मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Friday 21 March 2014

मराठा म्हणजे जणु "जाळ" आहे. जो सह्याद्रीचा "बाळ" आहे

जय शिवराय मराठ्यांनो
मराठा म्हणजे जनु
"जाळ" आहे
जो सह्याद्रीचा "बाळ" आहे
यवनांसाठी "काळ" आहे
ज्याच्या गळ्यात
सदैव विजयाची "माळ" आहे
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभुराजे॥
॥ एकच आवाज तो
ही मराठ्यांचाच ॥
"एक जातीवंत विद्रोही मराठा"

- अनामिक

महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो…

महाराष्ट्राच्यामाती
मधुनी आवाज उठतो…
मराठीचा सह्याद्रीच्या रांगा मधूनी
सूर्य उगवतो मराठीचा कीती ही
डोंगर पोखरले परक्यांनी तरी ही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटा मध्ये
घुमतो आवाज मराठीचा एकतेची
साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द
चिंगार आवाज मराठीचा संस्कार
दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार
तळपते रणांगणात गर्जतो यलगार
मराठीचा गरजले परके सारे जरी
घरात आपापल्यान भी उठतो बुलंद
आवाज हाललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत,
बाणा मराठीचा...
झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभुराजे !!

संभाजी म्हणजे स्वराज्याचे भगवे वादळ

|| संभाजी म्हणजे स्वराज्याचे भगवे आभाळ
अन्यायाविरुध्द काळजात पेटलेला जाळ ||
------------------------------
दुनिया ज्याला भिते त्या मृत्युला तु नमवीले........
हि तुझी खासियत ........
फेडले आभाळाचे उपकार........
राखली मराठ्यांची रियासत........
सह्यांद्रिचा सिंह तु........
महाराष्ट्र देशाचा राजा........
फितुर झाले स्वराज्यात सख्खे........
तरी एकटा लढला बाप माझा........
झंजावात असा मिरविला........
ओलांडले अग्निच्या दरीयाला........
नतमस्तक आजही जग........
पाहुन अलौकिक धर्याला........
गुनवान पंडित असा........
शुरविर हा रांगडा........
जन्मला नहि असा पुत........
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा........
झुकली आज ति वसुंधारा........
३३ कोटि देवांचा तुला झाला रे मुजरा........
हसल्या त्या चांदण्या चंद्र आकाशतला........
पाहुन तेजपुंज शंभुच्या पाळण्यातला........
तु होता म्हणुन आहे मि........
या स्वातंत्र्याचा तुच जबाबादार........
मान शेकडो पीढ्यांचा तुझा........
तुच खरा या मराठा दौलतीचा एकमेव वारसदार........

श्रीमान छत्रपति संभाजी राजे !!
दौलतीच्या धाकल्या धन्याला
मानाचा त्रिवार मुजरा __/|\__

जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....!!

- अनामिक

आपला भगवा झेंडा.... भगवाच का ?

हिंदू आणि शिवराय यांच्या झेंड्याचा रंग
भगवा आणि आकार
इतर झेन्ड्यान पेक्षा वेगळा आहे मात्र यामागे
प्राचीन
भारतीय विज्ञान आहे .
.
आकार :
इतर सर्व ध्वज हे आयाताकारी असतात पण
भगवा मात्र
दुहेरी त्रिकोण आकार आहे ..........!!! याचे
कारण असे
कि जोराने वारा वाहत
असताना वाऱ्याच्या घर्षणामुळे
आयाताकारी झेंडा लगेच फाटतो ..
.
मात्र भगव्याचा आकार
निमुळता त्रिकोणी असल्याने
वाऱ्याशी होणारे घर्षण खूप कमी होते
आणि वारा सहज
पार होतो परिणामी भगवा झेंडा कधी फाटत
नाही .......
.
रंग :
हिंदूंचा रंग भगवाच का ????????
कारण ........
जेव्हा सूर्य सकाळी उगवतो तेव्हा त्याचे तांबूस
चमकदार
बिंब पडत ..
तोच खरा भगवा रंग .....
अंधार हे पापाचे प्रतिक तर प्रकाश हे पाप
विरुद्ध
लढणाऱ्या सद्गुणांचे प्रतिक .......
अशा पापा विरुद्ध
लढणाऱ्या प्रकाशाच्या पहिल्या किरणाचा रंग
म्हणजेच
भगवा होय ............ अन्याय विरुद्ध
लढणाऱ्या पहिल्या शक्तीचे नेतुत्व
भगवा करतो ......
.
भगवा रंग उष्ण आहे . म्हणजे
तो मोठ्या प्रमाणावर
सूर्याची किरणे व
त्यांची शक्तीचा साठा करतो तसेच
त्याचे उत्सर्जनही करतो .......
त्यामुळे भगव्याच्या संगतीत
राहणाऱ्या व्यक्तींना त्या उर्जेचा सतत
पुरवठा राहतो आणि थकलेला पणा जाणवत
नाही ..........
म्हणूनच साधू आणि संत
भगवी कफनी परिधान
करतात
आणि अल्प आहार घेऊनही सर्व प्रवास
पायी करतात
आणि थकतही नाही ....
.
शिवरायांचे मावळे याच भगव्या खाली लढले
आणि सतत
विजयी झाले ...........
.
अर्थातच
दूरदृष्टी असणाऱ्या शिवरायांनी झेंड्याचा संपूर्ण
भगवा हाच रंग ठेवला ......

- अनामिक

Friday 7 March 2014

महाराजांचे सरनौबत

* तुकोजी चोर - ह्यांना सरनौबत केल्याचा उल्लेख फक्त सभासद बखरीत [पृ.९] आणि एका पत्रामध्ये आहे [राजवाडे खंड १७ लेखांक १०]. शिवाजीराजांचे जे मावळातील बालपणीचे मित्र त्यातील हे एक असावे ह्या व्यतिरिक्त ह्याचा उल्लेख सुभानमंगळ च्या लढाई संबंधी शिवभारतात येतो. तुकोजी सोबत एक भैरोजी चोर असेही नाव येते. तुकोजी नेमके पायदळाचे सेनापती होते की घोडदळचे हे मात्र माहितीच्या अभावे सांगता येत नाही. श्री शेजवलकर यांच्या अंदाजे तुकोजी यांचा मृत्यू ५७ च्या जुन्नर लुटीच्या झाला तोवर तुकोजी हे सरनौबत होते परंतु या विधानास त्यांनी कुठलाही आधार दिलेला नाही.
  * नुरखान बेग – ह्याचे नाव पुण्यात १६५७ साली झालेल्या एका निवाडपत्रात पायदळाचा सरनौबत म्हणून येते.शाहजीराजांनी शिवाजीराजांसोबत जी माणसे पाठवली त्यात हा असावा. ह्या पत्राच्या आधी किंवा नंतर याचा काहीही सुगावा लागत नाही पण १६५७ नंतर मात्र लगेचच ह्याला सरनौबतीवरून दूर करून त्याजागी येसाजी कंक ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुऴे नुरखान बेग सरनौबत होता का मुद्दाम कोणी ईतिहासात घुसवला हा मोठा प्रश्न ्
  * माणकोजी दहातोंडे – ह्यांचे नाव सभासद बखरीत तसेच ५७ च्या निवाडपत्रात आहे.हे देखील शाहजीराजांकडून आलेल्या मंडळींपैकी परंतु हे तर हुकुम मानीनासेच झाले तेव्हा शिवाजीराजांनी राजगडाच्या पायथ्याशी वसवलेल्याशिवपट्टण [आजचे पाल बुद्रुक] येथे त्यांना चौरंग [हात कोपरापासून व पाय घुडघ्यापासून छाटून टाकण्याची शिवकालीन शिक्षा ]  करून मारले अशी माहिती १७४० सालच्या एका विश्वसनीय यादीतून मिळते.
  * येसाजी कंक – राजगड नजीकच्या भुतोंडे गावचे सर पाटील असणारे येसाजी कंक म्हणजे शिवाजीराजांचे बाल सवंगडी.ह्या सवंगड्याने आपल्या जीवासर्शी वेळोवेळी अगदी अखेरपर्यंत स्वराज्याची साथ दिली, जवळ जवळ ३० वर्षे येसाजी पायदळाचे सरनौबत होते.अफजल प्रकरण, ७० चा वादळी पराक्रम, भागानगर भेट इत्यादी ठिकाणी ह्यांचे भरपूर उल्लेख आहेत. ह्यांचे पुत्र कृष्णाजी कंक हे शंभूकालात फोंड्याच्या लढाईत गोळा लागून पडले.ह्यांच्या सोबत एक कोंडाजी कंक असेही नाव येते परंतु त्याची अधिक माहिती मिळत नाही.
  * नेतोजी पालकर - नेतोजी चा उल्लेख आजवर इतिहासात नेताजी असा लिहिला गेला पण ते चूक आहे.समकालीन साधानाप्रमाणे नेतोजी हवे.ह्यांना १६५७ च्या सुमारास माणकोजी नंतर पागेची सरनौबाती मिळाली.दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी प्रती शिवाजीचीच उपमा मिळवली.पण स्वराज्याच्या कडक नियमात न बसणाऱ्या हलगर्जीपणामुळे त्यांना शिवाजीराजांनी “समयास कैसे पावला नाहीत ?” असा कौल लावीत दूर केले.हे मग अगोदर आदिलशाहित व तेथून मिर्जा राजाशी संधान बांधून मोगलाईत गेले व परत येवून शिखर शिंगणापूरला शुद्ध झाले परंतु शिवाजीराजांच्या मृत्यू पश्चात शहजादा अकबर प्रकरणानंतर केव्हातरी पुन्हा हे मोगलाईत गेले.
  * कडतोजी ‘प्रतापराव’ गुजर -ह्यांच्या नेमणुकीच्या बऱ्याच आख्यायिका आहेत.मिर्झा राजा जयसिंगावर छुपा हल्ला, मोगल सेनापतीची ह्यांनी व शिवाजीराजांनी केलेली एकाच वेळची लुट इत्यादी पण विश्वसनीय पुराव्या आधारे ह्यांना सरनौबाती आणि प्रतापराव किताब १६६६ मध्ये मिळाला तसेच दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी तो सार्थ ठरवला. बागलाण, औरंगाबाद स्वारी आणि इतर अनेक पराक्रम यांच्या वाटचे आहे.१६७४ मध्ये राजाभिशेकाच्या काही काल आधी बहलोल खान सोडल्या प्रकारणी शिवाजीराजांनी त्यांना “सला काय निमित्य केलात ?” असा करडा सवाल केला आणि “बहलोलखानास गर्दीस मेळवून मगच रायगडी आम्हास तोंड दाखवावे” असा कडक आदेश दिला आणि हाच राग मनी बाळगून महाशिवरात्री च्या दिवशी प्रतापराव आपल्या ६ सरदाराना सोबत घेवून बहलोल खानवर तुटून पडले आणि वीरगतीस प्राप्त झाले.
  * हंसाजी ‘हंबीरराव’ मोहिते – हंबीरराव माणूस तसा रांगडा परंतु स्थिर बुद्धीचा.शंभूकालात जी मोगली वावटळ उठली त्यात सगळ्यात महत्वाची कामगिरी कुणी केली असेल तर ती हंबीरराव मोहित्यांनी. प्रतापरावांच्या नंतर कुणास सरनौबती द्यावी या विचाराने शिवाजी महाराज चिपळूणला असणाऱ्या आपल्या फौजेचा कौल घेऊन आले आणि त्यांनी हंबीरराव यांना सरनौबत केले.हे शिवाजीराजांच्या अखेरपर्यंत घोडदळचे सरनौबत होते.हंबीरराव पुढे शंभूकाळात शर्जाखानाच्या  लढाईत वाई इथे गोळा लागून पडले.

Thursday 6 March 2014

शिवा काशिदांचा असामान्य त्याग

सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद
तयार होत होता तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात
पाणी आल,तेव्हा शिवा काशीद ने विचारल,
"राजे तुमच्या डोळ्यात आसु"
तेव्हा राजे म्हणाले
"शिवा तु हा पोशाख परीधान केला आहेस याच
बक्षिस काय मिळणार माहीत आहे तुला"
शिवा काशिद म्हटले
" होय राजे मला माहीत आहे,शत्रुच्या वेढ्यात
गेल्यावर शत्रु मला खतम करणार आहे,पण
शत्रु मला मारताना शिवा काशिद म्हणुन
मला मारणार नाही तर शिवाजी राजा म्हणुन
मला मरायची संधी मिळतीये राजे
ही संधी दौडीन मी ??? "
किती सामर्थ्य आणि त्याग
होता शिवा काशिदांच्या बोलण्यात,
पोस्ट टाकताना पण डोळ्यात पाणी आल,राजे
तुमचा भगवा मरेपर्यँत खांद्यावरुन
खाली ठेवणार नाही आणि ठेवलाच तर
माझ्या पिँडाला कावळा शिवणार नाही,हे
तुमच्या आणि ज्ञात अज्ञात
मावळ्यांची आण घेवुन सांगतो.
" हातात चिंध्या बांधून
           मैत्री करणारी आमची जात नाही
       '' वेळेप्रसंगी मित्राच्या छाती         वरचा घाव
            झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही "
    " Maharshtra  मधली पोर आम्ही "
           " झुंज आमची वाघाशि "

" न्यायासाठी लढतो आम्ही "

       " नाते आमचे त्यागाशी "   "                    माणुसकी आमची जात "
       " मराठी आमचाथाट "
मराठ्यांची पोरं...
एकदा का तलवारी...
चालवायला शिकली कि...
पुन्हा माग फिरत नाही कारण...
आम्ही सांडलेल्या रक्ताचा हिशोब कधीच
करत नाही ll
JAY MAHARASHTRA...

दुर्गामाता दौड़

“दुर्गामाता दौड” या शब्दातच या शब्दाची ताकत आणि सारा अर्थ सामावलेला आहे. पृथ्वीतलावर जेंव्हा जेंव्हा संकट येते, जेंव्हा जेंव्हा म्लेंच्छाची गर्दी होते तेंव्हा तेंव्हा आई जगदंबा दुर्गेचा अवतार घेते. याच दुर्गेच्या नावाने गुरुवर्य संभाजी राव भिडे गुरुजींनी सुरु केलेली हि दौड म्हणजे हिंदूधर्म रक्षितेच प्रतिक, शिवरायाच्या अपार पराक्रमाची गाथा, आणि झोपलेल्या हिंदूला खडबडून जागे करण्याची धमक या दौडमध्ये दिसली.

अशीच एक दौड काल दादर येथे निघालेली

आई जगदंबेचा उदो उदो

आई भवानी मातेचा उदो उदो

आई दार उघड आई दार उघड

|| पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ||

|| धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ||

|| भारत माता की जय ||

|| हिंदू धर्म की जय ||

अशा गर्जनेत निघालेल्या या दौडीत भगव्या ध्वजाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या बाजी, तानाजी, फिरंगोजी नरसाळे, मुरारबाजी, प्रतापराव गुज्जर, असामान्य त्याग करणारे शिवा काशीद यांच्यासारख्या तमाम वीरांचा जयघोष करत, प्रत्येक मावळा अभिमानाने छाती फुलवत आजच्या हिंदू धर्माच्या वारसांच्या डोळ्यात अंजन घालत होता.

भारत हिंदुस्तान है

हिंदू ओंकी शान है

हे वचन रक्तात भिनवणारी हि दौड म्हणजे राष्ट्राला आणि अटकेपार झेंड्याला मुजरा करणारी दौड ठरली.

“महामंत्र आहे नव्हे शब्द साधा |

जयांच्या स्मृतीने जळे म्लेंच्छबाधा

नुरे देश अवघा जायचे अभावी |

शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी”

शिवरायांसारखं रत्न या भारतभूमीला लाभण, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येण हि साधी सोपी गोष्ठ नाही. हा एक ज्वलंत इतिहास पराक्रमाचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा, या सह्याद्रीचा आणि सह्याद्रीत छातीची ढाल करणाऱ्या मावळ्यांचा.

पुन्हा शिवाजी जन्माला यावा अस प्रत्येकाला वाटत असेल तर, हिंदूधर्म रक्षण करण गरजेच आहे. इतिहासातला शिवराय अजूनही जिवंत आहे आणि सूर्य चंद्रा सोबती जिवंतच राहील आणि तो आजच्या तरुण, बाल दोन्ही पिड्यांच्या नसानसांत आपल्याला पोहचवायचाय

आणि याच शपथेवर आज संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात दुर्गामाता दौड होणे जरुरी आहे.

गुरुवर्य भिडे गुरुजी म्हणतात….

आज पुन्हा आपणाला या भारत भूमीला श्री.शिवाजी महाराजांची गरज आहे.आपले सारेच नेते नाकर्ते आहेत हे आपल्याला हि ठावूक आहेमग ह्या राष्ट्राप्रती आपल काही देण लागत का नाही?रोग होवू नये यासाठी ईलाज करावा लागेल म्हणजे,,,,,आपल्यात जिजामाता जागवावी लागेल राजे शहाजी जागवावे लागतील,,,तर आणि तरच देशाचा आणि पर्यायाने आपलाआपल्या मुलाबाळांच उज्ज्वल भवितव्य घडवता येईल,,,,,,
लक्षात ठेवा छत्रपतींच्या सारखा नेता लाभला तर शेळ्या मेंढ्यांच लाचार जीण जगणारी हि प्रजा तिने महाराजां नंतर हि औरंगजेबास जेरीस आणल,,,,,,अटकेपार भगवा फडकवला.
तेव्हा या सारे सारे या या दौडीत सामील व्हामहाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्या हाकेला ओ देईल,,,
“एक शिवाजी महाराज  जर ईतक काही करू शकतात तर आपणात
प्रत्येकात एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..!”

कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती |
रणी झेलतो सिंहासा छातीवरती ||
हाकारूनी आव्हानतो जो यमाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

दिला एकदा शब्द न पालटावा |
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ||
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला |

मराठा म्हणावे अशा वाघराला ||

लेखक - गणेश पावले