परमानंद ,
गागाभट्ट ,धुंडिराज,भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला.
तसेच संत तुकाराम ,समर्थ रामदास ,बाबा याकूत ,मौनीबाबा इत्यादी
संताचाही त्यांनी बहुमान केला.सज्जनांना राखावे ,दुर्जनांना ठेचावे हा
शिवरायांचा बाणा होता.तो त्यांनी हयातभर पाळला.
स्वदेशाभिमान: शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते.धनदौलत
त्यांना कमी नव्हती,पण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा वीट आला.
आपल्या देशात आपले राज्य व्हावे,प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे
वागता यावे,सर्वांना सुखासमाधाने जगता यावे,मराठी भाषेला ,
स्वधर्माला मान मिळावा,यासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूंशी झुंज देऊन
स्वराज्य स्थापन केले,स्वदेश ,स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी
ते आयुष्यभर झटत राहिले आणि अखेर यशस्वी झाले.शिवरायांना
मायबोलीचा अभिमान होता.राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत,
यासाठी त्यांनी राज्यव्यवहारकोश हा ग्रंथ तयार करून घेतला.
हिंदवी स्वराज्य : हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते.
हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे ; मग ते कोणत्याही धर्मांचे असोत,
कोणत्याही जातीचे असोत,त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य .
शत्रू बलाढ्य होते,पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही .काळ
कठीण होता,पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही.बादशाहाच्या बाजूने
लाखो लोक होते,पण शिवरायांनी न्यायाची बाजू घेतली .बलाढ्य
परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाहीत.
शिवरायांचे आठवावे रुप: काळ्याकुटट अधांरात आपली
दिशा ठरवून वाट काढायची ; संकटे आली असता डगमगून न जाता
त्यांवर मत करून पुढे जायचे; बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने
झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे ; सहकाऱ्यांना उत्साह देत व
शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे –हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते.
आदर्श पुत्र,सावध नेता,कुशल संघटक ,लोककल्याणकारी प्रशासक,
हिकमती लढवय्या ,दुर्जनांचा कर्दनकाळ,सज्जनांचा कैवारी आणि एका
नव्या युगाचा निर्माता,असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी
तेजस्वी पैलू आहेत.हे सारे पाहिले,की पुन्हापुन्हा वाटते-
शिवरायांचे आठवावे रूप !
शिवरायांचा आठवावा प्रताप !!

रयतेचा राजा
रयतेच्या सुखासाठी : वडिलांकडून शिवरायांना केवळ लहानशी
जहागिरी मिळाली होती.या लहानशा जहागिरीतून त्यांनी ‘स्वराज्य’
निर्माण केले.लहानपणी त्यांनी लोकांचा छळ बघितला.त्यांनी लोकांना
जागे केले,स्वाभिमानी बनवले.त्यांनी लोकांची संघटना उभारली .
आपला जीव धोक्यात घातला व बलाढ्य शत्रूंचा पराभव करून
शिवरायांनी न्यायचे स्वराज्य निर्माण केले.त्या स्वराज्याची चोख
व्यवस्था लावली .त्यामुळे रयत सुखी झाली.
सेवकांवर माया : शिवरायांची आपल्या सेवकांवर मोठी माया
होती. बाजीप्रभूने देशासाठी मरण पत्करले ,शिवरायांनी त्यांच्या मुलांचे
संगोपन केले.तानाजीने देशासाठी आत्मबलिदान केले,शिवरायांनी
स्वत: त्याच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले.रायबाला आपल्या
मायेचे छत्र दिले.आग्र्याच्या कैदेत मदारी मेहतर याने आपला जीव
धोक्यात घातला,शिवरायांनी त्याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही.
प्रतापराव गुजर याने स्वराज्यासाठी आत्माहुती दिली.शिवरायांनी त्याच्या
मुलीचे लग्न आपल्या दुसरा मुलगा राजारामशी केले.अशा किती गोष्टी
सांगाव्या ! शिवराय राजे होते,पण आपल्या सेवकांची त्यांनी
पित्यासारखी काळजी घेतली .
रयतेचे रक्षण : शायीस्ताखान स्वराज्यावर चालून आला.त्या
वेळची गोष्ट.खानाची फौज पिके तुडवत,लोकांना त्रास देत,मुलूख
उद्ध्वस करत येऊ लागली .शिवरायांना प्रजेची चिंता वाटू लागली.
त्यांनी आपल्या सरदारांना लिहिले,तमाम रयतेला घाटाखाली पाठवा.
जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना पाठवा.आळस करू नका.या
कामासाठी रात्रीचा दिवस करा.गावोगावी फिरा.लोकांना आसरा मिळवून
द्या.मुघलांनी लोकांना कैद केले तर ते पाप तुम्हांला लागेल.
शिवरायांनी आपल्या प्रजेवर अशी मातेसारखी माया केली.
चांगले ते केले : जुन्यातील वाईट टाकून आणि चांगले
निर्माण करणे,हा शिवरायांच्या राज्यकारभाराचा विशेष गुण होता.
देशमुख ,देशपांडे,व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे.
त्यांना शेतकऱ्यांकडून शेतसारा ठरवून दिला.त्यापेक्षा जास्त वसूल करणाऱ्या
अधिकाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावल्या.वतनदारी पद्धत बंद करण्याचाही
त्यांनी प्रयत्न केला,
कारण ही पद्धत स्वराज्याला घातक आहे,असे
त्यांचे मत होते. सुभेदारापासून कामावीसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख
पगार देण्याची पद्धत त्यांनी सुरु केली.
कडक शिस्त : राज्यात कुठे काय चालले आहे,यांची शिवरायांना
खडनखडा माहिती असे,कारण त्यांचे हेरखाते चोख होते. फितुरीपासून
राज्याला धोका असतो, म्हणून शिवरायांनी फितुरांना कडक शिक्षा ठेवली
होती.त्यांची शिस्त कडक होती.सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये,
रयतेला लुटू नये अशी सैन्याला सक्त ताकीद होती.नियमांचा भंग
करणाऱ्यांना ते कडक शिक्षा करत.
दिलदार शिवराय: शिवराय पराक्रमाने थोर होते, तसेच मनानेही
मोठे दिलदार होते .त्यांनी स्वराज्याच्या कामी सर्व जातीजमातींना जवळ
केले.सर्व जातीजामातींतील लोकांना स्वराज्याच्या कारभारात त्यांनी स्थान
दिले.धर्म ,जात न पाहता माणसाची योग्यता पाहून ते त्यास नोकरीला
ठेवत.शिवरायांच्या आरमारी दलात कोळी,भंडारी होते तसेच
मुसलमानही होते.महार,रामोशी इत्यादी मंडळींनाही त्यांनी स्वराज्याच्या
कारभारात स्थान दिले होते.राज्यकारभाराचे काम त्यांनी ब्राम्हण व प्रभू
जमातींकडे सोपवले होते.शिवरायांच्या सैन्यात हेटकरी होते, मराठे होते,
तसेच मुसलमानही होते.त्यांच्या पायादळात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी
होता. त्यांच्या आरमारदलातील अधिकारी दौलतखान,सिद्दी मिसरी,
तसेच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते.ते सारे
स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते.
मोहिमेवर असताना शिवरायांना मासिदिंना उपद्रव दिला नाही.कुराआन
शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक
मुसलमानांकडे सोपवून देत.लढाईत हाती लागलेल्या कोणाही स्त्रियांच्या
अब्रूस त्यांनी कधीही धक्का लागू दिला नाही.
उदार धार्मिक धोरण :शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते.
कोणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत.कोणी धर्म बदलला,
पण पुन्हा त्याला स्वत:च्या धर्मात परत यावे असे वाटले,तर ते त्याला
दूर लोटत नसत.बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता.
तो विजापूरच्या आदिलशाहाच्या चाकरीत होता.आदिशाहाने त्याला
स्वत:च्या धर्मात घेतले.बजाजी विजापुरात राहू लागला.त्याला काही
कमी नव्हते,पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला
खाई.त्याला वाईट वाटे.एके दिवशी तो स्वधर्मात परत आला,.तेव्हा
शिवरायांनी त्याला दूर लोटले नाही,त्याला जवळ केले.नेतोजी पालकर
याची हकीकतही अशीच आहे.नेतोजी पालकर याचा धर्म बदलला,पण
नंतर त्याला स्वधर्मात येण्यासाठी इच्छा झाली ,तेव्हा शिवरायांनी त्याला
दूर लोटले नाही.त्याला स्वधर्मात घेतले.त्याची हकीकत अशी –
नेतोजी पालकर : नेतोजी शिवरायाचा सेनापती होता.तो मोठा
चपळ आणि शूर होता,नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात.लोक
त्याला ‘प्रतिशिवाजी’ म्हणत .एक दिवस शिवरायांवर रुसून नेतोजी
मुघलांना जाऊन मिळाला.शिवराया आगऱ्याहून निसटून महाराष्ट्रात आले,
त्या सुमारास मुघलांनी दक्षिणेत नेतोजीस पकडून बादशाहाकडे पाठवले.
बादशाहाने त्याला आगऱ्यास पाठवले.नेतोजी आगऱ्याला गेला.
बादशाहाने त्याला मुसलमान केले.नेतोजी पालकर आता मुहम्मद
कुलीखान झाला.तो बादशाहाची चाकरी करू लागला.बादशाहाने त्याला
काबुलच्या मोहिमेवर पाठवले.तेथे त्याने पराक्रम गाजवला.दहा
वर्षे लोटली.एकदा बादशाहाने दिलेराखानाबरोबर नेतोजीला शिवरायांवर
पाठवले.तो दक्षिणेत आला.नेतोजीचे धर्मांतर झाले असले,तरी
शिवरायांना व महाराष्ट्राला तो विसरला नव्हता.त्याला आपले पूर्व
आयुष्य आठवले.त्याचे मन उंचबळून आले.त्याच्या मनात स्वराज्याची
व स्वधर्माची प्रीती जागी झाली.एक दिवस मुघलांच्या छावणीतून निघून
तो थेट शिवारायांच्याजवळ आला आणि म्हणाला, “ मी परधर्मात गेलो,
पण मला आता स्वधर्मात यायचे आहे.मला नाही का पुन्हा स्वधर्मात
येता येणार? शिवराय म्हणाले ,का नाही ? तुमची इच्छा असेल ,
तर तुम्ही पुन्हा स्वधर्मात येऊ शकाल. नेतोजी विनवणी करून
शिवरायांना म्हणाला ,मग मला हिंदू धर्मात घ्या.
शिवरायांनी शास्त्रीपंडितांची बैठक भरवली .ते म्हणाले ,पंडितहो !
मला धर्मात ढवळाढवळ करायची नाही,पण नेतोजी पालकरांना पुन्हा
स्वधर्मात यायचे आहे.त्यांना दूर लोटणे हा धर्म नाही .त्यांना जवळ
घेणे हा धर्म आहे. शिवरायांनी नेतोजी पालकराला पुन्हा स्वधर्मात
घेतले.पुढे नेतोजीने पुष्कळ वर्षे स्वराज्याची सेवा केली.

शिवरायांची युद्धनीती
शिवरायांचे शौर्य व धैर्य : शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी
रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली.वयाच्या
पन्नासाव्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्या पस्तीस
वर्षांचा हा काळ ! या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व
मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापना केले.स्वराज्यासाठी ते
ह्यातभर लढत राहिले. अत्यंत कठीण प्रसंगी समशेर हाती घेऊन स्वत:
लढाईत उतरले आणि त्यांनी विजय मिळवले.त्यांचे आयुष्य
युद्धप्रसंगांनी भरलेले आहे.स्वराज्यावर अनेक संकटे आली,पण
शिवरायांनी प्रसंग पाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांना तोंड दिले.
शिवराय पराक्रमी होते, तसेच थोर मुत्सददीही होते.शक्ती कमी पडली
तेव्हा शिवरायांनी युक्ती चालवली.अफजलखान म्हणजे तुफान ताकदीचा
वीर,पण शिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली व त्याचा निकाल
लावला,धोधो पावसात व दाट काळोखात शिवराय सिद्दी जौहरच्या
वेढ्यातून बाहेर पडले.रात्रीच्या अंधारात शायीस्ताखानावर छापा घालून
त्यांनी त्याची खोड मोडली.आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून किती
युक्तीने ते निसटले! त्यांच्यासारखा धाडसी आणि मुत्सद्दी सेनानायक
सापडणे कठीण !
सरदारांची स्वामीनिष्ठा : शिवराय स्वत: शूर योदधे होते.त्यांनी
आपल्या सरदारांना शूर बनवले.सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा
होती! शिवरायांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभूने आनंदाने
मरणाला मिठी मारली .फिरंगोजी नरसाळा याने चाकणचा किल्ला
जीवावर प्राणार्पण केले.सेनापती प्रतापराव गुजर याने आदिलशाही
सरदार बहालोलखानाशी लढताना हौतात्म्य पत्करले.त्यांच्या सेवकांच्या
स्वामीनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
शिवरायांचा गनिमी कावा: शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते.
शत्रूजवळ अफाट फौजा होत्या,भरपूर दारुगोळा होता,शेकडो तोफा
होत्या,पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूच्या
बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार ? उघड्या मैदानावर शत्रूशी कसा
सामना देणार ? तेव्हा शिवरायांनी विचार केला, की महाराष्ट्र हा डोंगराळ
मुलूख .इथे डोंगर ,घाट व खिंडी पुष्कळ आहेत.त्यांचा आपण भरपूर
उपयोग करून घेतला पाहिजे .हे सारे लक्षात घेऊन शिवरायांनी शत्रूशी
सामना कसा द्यावा हे ठरवले.शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर समान
असे .ते आवरून लढाईला निघायला त्यांना वेळ लागे.उलट मराठे
घोडेस्वारांजवळ जड समान काहीच नसे.पाठीला ढाल, कमरेला
तलवार,हातात भाला एवढेच त्यांचे सामान .पाहता पाहता ते डोंगर
चढत व उतरत .शिवरायांचे मावळे चपळ व काटक होते.या साऱ्या
गोष्टींचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई
करण्याचे शक्यतो टाळले,यात त्यांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येते.
शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रुपक्षाची
खडानखडा माहिती मिळवत.मग शत्रूवर अचानक हल्ला करत.बेसावध
शत्रूची दाणादाण उडवत.शत्रू लढाईत तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या
वेगाने दिसेनासे होत.डोंगराळ भागात अशा लपुनछपून लढाया करायला
शिवरायांनी सुरुवात केली.यालाच ‘गनिमी कावा’ म्हणतात.शिवरायांनी
गनिमी काव्यानेच बादशाहाच्या प्रचंड फौजांचा धुव्वा उडवला.
डोंगरी किल्ले : शिवरायांनी डोंगरी किल्ल्यांवर अधिक भिस्त
होती.किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता
निर्माण करणे सोपे जात असे . किल्ल्यावर अन्नधान्य व दारुगोळा यांचा
भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले ! मग किल्ल्यावरील शिवरायांनी
लहानशी फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन –दोन वर्षे दाद देत नसे.शत्रू
ताकदवान असला तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत असे .शिवरायांनी
स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही.
ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली व नंतर राजधानीसाठी रायगडाची
निवड केली,याचे इंगित हेच होते.
किल्ल्यांचे रक्षण : किल्ल्यांच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडांवर
भिन्नभिन्न जातीजमातींची माणसे नेमली.त्यामुळे किल्ल्यावरील
अधिकाऱ्यांचा एकमेकांवर वचक राही .कामे सुरळीत पार पडत.शत्रूला
किल्ल्यावर फुतुरी माजवता येत नसे .यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी
होती.
चौथाई : स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसा उभारणे
आवश्यक होते.शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा
उभारत .शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत,त्यास
चौथाई म्हणत.चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत.
चौथीचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
आरमारदल उभारले: सिद्दी,पोर्तुगीज,इंग्रज यांच्यापासून
स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे,हे शिवरायांनी ओळखले
होते,म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले होते.समुद्रात
सिंधुदुर्ग,विजदुर्ग यांसारखे भक्कम सागरी किल्ले बांधले.ते पाहिले
की आजही आपले मन थक्क होते.
स्वराज्यावर केवढी संकटे आली,पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने
आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले,म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले.

दक्षिणेतील मोहिम
मोहिमेचा बेत : राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला,पण हा
आनंद फार काळ टिकू शकला नाही.राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा
दिवसांनी मासाहेब मृत्यू पावल्या.शिवरायांचा मोठा आधार गेला.
स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते; परंतु शिवरायांचा आधार
मासाहेब होत्या.त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु
होत्या.आईच्या मृत्यूमुळे त्यांना अतिशय दु:ख झाले; परंतु दु;ख करत
बसणे त्यांना शक्य नव्हते.त्यांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता.
शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला.त्यांना
आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती,कारण आदिलशाही
मोडकळीस आली होती; परंतु उत्तरेचा मुघल बादशाहा औरंगजेब हा
मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता.स्वराज्याचा
तो केव्हा घास घेईल याचा नेम नव्हता.मुघलांचे संकट स्वराज्यावर
आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे,असा विचार
शिवरायांच्या मनात आला, म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात
घेण्याचे ठरवले.या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या
कुतुबशाहीची मदत मागितली .त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत
देण्याचे कबूल केले.
या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता.त्यांचे सावत्र
भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागिरी सांभाळून होते.
वडिलांची कर्नाटकातील जहागिरी त्यांच्याकडे होती.त्यातील काहीही
वाटा व्यंकोजीराजांनी शिवरायांना दिला नव्हता.एवढेच नव्हे,तर
स्वराज्याबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता.ते शिवरायांशी फटकून
वागत असत.त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत
मिळावी तर पहावी,असा हेतू शिवरायांच्या मनात होता.
गोवळकोंड्याला भेट : कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले.
गोवळकोंड्याचा अबुलहसन कुतुबशाहा याने त्यांना भेटीस आमंत्रण दिले
होते,तेव्हा प्रथम कुतुबशाहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण
दिग्विजयासाठी पुढे जायचे,अशी योजना त्यांनी आखली.
गोवळकोंडा हीच कुतुबाशाहाची राजधानी होती.कुतुबाशाहाने
महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली.भेटीसाठी खास तंबू
उभारला.शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले.त्यांचे दर्शन
घेण्यासाठी रस्तोरस्ता लोक दुतर्फा उभे होते.त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या
देशात चहूकडे पसरल्या होत्या.अफजखानाचा वध,शायीस्ताखानाची
फटफजिती आणि आगऱ्याहून सुटका या रोमहर्षक प्रसंगाची हकीकत
देशभर पसरली होती.त्यामुळे तेथे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले.
घराघरांतून लोक महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते.लाकांचे स्वागत
स्वीकारून महाराज कुतुबशाहाच्या दरबारात आले.कुतुबशाहा त्यांना
सामोरा गेला.खास तयार केलेल्या बरोबरीच्या सिंहासनावर त्याने
महाराजांना बसवले.त्याने महाराजांच्या सत्कारात कशाची कमतरता राहू
दिली नाही .स्वगातसत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर
निघाले.
जिंजी जिंकली: शिवराय पूर्वकिनाऱ्यावर आले.चेन्नईच्या
दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे.हा रायगडाप्रमाणे प्रचंड आणि मजबूत
होता.त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला .दक्षिणेत
स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले.नंतर त्यांनी वेलूरच्या
किल्ल्याला वेढा दिला.कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात
येईना .तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर
तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला.त्यांनी कर्नाटकात एकूण
वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटेमोठे किल्ले जिंकले.
व्यंकोजीराजांची भेट: महाराजांनी आपले सावत्र भाऊ
व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले.नाखुशीनेच ते आले.महाराजांनी
त्यांचा योग्य सत्कार केला.त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे,अशी त्यांनी त्यांना
गळ घातली.काही दिवस व्यंकोजीराजे महाराजांबरोबर राहिले; परंतु एका
रात्री महाराजांना काही न कळवता ते तंजावरला निघून गेले आणि उलट
त्यांची फौजेवरच त्यांनी हल्ला केला,तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा
समाचार घेतला.व्यंकोजीराजांचा पराभव झाला.आपल्या भावाच्या
अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले.त्यांनी व्यंकोजीराजांना
समजुतीची पत्रे पाठवली .जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना
दिला.त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोलीबंगडीसाठी
कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला.महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात
लिहिले,परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये.पुरुषार्थ गाजवावा.
कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले .या
मोहिमेची दगदग त्यांना सहन झाली नाही .तशातच जंजिऱ्याच्या
सिद्दीविरूढ महाराजांना आरमारी मोहिम काढावी लागली.तीस –पस्तीस
वर्षे त्यांनी सतत कष्ट केले होते.त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही .
देह थकला .प्रकृती खालावली .तशातच युवराज संभाजी मुघलांचा
सेनापती दिलेरखान याला जाऊन मिळाले .महाराजांना फार दु:ख झाले.
त्यांना मोठा धक्का बसला.तथापि ,पश्चात्ताप पावून संभाजीराजे परत
स्वराज्यात आले.शिवरायांनी त्यांची समजूत काढली.
या वेळी महाराजांचे वय पन्नास वर्षांचे होते.आपल्या हयातीत
महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या.जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी
हिंदवी स्वराज्य निर्माण केले.अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड
नव्हती.
रयतेचा वाली गेला : तारीख ३ एप्रिल १६८० दुपारचे बारा
वाजले .सर्वांना दु:खसागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप
घेतला.रयतेचा वाली गेला!

राज्यकारभाराची घडी बसवली
राज्यकारभाराची घडी : शिवरायांनी जीवाचे रान करून स्वराज्य
स्थापन केले. हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले.स्वराज्यातील प्रजा
सुखी होती.देव –देवळे सुरक्षित होती.त्याच प्रमाणे इतर धर्मांचीही
प्रार्थनास्थळे सुरक्षित राहिली होती, मात्र स्वराज्यावर अनेक संकटे येत
होती.या संकटांतून पार पडून स्वराज्य कायम टिकावे ,अशी शिवरायांची
इच्छा होती.राज्य कायम टिकवायचे असेल, प्रजेला सुखी ठेवायचे
असेल, तर त्यासाठी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवावी लागते.
ती शिवरायांनी बसवली.
राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे,म्हणून शिवरायांनी
राज्यकारभाराची आठ खात्यांत विभागणी केली. प्रत्येक खात्यावर एकेक
प्रधान नेमला.प्रत्येक खाते त्या त्या प्रधानाकडे सोपवले.हेच
शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ.
प्रधानाचे नाव -पद -काम
१.मोरो त्रिंबक पिंगळे –प्रधान - राज्यकारभार चालवले.
२.रामचंद्र नीलकंठ मुजुमदार -अमात्य – राज्याचा जमाखर्च पाहणे.
३.हंबीरराव मोहिते - सेनापती –सैन्याचे नेतृत्व करणे.
४.मोरेश्वर पंडितराव – पंडितराव –धर्माची कामे पाहणे.
५.निराजी रावजी –न्यायाधीश –न्यायदान करणे.
६.अण्णाजी दत्तो –सचिव –सरकारी आज्ञापत्रे पाठवणे.
७.दत्ताजी त्रिंबक वाकनीस –मंत्री –पत्रव्यवहार सांभाळणे .
८.रामचंद्र त्रिंबक डबीर –सुमंत –परराज्यांशी संबंध ठेवणे.
प्रधान अमात्य सचिव मंत्री
सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री
सेनापती त्यात असे सुजाणा
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा !!
या चार ओळीत शिवरायांचे अष्टप्रधान सांगितले आहेत.यांतील
पंडितराव व न्यायाधीश यांच्याशिवाय इतर सर्वांना युद्धप्रसंग करावे
लागत , म्हणजे रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करून लढाई द्यावी लागे.
शिवरायांना माणसांच्या गुणांची पारख होती.एखाद्या जवाहिरया
एकेक मोती पारखून तोलून घेतो व त्या मोत्यांचा हार गुंफतो, तशी
कसून पारख करून शिवरायांनी आपल्या अष्टप्रधानांची निवड केली
होती.त्यांनी प्रधानांना इनामे,वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत;रोख
पगार मात्र भरपूर दिला.
शिवरायांची सरंक्षण –व्यवस्था :
शिवरायांचे सैन्य : शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे
मुख्य विभाग होते.तसेच आरमारदल हा नवीन विभाग शिवरायांनी
उभारला होता.शिवरायांच्या सैन्यात कोकणातील हेटकरी व घाटावरील
मावळे यांचा भरणा असे.सैन्यातील घोडदळतही दोन विभाग होते.एक
विभाग बारगीरांचा होता.त्यांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत
असत.बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत.बारगीरांना मासिक
पगार देत.घोडदळातील दुसरा विभाग होता शिलेदारांचा .शिलेदारांकडे
स्वत:चा घोडा आणि व स्वत : ची हत्यारे असत.शिलेदार आपला घोडा व
हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत .या कामगिरीबद्दल त्यांना मोबदला
दिला जाई.
शिवरायांच्या लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळ ही मोठे होते,
पायदळांच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत .पायदळात हवालदार ,जुमलेदार
हजारी ,पंचहजारी असे अधिकारी असत.
शिवरायांच्या सैन्याची शिस्त कडक होती.त्यांचे सैनिक स्त्रियांचा
आदर करत.त्यामुळे स्त्रियांचे रक्षणकर्ते म्हणून म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र
पसरली होती.सैनिकांनी दारू पिऊ नये,रयतेला त्रास देऊ नये,रयतेची
लुट करू नये ,अशी सैनिकांनी त्यांची सक्त ताकीद होती.सैनिकांचा
पगार वेळच्या वेळी मिळे .
मराठ्यांचे आरमार : आरमार म्हणजे युद्धानौकांचे तोंड .मुघल व
विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू .त्यांना शिवरायांनी जेरीस
आणले,पण सिद्दी ,पोर्तुगीज व इंग्रज हे समुद्रावरील नवीन शत्रू निर्माण
झाले.शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठीच दूरदृष्टी आरमारदल
उभारले .मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय. या अर्थाने शिवराय
हे भारतीय आरमाराचे जनक मानले जातात.शिवरायांनी युद्धनौकाही
बांधल्या.सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यांसारखे समुद्रकिल्ले बांधले.युद्धनौका
घेऊन शिवरायांनी अनेक मोहिम काढल्या .शिवरायांच्या आरमाराचा
सागरी शत्रूंवर वचक बसला.
त्या काळात राज्याच्या संरक्षणासाठी किल्लांचा फार उपयोग होई .
शिवरायांकडे सुमारे तीनशे किल्ले होते.किल्ल्यांवर कडेकोट बंदोबस्त
होता.प्रत्येक किल्ल्यावर किलेदार,सबनीस व कारखानीस हे अधिकारी
असत.
शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेरखाते होते .बहिर्जी नाईक
त्यांच्या हेरखात्याचा प्रमुख होता.शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात
शिरून गोटातील खडानखडा माहिती काढून आणत.कोणतीही चढाई
करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि चढाईचा बेत
आखत .
मुलकी व्यवस्था : राज्यातील मुलकी व्यवस्थाही शिवरायांनी चोख
ठेवली होती.स्वराज्यात बारा सुभे म्हणजे प्रांत .सुभ्यावर
सुभेदार हा अंमलदार असे .सुभ्याचे काही विभाग असत,त्यांना परगणा
म्हणत .परगण्याच्या अधिकाऱ्यास हवालदार म्हणत .एका परगण्यात
अनेक गावे असत . प्रत्येक गावात पाटील व कुलकर्णी असत.
राज्याच्या कारभार शिवराय स्वत:बघत.अधिकाऱ्यांचा नेमणुका ते
स्वत: करत.प्रधानांना कामे नेमून देत.स्वराज्याचा खजिना द्रव्याने
भरलेला असे.
राज्यकारभारात हिंदू,मुसलमान असा भेद शिवरायांनी केला नाही.
त्यांनी गुणी माणसांना जवळ केले.त्यांना स्वराज्याच्या कार्याला लावले.
त्यांचा स्वराज्याच्या कामी करून घेतला.स्वराज्याशी बेइमानी
करणाऱ्या मात्र त्यांनी कधी क्षमा केली नाही .फितुरांना त्यांनी कडक
शिक्षा केल्या .मग तो आपला असो किंवा परका असो.अशा प्रकारे
शिवरायांचा राज्यकारभार अतिशय चोख होता.

एक अपूर्व सोहळा
राज्याभिषेक का केला ? : रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी
स्वराज्याची प्रतिज्ञा केली.स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी
संकटे आली,पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार
पडले.बाजीप्रभू ,मुरारबाजी ,तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता
लढता आपले प्राण वेचले.शेवटी स्वराज्य उभे राहिले.शत्रूवर वचक बसला.
या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी,म्हणून
शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली.शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना
समान वागणारा,प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण
झाला होता.स्वराज्य निर्माण झाले होते हे जगाला कळायला हवे,
म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले.हे त्यांनी
स्वत:च्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही; तर हे केले स्वराज्य
भक्कम करण्यासाठी .
स्वराज्याची राजधानी : शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची
निवड केली.रायगड हा मजबूत किल्ला होता.रायगडावरून स्वराज्यावर
देखरेख करणे सोपे होते.शत्रूवर नजर ठेवणे सोईचे होते.
चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली.
प्रतापगडाच्या भावानिदेवीचे दर्शन घेतले.तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र
अर्पण केले.
समारंभाची तयारी : नंतर शिवरायांनी सोन्याने सिंहासन तयार
करवून घेतले.त्याला मौल्यवान रत्ने जडवली.त्यावर शुभ्र छत्र बसवले.
राजेरजवाडे ,विद्वान ब्राम्हण व हाताखालचे सरदार ,कामदार यांना
आमंत्रण गेली.राज्यभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट
आले .गागाभट्टाचे घराणे मूळ पैठणचे,पण काशीमध्ये स्थाईक झालेले.
ते थोर पंडित होते.काशिक्षेत्रात त्यांना मोठा मान होता.सर्वत्र त्यांची
कीर्ती पसरली होती.सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी
माणसे गेली.राज्याभिषेकाची तयारी शिवरायांनी यथासांग केली.
रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली.त्यांच्यासाठी जिकडेतिकडे
तंबू ,डेरे,राहुट्या यांची गर्दी झाली.
राज्याभिषेकाचा सोहळा: राज्याभिषेकाचा दिवस उजाडला.
महामंगल दिवस होता तो. वाद्ये वाजू लागली.गवई गाऊ लागले.
सगळीकडे आनंदीआनंद झाला.शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले.
त्यांच्यावर छत्रचामरे धरली.तूप,दही,मध यांचे कलश पुरोहितांच्या
हातांत होते. गागाभट्ट यांच्या हातांत सोन्याची घागर होती.तिच्यात
गंगा,सिंधू,यमुना,गोदावरी,कृष्णा,नर्मदा,व कावेरी या सात नद्यांचे
पाणी भरलेले होते.गागाभट्टानी ती सोन्याची घागर शिवरायांच्या
डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या शंभर छिद्रांतून
शिवरायांवर जलाभिषेक झाला.मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या
पाया पडले .मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले.त्यांच्या डोळ्यांतून
आनंदाश्रू वाहू लागले.त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या कष्टांचे चीज झाले.
शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माउलीने मनी धरलेले स्वप्न आज
साकार झाले होते.आईचा आनंद अश्रुंवाटे बाहेर पडला.शिवारायही
गहिवरले.धन्य मासाहेब! धन्य शिवराय !
शुभ मुहूर्तावर महाराज सिंहासनावर बसले.त्यांच्याजवळ महाराणी
सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले.तसेच अष्टप्रधान त्यांची दोन्ही
बाजूंना उभे राहिले.गागाभट्टानी सोन्यामोत्यांच्या झालरीचे छत्र
महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले , क्षेत्रीयकुलावतंस
सिंहासनाधीश्वर श्रीशिवछत्रपती यांचा विजय असो.सर्वांना जयजयकार
केला . गडागडांवर तोफा झाल्या.सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा
जयजयकार झाला.अशा प्रकारे सन १६७४ मध्ये शिवरायांचा
राज्याभिषेक झाला.त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक
सुरु केला.शिवाजीमहाराज शककर्ते राजे झाले.त्यांनी आपली स्वतंत्र
नाणी पाडली.निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते.
इंग्रजांनी ओक्झिंडेन नावाचा आपला वकील नजराणा देऊन पाठवला
होता.शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली .
शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली.

गड आला पण सिंह गेला
मासाहेबांची इच्छा : शिवरायांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले
अजून मुघलांकडे होते.कोंढाणा हा त्यांतलाच एक किल्ला.एक दिवस
जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, “शिवबा ,कोंढाण्यासारखा बळकट
किल्ला स्वराज्यात असावा म्हणून शिवारायाही तळमळत होते.
कोंढाण्यावर मुघलांचा ताबा म्हणजे स्वराज्याला झालेली जखम . ही
जखम जिजामाता आणि शिवराय या दोघांच्याही मनात सलत होती.
तानाजी मालुसरे : शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला,पण
कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते.शिवराय विचार करू लागले,
या कामगिरीसाठी निवडावे कुणाला? कोंढाणा सर करण्यासाठी कामगिरी
फार कठीण होती, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर नाव आले तानाजी
मालुसरे याचे.तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता.
कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे,तिथला तो राहणारा.
शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई ,दिरंगाई माहितच नव्हती.
शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी
केव्हाही तयार! मोठा हिंमतवान गडी! तो अंगाने धिप्पाड होता.
ताकदीने भारी होता.बुद्धीने चलाख होता.शिवरायांवर त्याची अलोट
भक्ती होती.
आधी लग्न कोंढाण्याचे : तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या
गडबडीत होता.त्याचा एकुलता एक मुलगा रायबा.तानाजीच्या घरी
रायाबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती.लग्न चार दिवसांवर
येऊन ठेपले होते.तानाजीला वाटले,महाराज आणि मासाहेब यांना
लग्नाला बोलवावे. तो शेलारमामाला बरोबर घेऊन रायाबाच्या लग्नाचे
आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला.शेलारमामाने शिवरायांना लग्नाचे
आमंत्रण दिले.शिवराय म्हणाले, ‘ शेलारमामा ,तुम्ही रायबाचे लग्न
उरकून घ्या.आम्ही स्वत: काही लग्नाला येऊ शकणार नाही,कारण
आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत.
शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, “महाराज,तानाजी
जिवंत असताना असल्या जिवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग
आम्ही कशाला? ते काही नाही .आधी लग्न कोंढाण्याचे ,मग रायबाचे.
कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार.मला आशीर्वाद द्या.
तानाजीचा बेत: तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला.कोंढाणा
किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदेभान हा रजपूत किल्लेदार होता.तो
मोठा कडक होता.गडाला दोन दरवाजे होते.दोन्ही ठिकाणी उदेभानाने
पक्का बंदोबस्त ठेवला होता, तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने
गडाभोवती टेहाळणी केली.पश्चिमेला उंचच उंच कडा होता.
त्या बाजूला पहारा नव्हता.तानाजीने कडा चढून जायचा बेत
केला.तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला,
सूर्याजी,तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा
गाठ.मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून
गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण
दरवाजा उघडतो.मग या तुम्ही आत,
घुसा एकदम ,धुव्वा उडवू शत्रूचा .
चला.” सूर्याजी आणि तानाजी दोघे
दोन वाटांनी निघाले.
कड्यावरून गडावर : रात्रीची वेळ होती, तानाजी व
त्याचे मावळे
कड्याच्या
पायथ्याला
काळोखात
उभे होते.रातकिडे किरकिरत होते.तानाजीचे पाच-सहा तरुण मावळे
कडा चढायला पुढे झाले.कडा केवढा उंच ! पण ते कपारीस धरून,
कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले.वर
जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले .मग काय?
तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून
गडावर गेले.
तानाजीचा पराक्रम: इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह
कल्याण दरवाजा गाठला.व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले .
लढाईला सुरुवात झाली.उदेभानला खबर लागली.नगारा वाजला.
उदेभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले.हातघाईने लढाई सुरु
झाली,तलवारीला तलवारी भिडल्या.सपासप वार होऊ लागले.ढाली
खाणाणु लागल्या.मशालींचा नाच सुरु झाला.मावळ्यांनी कल्याण
दरवाजा उघडला.तानाजी सिहांसारखा लढत होता.उधेभानाने त्याच्यावर
झेप घेतली.दोघांची झुंज सुरु झाली.दोघेही शूर वीर ! कोणीही हटेना.
इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला.
शेल्यावर वार झेलत तो लढू लागला.शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी
जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले.
गड आला पण सिंह गेला ! : तानाजी पडला हे पाहून
मावळ्यांचा धीर खचला.ते पळू लागले.इतक्यात सूर्याजी व त्याच्या
बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून येऊन पोहचेले.आपला भाऊ
पडलेला पाहून सूर्याजीला दु:ख झाले, पण ती वेळ दु:ख करण्याची
नव्हती ,लढण्याची होती.सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला.
पाळणाऱ्या मावळ्यांना तो अडवा गेला आणि म्हणाला ,अरे तुमचा
बाप इथे मरून पडला आहे.तुम्ही असे भागुबाईसारखे काय पळता ?
मागे फिरा .मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे.कड्यावरून उड्या
टाकून मरा,नाहीतर शत्रूवर तुटून पडा.
मावळे मागे फिरले.घनघोर लढाई झाली.मावळ्यांनी गड सर
केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला.
जीजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली, त्यांना खूप दु:ख झाले.
गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला.शिवराय खूप
हळहळले आणि म्हणाले ,गड आला पण सिंह गेला!
कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन १६७० मध्ये
घडली.पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले.

बादशाहाच्या हातावर
जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाच्या भेटीस
आगऱ्याला जाण्यास निघाले.जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार
जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.बरोबर
आपला मुलगा संभांजीराजे,निवडक सरदार ,काही विश्वासू माणसे
आणि बराच खजिना घेतला.मजल दरमजल करत ते आगऱ्यास
पोहचले.
दरबारातील बाणेदारपणा : ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाहाच्या
दरबारास गेले. छोटे संभाजीराजे सोबत होते.त्या दिवशी औरंगजेब
बादशाहाचा पन्नासावा वाढदिवस होता. बादशाहा दरबार संपवून
सल्लामसलतीच्या महालात गेला.त्याच्या समोर निवडक सरदार
मनाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बदशाहाने शिवरायांना मागील
रांगेत उभे केले.मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला
जयवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता.शिवरायांना वाटले,
आपण महाराष्ट्राचे राजे,आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा,पण
बादशाहाने आपाल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय?त्यांचे
डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने
शिवराय महालाबाहेर पडले.ते तडक आपल्या मुक्कामावर गेले. यापुढे
बादशाहाने तोंड पाहायचे नाही,असे त्यांनी ठरवले.
भेटीचा बेत असा बिनसला. घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे
पसरली.
बादशाहाची दगलबाजी : औरंगजेब शिवरायांच्या मुक्कामाच्या
ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला.शिवराय आणि संभाजीराजे
बादशाहाच्या कैदेत पडले.शिवरायांनी ओळखले, की बादशाहाने
आपल्याशी दगलबाजी केली आहे.आता आपल्याला कधीच
सोडणार नाही.
दिवसामागून दिवस जाऊ लागले.एक दिवस शिवरायांनी
बादशाहाकडे अर्ज केला, ‘ मला महाराष्ट्रात जाऊ द्या. ‘ पण बादशाहाने
ते एकले नाही.त्यांनी खूप खटपट केली,पण बादशाहाच्या मानले नाही.
शिवरायांनी मनाशी निर्धार केला. , की काहीही करून बादशाहाच्या कैदेतून
सुटून जायचेच. त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर
आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली.बादशाहाला वाटले,बरे
झाले.शिवाजीचे बळ कमी झाले. आता शिवरायांच्या बरोबर
संभाजीराजे आणि होरोजी फर्जद व मदारी मेहतर हे सेवक, एवढेच जण
राहिले.
पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले.सोंगच ते !
त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हकीम ,वैद्य आले.
औषधपाणी सुरु झाले.आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व
मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली.
पेटाऱ्यातून पसार झाले: पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत,
पण पुढेपुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले.रोजरोज काय
पाहायचे,असे त्यांना वाटले.एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी
हिरोजीला आपल्या जागी झोपवले,मदरीस त्याचे पाय चेपत बसवले.
शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. पेटारे निघाले.पुढे
ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले. तेथे शिवरायांचे स्वामीभक्त
सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी ‘ महाराजांचे
औषध आणायला जातो, असे सांगून तेथून निसटले.
हादरले.शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी सगळीकडे हेर पाठवले,
पण व्यर्थ, बादशाहाच्या झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलाखाकडे
निघाले त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले व ते पुढे
निघाले.राजगडास शिवराय सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य
वाटले.पुढे दोन महिन्यांनी संभाजीराजे साखरूप राजगडास येऊन
पोहोचेले,अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाहाच्या हातावर तुरी देऊन
शिवरायांनी आपली सुटला करून घेतली.ही घटना सन १६६६ मध्ये घडली .

पुरंदरचा वेढा व तह
सुरतेवर छापा : या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत,
औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या,तेव्हा
बादशाहावर जबर बसण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा
घातला.कुठे पुणे व कुठे सुरत ? सुरत म्हणजे त्या वेळीचे मुघली
मुलाखतील मोठी व्यापारपेठ . खूप सधन . शिवरायांनी सुरतेवर छापा
घालून लक्षावधी रुपयांची लुट मिळवली.सुरतेच्या लुटीत शिवरायांनी
नीती सोडली नाही.चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही .
स्त्रियांना तसदी दिली नाही.औरंगजेब बादशाहाच्या सुरतेची शिवरायांनी
बेसुरत केली.त्यामुळे बादशाहा भयंकर चिडला होता.मराठ्यांचे राज्य
नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला.मिर्झाराजे जयसिंग या आपल्या
बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले.त्याच्या सोबतीला
दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला.अलोट खजिना आणि
अफाट दारूगोळाही बरोबर दिला.जयसिंग आणि दिलेरखान प्रचंड
फौजेसह दक्षिणेत येऊन पोहचले.स्वराज्यावर फार मोठे संकट आले.
सुरतेच्या मोहिमेवर शिवराय परततात तोच त्यांना कर्नाटकातून एक
वाईट बतामी समजली.शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती
निधन झाले.शिवराय व जिजाऊ यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला .
मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दु:खातून त्यांना सावरले
सन ( १६६४)
पुरंदराला मुघलांचा वेढा: पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट
किल्ला होता.हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ
शकणार नाही,हे दिलेरखान जाणून होता.त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला
वेढा दिला.त्याची फौज फार मोठी होती,पण पुरंदरचा किल्लेदार
मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता.त्याचा हाताखालचे शिपाई मोठे
शूर गडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा
राहिला.
दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या . तोफेचे लालभडक गोळे
किल्ल्यावर कोसळू लागले,पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले
नाहीत. ते अधिक जोराने झुंजू लागले.मुघलांनी तोफांचा भडीमार केला.
माचीचा बरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले . दिलेरखानाने माची
जिंकली.मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला.ते लढतच
राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता.
मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने पाचशे मावळे निवडले.
त्यांना घेऊन त्याने मुघालांवर हल्ला करायचा बेत केला.बालेकिल्ल्याचा
दरवाजा उघडला. हर हर महदेव’ अशी गर्जना करत मुरारबाजी आणि
त्याचे मावळे मुघालांवर तुटून पडले.थोडा वेळ भयंकर लढाई झाली.
मुघलांचे सैन्य अफाट होते,पण मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला.शेवटी
मुघलांनी माघार घेतली.ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत
सुटले.
मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला.मुरारबाजीचे सैन्य
दिलेरखानाच्या छावणीत घुसले.छावणीत एकच गोंधळ माजला.
धावाधाव,आरडओरड ,किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला.घाईघाईने
दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला.त्याने समोर पहिले,तो त्यास
मुरारबाजी दिसला.मुराराबाजीची तलवार कोणाच्या छाताडात,कोणाच्या
मस्तकात,तर कोणाच्या कंठात घुसत होती.मुरारबाजी कोणालाही
आटोपत नव्हता.त्याचे शौर्य बघून दिलेरखान थक्क झाला.
मुरारबाजीचा अतुल पराक्रम: दिलेरखानला बघून मुरारबाजी
चवताळला. “कापा,तोड,मुडदे पाडा,असे ओरडून तो शत्रूवर
धावला.त्याची समशेर जोराने फिरू लागली.जो आड आला,तो ठार
झाला.या एकट्या विराला मुघलांनी चोहोकडून घेरले.इतक्यात
दिलेरखान अंबारीतून , “थांबा ! मुघल थांबले.क्षणभर मागे
सरले.खान मुरारबाजीला म्हणाला , मुरारबाजी ,तुझ्यासारखा
समशेरबहाद्दर मी आजवर पहिला नाही.तू आमच्या बाजूला ये,कौल
घे.बादशाहा तुला सरदार करतील.जहागिरी देतील.बक्षीस देतील!
मुरारबाजीने दिलेराखानाचे शब्द एकले.रागाने त्याचे डोळे लाल झाले.
तो चवताळून म्हणाला, “ अरे ,आम्ही शिवाजीमहाराजांची माणसे ! तुझा
कौल घेतो की काय? आम्हांला काय कमी आहे? तुझ्या बादशाहीची
जहागिरी हवी कोणाला? मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली
आणि तुफान कत्तल करत सुटला.दिलेरखानाने अंबारीतून बाण
सोडला.तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला.तो जमिनीवर
कोसळला.मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला.
किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दु:ख झाले,पण एक मुरारबाजी
पडला तरी काय झाले? आम्ही तैसेच शूर अहो.हिंमत धरून लढतो,
असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले.
ही बतामी शिवरायांना कळल्यावर ते फार दु:खी झाले.त्यांनी विचार
केला,एकेक किल्ला वर्षवर्ष लढवता येईल,पण विनाकारण माणसे
मरतील.शिवरायांना ते नको होते.
पुरंदरचा तह : करणार काय ? शक्ती चालेना,युक्ती उपयोगी
पडेना,तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य ; म्हणून मुघलांशी तह
करायचा असे शिवरायांनी ठरवले.शिवराय स्वत: जयसिंगाकडे गेले.
त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले.ते म्हणाले,मिर्झाराजे ,आपण
रजपूत आहात.आमचे दु:ख आपण जानता.बादशाहाच्या स्वाऱ्यांनी
महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे.लोकांचे हाल होत आहेत.लोक सुखी
व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे! आपणही हे
काम हाती घ्या.मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू”
जयसिंग मोठा धूर्त होता.त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले.
लक्ष होनांचा मुलूख मुघालांस देण्याचे कबूल केले.हा तह १६६५ साली
झाला.
पुरंदरचा तह झाला.याच वेळी शिवरायांनी आगऱ्यास जाऊन
बादशाची भेट घ्यावी,असे जयसिंगाने सुचवले.त्यांना सुरक्षितेची
हमी दिली.जयसिंगाच्या सूचनेवर विचार केला.बादशाहा
कपटी आहे,स्वत:च्या भावाशीसुद्धा त्याने दगलबाजी केली,हे शिवराय
ओळखून होते.तरीपण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे ,असे
त्यांनी ठरवले.आपण बादशाची भेट घेण्यास आगऱ्याला जाण्यास तयार
आहोत,असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले.

शायिस्ताखानाची फजिती
शायिस्ताखानाची स्वारी : विजापूरच्या आदिलशाहने जंगजंग
पछाडले,पण शिवारायांपुढे त्यांचे काही चालले नाही .त्यांच्या प्रत्येक
सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला.शेवटी आदिलशाहा नरम
झाला.त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य
केले.यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली.
मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले.मुघांच्या स्वाऱ्यांनी
महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती.त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा
मुघल बादशाहा होता.त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या.
त्यामुळे बादशाहा चिडला.त्याने आपला मामा शायिस्ताखान याला
शिवरायांवर पाठवले . तो पुण्यावर चालून आला.त्यांच्याबरोबर पाऊण
लाख सैन्य होते.शेकडो हत्ती,उंट आणि तोफा होत्या.शिरवळ ,
शिवापूर ,सासवड अशी गावे घेत घेत शायिस्ताखान आला.त्याने पुरंदर
किल्ल्याला वेढा दिला.तो पुढेपुढेच येत होता,पण एकदा मात्र
डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ,
भीमथडी ताटावर बसणारे ! चटणी- भाकरी खावी,अंगावर घोंगडी
टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत
मराठे फार पटाईत . मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य
हैराण झाले.कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला.
फिरंगोजी नरसाळा : मग शायिस्ताखान पुण्याकडे वळला.प्रथम
त्याने चाकणचा किल्ला घेतला.चाकणच्या किल्लात फिरंगोजी
नरसाळयाने मोठ्या मर्दुमकीने शायिस्ताखानाशी मुकाबला केला.दोन
महिने फिरंगोजीने किल्ला लढवला,पण शायिस्ताखानाच्या तोफखान्यापुढे
त्याचा टिकाव लागला नाही.फिरंगोजी नरसाळयाच्या शौर्यावर
शायिस्ताखान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकारीचे आमिष
दाखवले,पण फिरंगोजी बदलला नाही.
लाल महालात शायिस्ताखान : शायिस्ताखान पुण्यात आला.
त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला.त्याच्या फौजेने
लाल महालाभोवती तळ दिला.एक वर्ष गेले,दुसरे गेले,पण खान
काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज
भोवतालच्या मुलाखत पाठवी . रयतेचे गुरे ओढून आणि ,शेतीची
नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालच्या मुलूख उद्धवस्त
केला.
धाडसी बेत : शायिस्ताखानाची खोड मोडायाचीच ,असे
शिवरायांनी ठरवले,खान लाल महाल बळकावून बसला होता,हे एका
दृष्टीने शिवरायांना सोईचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या ,दालने,
खिडक्या,दारे,वाटा,चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती
होती.शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच
खुद्द शायिस्ताखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला
उडवावे,असा शिवरायांनी बेत केला.किती धाडसी बेत होता हा !
महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती पाऊण
लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला
शायिस्ताखानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला
म्हणजे झाला.
शिवरायांनी दिवस निश्चित केला.तारीख ५ एप्रिल १६६३ ची रात्र
वाजतगाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या.
शेकडो स्त्री-पुरुष नटूनथटून चालले होते. कोणी पालख्यांत, कोणी
मेण्यांत , तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत
शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय
आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली . या वेळी
शायिस्ताखान गाढ झोपला होता.
शायिस्ताखानची खोड मोडली : वाड्याच्या भिंतीला भगदाड
पाडून शिवराय आत शिरले.त्यांचा स्वत:चाच वाडा तो ! त्यांना त्याचा
कानाकोपरा माहित होता.खानाचे पहारेकरी पेंगत होते.शिवरायांच्या
माणसांनी त्यांना बांधून टाकले.शिवराय आणखी आत शिरले .इतक्यात
कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला.शिवरायांनी त्याला ठार
केले.त्यांना वाटले शायिस्ताखान असावा,पण तो त्याचा मुलगा होता.
गडबड झाली.लोक जागे झाले.
शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले.त्यांनी समशेर
उपसली.शायिस्ताखान घाबरला.सैतान ! सैतान! म्हणून ओरडत
खिडकीवाटे पळू लागला.शिवराय त्याच्या मागोमाग धावले.
शायिस्ताखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी
त्याच्यावर वार केला.खानाची तीन बोटे कापली गेली.प्राणावर आले
ते बोटांवर निभावले.खान खिडकीतून उडी टाकून पळाला.शिवाजी
आला,धावा,धावा! पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी
म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली.खानाची
माणसेही घाबरून पळत होती.शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे
निघून गेली.खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली.
शायिस्ताखानाने तर हाय खाल्ली . आज बोटे तुटली ,उद्या
आपले शीर शिवाजी कापून नेईल’ अशी भीती त्याला वाटू लागली.
औरंगजेब बदाशाहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला.
तो शायिस्ताखानावर नाराज झाला.त्याने फर्मान काढून खानाची रवानगी
बंगालमध्ये केली.
मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता.
शिवराय फत्ते होऊन आले.तोफा उडाल्या .साऱ्या महाराष्ट्रात
आनंदी आनंद झाला.

शर्थीन खिंड लढवली
पन्हाळा जिंकला आणि आदिलशाहा चिडला:
अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला.त्याच्या
मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला.
त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला.त्याला अन्न पाणी गोड लागेना.
शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले.
फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला.फाजलाखानही बापाच्या
वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला.
पन्हाळगडच्या वेढा : सिद्दी जौहर शूर पण क्रूर होता.त्याची
शिस्त कडक होती.त्यांने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला.शिवरायांना
गडात कोंडले.पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते.त्यामुळे पावसाळा सुरु
झाला,की सिद्ध जौहर वेढा उठवील.असे शिवरायांना वाटले,पण
पाऊस सुरु होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची सिधोरी
संपत आली .आता काय करावे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने
सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. “ लवकरच किल्ला तुमच्या
स्वाधीन करतो,” असा निरोप त्यांनी सिद्दीला पाठवला.तो खुश झाला.
त्याने ते कबुल केले.
वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते.शिवाजी शरण येत
आहे, हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे-पिणे,गाणे-बजावणे व
हुक्कापाणी यांत ते दंग होऊन गेले.
शिवराय वेढ्यातून बाहेर: शिवरायांनी वेढ्यातून निसटून
जाण्यासाठी एक युक्ती योजली . त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या.
एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे
सोंग घेतलेली व्यक्ती राज दिंडी दरवाजातून बाहेर पडणार.दुसरी पालखी
शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि
शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोस करणार,एवढ्यात
शिवराय अवगड वाटेने निसटून जाणार,अशी योजना होती; पण
शिवरायांचे सोंग कोण घेणार ? असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला
सामोरे जायचे ; पण एक बहादुर तरुण तयार झाला. तो दिसायला
शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते. शिवरायांच्या
सेवेतील केसभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चेतूर
होता.
ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजादिंडीच्या बाहेर
पडली.रात्रीच वेळ होती. धोधो पाऊस पडत होता,तरीही शत्रूचे काहीही
सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली.शिवाजीराजाच
पकडला असे समजून त्यांने ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत
नेली.तिथे जल्लोश सुरु झाला.दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने
गडाबाहेर पडले.सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख
यांच्यासह निवडक सैनिक होते.इकडे थोड्यावेळाने त्या शिवाजीचे सोंग
उघडकीश आले,तेव्हा सिद्दीने संतापून त्याला तात्काळ ठार केले.
शिवरायांसाठी,स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले.तो अमर
झाला.
शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्दी
चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्दीला मसऊद या आपल्या सरदाराला
मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू
झाला.दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर
गाठले.शिवराय पेचात पडले.त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडून
बाजीप्रभूचा बाणेदारपणा : चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने
खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले , आता विशाळगड गाठणे
कठीण . ते बाजीप्रभूला म्हणाले , “ बाजी वेळ आणीबाणीची आहे.
पुढील वाट चढणीची . मागे शत्रू पाठीवर . आता विशाळगड हाती लागत
नाही. चला, शत्रूला उलटून तोंड देऊया !”शिवारायांच्या मनातील
घालमेल बाजीप्रभूने ओळखली . खिंडीच्या रोखने शत्रू चवताळून येत
होता.शिवरायांचे जीवित धोक्यात होते.सारे स्वराज्य धोक्यात होते.
बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, “ महाराज , तुम्ही थोडे
सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला . उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत
उभा राहतो. महाराज , मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक
बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण देशाला शिवाजी महाराजांची
गरज आहे . गानिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे
आपला निभाव लागणार नाही . तुम्ही येथे थांबू नका . आम्ही खिंड रोखून
धरतो. गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरू . तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत
आम्ही येथे शत्रूला अडवून धरू . तुम्ही निर्धास्तपणे जा .” बाजीप्रभूची
स्वामिभक्ती बघून शिवराय गहिवरले . बाजीसारखा मोहरा इरेला घालणे
त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते.
त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले. व म्हणाले , “ आम्ही
गडावर जातो . तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील ; मग ताबडतोड
खिंड सोडून तुम्ही निघून या .”
बाजी शत्रूला रोखले : बाजीप्रभूला खिंडीत मांगे ठेवून शिवराय
विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून
मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो
खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला .त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या.
त्यांनी जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड गोटे जमा केले. आणि ते
आपापल्या जागी तयारीने उभे राहिले . खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची
पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या.
शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला , “ बहादूर
मर्दानो हुशार! जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू
देऊ नका. “ बाजी आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून
उभे ठाकले. खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती. एका वेळी तीन-
चार मानसे कशीबशी वर चढू शकत.
तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते.
विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी
शिवरायांना दीड –दोन तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून
ठेवल्यास शिवरायंचे काम फत्ते होणार होते.
खिंडीतील झुंज : इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरु झाली. शत्रू
खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली.
मावळ्यांची शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरु केला. दगड्धोंड्यांचा मारा
करण्यात मावळे पटाईत . त्यांनी सराईतपणाने हाणामारी सुरु केली.
शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोकी
फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली. मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी
नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला , हाणा , मारा,”
मावळ्यांना स्फुरण चढले . हर हर महादेव ‘ अशी गर्जना करत ते शत्रूवर
तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरु झाला. शत्रू धडाधड कोसळू
लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पाठ्यांनो !
फेका आणखी दगड . ठेचा गनिमांना . होऊ द्या जोराचा मारा! शाब्बास
तुमची “ दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला.
तिकडे शिवराय विशाळगडाचे घोडदौड करत होते.गडाचा पायथा
जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या
पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक
साथीदारांसह शत्रूच्या मोर्च्यावर हल्ला चढवला.शत्रूबरोबर झुंज देत .
शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून
विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते.
बाजीचा पराक्रम : इकडे घोंडखिंडीत शर्थीची झुंज अजून चालू
होती. सिद्दी मसूउद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू
लागली.मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभवर हल्ला
चढवला.बाजीला अंगावर अनेक वार झाले.जागोजागी जखमा झाल्या
अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या . तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले
नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हाटला
नाही. मध्येच त्याने ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर
निकराचा झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष
तोफांच्या आवाजाकडे होते.
ती पावनखिंड : एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला.तोफांचे
आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. “ महाराज
गडावर पोहचले.मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मारतो,”
असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीनेप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता
विशाळगडावर महाराजांना समजली,तेव्हा त्यांना मोठे दु:ख झाले आणि
ते म्हणाले, “ बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले.
बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली !”
बाजीप्रभूसारखे देशभक्त होते, म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले.
त्या स्वमिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. ‘ पावनखिंड’ या
नावानेच इतिहासात ती अमर झाली.धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो
बाजीप्रभू !

Subscribe to:
Posts (Atom)