मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Tuesday 23 September 2014

""जय शिवराय"" म्हटले की माणसाला माणुसकीची जाणिव होते

""जय जिजाऊ"" म्हटले
की माणसाला माणसाची ओळख होते.
""जय शिवराय"" म्हटले
की माणसाला माणुसकीची जाणिव होते.
""जय शंभुराजे"" म्हटले
की माणसाला माणसाची धमक कळते.

जय जिजाऊ...
जय शिवराय.....
जय शंभुराजे.......

Wednesday 6 August 2014

विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,

विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा'
मध्ये म्हणतो,
"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते.
एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता.
मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच.
ती चंद्राची सखी असते.
मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो,
तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत
होते.
मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू
तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो.
अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते;
धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते.
" पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार
नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात.
किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे
मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो.
या लष्कराने आणि शिवाजीने
आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून
काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले
आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला.
त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत
राहिले."

Wednesday 30 July 2014

शिवजयंती तिथिनुसारच का? जरुर वाचा

मला खुप कळते किवा माहिती आहे अस मी
म्हणार नाही.
पण नीट पहा,

संक्रांत - तिथीनुसार

गणेश जयंती - तिथीनुसार

शिवरात्र - तिथीनुसार

होळी - तिथीनुसार

रंगपंचमी - तिथीनुसार

गुडीपाडवा - तिथीनुसार

रामनवमी - तिथीनुसार

हनुमान जयंती - तिथीनुसार

अक्षय तृतीया - तिथीनुसार

वटपौर्णिमा - तिथीनुसार

आषाढी एकादशी - तिथीनुसार

गुरुपौर्णिमा - तिथीनुसार

नागपंचमी - तिथीनुसार

रक्षाबंधन - तिथीनुसार

कृष्जन्म - तिथीनुसार

दहीहंडी - तिथीनुसार

गणपती उत्सव - तिथीनुसार

पित्र - तिथीनुसार

बैलपोळा - तिथीनुसार

नवरात्र - तिथीनुसार

दसरा - तिथीनुसार

कोजागिरी - तिथीनुसार

दिवाळी - तिथीनुसार

भाऊबीज - तिथीनुसार

कार्तिक एकादशी - तिथीनुसार

तुलसीविवाह - तिथीनुसार

कालभैरव नाथ जयंती - तिथीनुसार 

देव दिवाळी - तिथीनुसार

दत्तजयंती - तिथीनुसार

अगदी
गुरुनानक जयंती - तिथीनुसार

ईद - तिथीनुसार

जर सगळ्या देवांचे सन तिथीनुसार
होतात

आणि मग शिवाजी महाराजांची
जयंती तिथीनुसार का करत नाही.

आणि हो
माझ्या साठी
माझे महाराज देवच आहेत.

हिंदूचा देव .





आणी ह्या देवाची जयंती
तिथीनुसार करावी
हे माझ व्यतिगत मत आहे.

जय हिंद - जय महाराष्ट्र .
माझा राजा भले देव नाही
पण माझा राजामुळे आज देवळात देव आहे...!!!

Monday 14 July 2014

वाघनख

            

*** वाघनख ***

हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठित धरून वापरायचे शस्त्र आहे. याला वाघाच्या नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व् मुठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे हत्यार हातामधे धारण करून मुठ बंद केल्यावर बोटात अंगठ्या (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठ्या आतील बाजूने एका धातूपट्टीने जोड़लेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. या शस्त्राचा उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा अश्याच शस्त्राने बाहेर काढला.

संग्राहक:
परशुराम जगन्नाथराव चव्हाण
शिवमुद्रांकन

Wednesday 9 July 2014

जसे पंढरपूर चा पांडुरंग तसे रायगडचे शिवराय

जसे पंढरपूर चा पांडुरंग
तसे रायगडचे शिवराय

जसे वारकरी तसे मावळे धारकरी

जसी विणा
तसी तलवार

जसे टाळ तसी ढाल

जसे ज्ञानोबा तुकोबा
तसे तान्हाजी बाजी

जसे राम कृष्ण हरी
तसे हर हर महादेव

मेनाहुनी मउ आम्ही विष्णू दास
कठीण वज्रास भेदु ऐसे.

भेदाभेद भ्रम अमंगळ

विठ्ठल विठ्ठल

जय शिवराय

Tuesday 8 July 2014

औरंग्याची उतरवीली नशा, असा झुंजला दाही दिशा...

औरंग्याची उतरवीली नशा,
असा झुंजला दाही दिशा...
फितुरांची करुन दशा,
बोले तलवारीची भाषा...
रुद्राचा आवतार
वाघाचा ठसा होता,
आ रे विचारा त्या सह्यांद्रीला... .
राजा संभाजी कसा होता !!!!

- अनामिक
शंभु राजे.......

तेज तेज अन् तेज घेऊनी,सौदामिनी ती लखलखली। त्या चपलेचे तेज घेऊनी,वीरश्री तव धगधगली।

तेज तेज अन् तेज घेऊनी,सौदामिनी ती लखलखली।
त्या चपलेचे तेज घेऊनी,वीरश्री तव धगधगली।

त्या बिजलीचा लोळ दिसावा महाराष्ट्राच्या भूमीत।
सळसळते समशेर शंभूची,या महाराष्ट्राच्या भूमीत।।

मरणाला त्या मिठीत घेऊन मोक्षाला गेला येथे।
ज्वलज्ज्लन तेजस राजे गौरविला गेला येथे।

जिथे जाहले रूधीर पावन हौतात्म्याच्या यज्ञात।
मुजरा करीतो तुम्हास शंभुराजे या महाराष्ट्राच्या भूमीत,

या महाराष्ट्राच्या भूमीत।।
__/\__

जय रौद्र शंभुराजे

उपकार आईसाहेब जिजाऊंचे म्हणुन महाराष्ट्राच्या मातीत आहोत........॥

��॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥��

उपकार आईसाहेब जिजाऊंचे
म्हणुन महाराष्ट्राच्या
मातीत आहोत........॥
पराक्रम "राजे"शिवछत्रपतिंचा"
म्हणुन वाघाच्या कातीत
आहोत........॥
बलीदान शंभुराजांचे
म्हणुन मराठ्यांच्या जातीत
आहोत.......॥
ईतिहास आम्हा मराठ्यांचा
म्हणुन हिंदुस्थानाच्या छातीत
आहोत......॥
॥ जय महाराष्ट्र ॥
॥ॐ॥"हर हर महादेव"॥ॐ॥
॥ जय भवानी ॥
॥ जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभुराजे ॥ जयस्तु मराठा ॥

अंभगाचा जिव्हाळा तु.... डोंगर माथ्याचा पन्हाळा तु.... जागतीक किर्तिचा धुरंदर तु.... प्रौढप्रताप पुरंदर तु....

��॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥��

मंदिराचा कळस तु.....
अंगनातील तुळस तु.....
ग्रिष्मात फुललेला पळस तु.....
शिवशाहीची ओळख तु.....
गारव्याची झुळुक तु.....
मराठी मुलुख तु.....
अंतरीचे बोल तु.....
कष्टाच मोल तु.....
मैदानी तोफ तु.....
क्रांतीच रोप तु.....
दरावाजा बुलंद तु.....
गुलामगीरीला पायबंद तु.....
फौलादी साखळदंड तु.....
मोगला विरुध्द बंडतु.....
हिमालयाहुन उंच तु.....
निष्ठावानांचा संच तु.....
भगवा यलगार तु.....
स्वातंत्र्याचा दरबार तु.....
हिंदुस्थानाचा प्राण तु....
भगव्याची शान तु....
महाराष्ट्राचा पहिला मान तु....
या मातीची आण तु....
वाघाची गर्जना तु....
गाईच दुध तु....
मकरांदाचा मध तु....
डफावरची थाप तु....
चांदण्याचे मोजमाप तु....
अठवणीचा बांध तु....
टाळ चिपळ्यांचा नांद तु....
मराठीच दैवत तु....
दौलतीचा नौबत तु....
सळसळनारा वारा तु....
सागराचा किनारा तु....
चंदनाची शितलता तु....
शिल्पकाराची कुशलता तु....
प्रत्येकाचा भविष्यकाळ तु....
विजयाची माळ तु ....
आमच्यावरचे उपकार तु....
वसुधंरेचा सत्कार तु ....
स्वताःच एक चमत्कार तु....
दैवाचा साक्षात्कार तु .....
सावली घनदाट तु ....
मावळ्याची गडवाट तु....
पाखराचे घरटे तु ....
महाराष्ट्राचे मराठे तु....
वासराची गाय तु ....
अनाथांची माय तु ....
छातीची कमान तु....
मातीची तहाण तु....
मराठ्यांचा उध्दार तु....
जगाचे प्रवेशव्दार तु....
स्वराज्याची मुहुर्त मेढ तु....
मानबिंदु रायगड तु....
दौलतीचा धुरकरी तु....
जन्मताच शिवनेरी तु....
अंभगाचा जिव्हाळा तु....
डोंगर माथ्याचा पन्हाळा तु....
जागतीक किर्तिचा धुरंदर तु....
प्रौढप्रताप पुरंदर तु....
सत्सगांचा मार्ग तु....
विजय सिंधुदुर्ग तु...
विशालगडाचा बुरुज तु....
गरजुची गरज तु....
संस्काराचा धडा तु....
सह्यान्द्रिचा कडा तु....
कर्तुत्वाचा धनी तु....
सागराच पाणी तु....
पंढरीचा संत तु....
विशाल आसमंत तु....
पाठीवरची ढाल तु....
अजिंक्य तलवर तु....
समर्थक खंदा तु....
लाखाचा पोशिंदा तु....
रणमर्द मराठा तु....
अठवणीचा साठा तु....
गनिमी काव्यात माहिर तु....
शब्दांचा शाहिर तु....
मांगल्याची स्वप्नंपुर्ति तु....
देव्हाऱ्यातील मुर्ति तु....
बहरलेला माळ तु....
दाटलेल आभाळ तु....
वादळाचे तुफाण तु....
समुद्राचे उफान तु....
झाडांची हिरवळ तु....
सुंगधाची दरवळ तु....
आन्यायावीरुध्द आग तु....
जातिवंत वाघ तु....
संकटात बळ देनारा भास तु....
जगात एकमेव खरा ईतिहास तु....
धमन्यातल रक्त तु....
दिल्लीच तख्त तु....
यशकिर्तिचा भक्त तु....
राजा एकटा फक्त तु....
राजाधिराज तु....
पहिला युवराज तु....
श्रीमंत श्री श्रीमान योगी तु....
सर्व सुखाचा त्यागी तु....
भुपती तु....
जलपती तु....
गढपती तु....
गजपती तु....
अश्वपती तु....
रयतेचा प्रजापती तु....
"राजा शिवछत्रपती" तु....
"राजा शिवछत्रपती"तु....

!!"जय जिजाऊ"जय शिवराय"!!

Monday 7 July 2014

८ जुलै - त्रिखंडात गाजलेली स्वा. विर सावरकरांची मार्सेलिसची उडीः अर्थातच साहसदिन : स्वातंत्र्य विर सावरकरांना विनम्र अभिवादन.

ही अशी उडी बघताना ।
कर्तव्य मृत्यू विसरला ॥
बुरुजावर फडफडलेला ।
झाशीतील घोडा हसला॥ १॥

वासुदेव बळवंतांच्या ।
कंठात हर्ष गदगदला ॥
क्रांतीच्या केतूवरला ।
अस्मान कडाडून गेला ॥ २ ॥

दुनियेत फक्त आहेत ।
विख्यात बहाद्दर दोन ॥
जे गेले आईकरिता ।
सागरास पालांडुन ॥ ३ ॥

हनुमंतानंतर आहे ।
या विनायकाचा मान ॥
लावुनिया प्राण पणाला ।
अस्मान कडाडून गेला ॥ ४॥

८ जुलै - त्रिखंडात गाजलेली स्वा. विर सावरकरांची  मार्सेलिसची उडीः  अर्थातच साहसदिन :
स्वातंत्र्य विर सावरकरांना विनम्र अभिवादन.

दिनांक 08/07/1910 या रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अटकेत असताना मार्लेसिस बन्दरजवळ त्यांनी जहाजाच्या पोर्ट हॉलमधून समुद्रात उडी मारली

आजच्या दिवशी
म्हणजे दिनांक 08/07/1910 या रोजी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मारिया बोटीवरुन स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनमधे अटक करुन हिंदुस्थानात नेले जात असतांना
मार्लेसिस बन्दरजवळ त्यांनी जहाजाच्या पोर्ट हॉलमधून समुद्रात उडी मारली ।

त्यांच्या या शौर्यास आणि त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन.

।। जय सावरकर ।।

लढतं रहा... मेलो तरी बहत्तरं, पण!"अन्याय" सहन करणारं नाही... "परिस्थितीला" शरण जाणारं नाही...

"तलवारं" तुटली हरकत नाही,
"बाण"घेऊन लढा...
"बाण" संपले हरकत नाही,
कमरेचा "दानपट्टा" काढा...
"दानपट्टा" संपला हरकत नाही,
हाताची "तलवारं" आणि छातीची "ढालं" करा...

पण! लढतं रहा...
मेलो तरी बहत्तरं,
पण!"अन्याय" सहन करणारं नाही...
"परिस्थितीला" शरण जाणारं नाही...
जय जय शिवराय।

Sunday 6 July 2014

सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद तयार होत होता तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात पाणी आल,तेव्हा शिवा काशीद ने विचारल,

सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद
तयार होत
होता तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात
पाणी आल,तेव्हा शिवा काशीद ने
विचारल,
"राजे तुमच्या डोळ्यात आसु"
तेव्हा राजे म्हणाले
"शिवा तु हा पोशाख परीधान
केला आहेस
याच
बक्षिस काय मिळणार माहीत आहे
तुला"
शिवा काशिद म्हटले
" होय राजे मला माहीत
आहे,शत्रुच्या वेढ्यात
गेल्यावर शत्रु मला खतम करणार आहे,पण
शत्रु मला मारताना शिवा काशिद
म्हणुन
मला मारणार नाही तर
शिवाजी राजा म्हणुन
मला मरायची संधी मिळतीये राजे
ही संधी दौडीन मी ??? "
किती सामर्थ्य आणि त्याग
होता शिवा काशिदांच्या बोलण्यात,
पोस्ट टाकताना पण डोळ्यात
पाणी आल,
राजे
तुमचा भगवा मरेपर्यँत खांद्यावरुन
खाली ठेवणार नाही आणि ठेवलाच
तर
माझ्या पिँडाला कावळा शिवणार
नाही,हे
तुमच्या आणि ज्ञात अज्ञात
मावळ्यांची आण घेवुन सांगतो.
" हातात चिंध्या बांधून
मैत्री करणारी आमची जात नाही
''
वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव
झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही "
" Maharshtra मधली पोर आम्ही "
" झुंज आमची वाघाशि "
" न्यायासाठी लढतो आम्ही "
" नाते आमचे त्यागाशी " "
माणुसकी आमची जात "
" मराठी आमचा थाट "
मराठ्यांची पोरं...
एकदा का तलवारी...
चालवायला शिकली कि...
पुन्हा माग फिरत नाही कारण...
आम्ही सांडलेल्या रक्ताचा हिशोब
कधीच
करत नाही ll
वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत
वाघ
असून चालत नाही
त्यासाठी अंगात शिवाचा अंश
असावा लागतो …
रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ
वळवून चालत नाही
त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद
असावा लागतो..
अरे लढाया खुल्या मैदानात असोत
किंवा खवळलेल्या सागरात
जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ
असावा लागतो ..
स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं
काम
न्हाय
त्यासाठी रक्ताचा अभिषेक
करावा लागतो..
लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून
चालण न्हव

त्यासाठी शत्रू सोडाच
त्याच्या घोड्यालाही पाण्यात
दिसावं
लागतं..
आग्राहून सुटका
आणि शास्तेखनाची फजिती..
अहो राजा होण्यासाठी
अफजाल्यासारख्या
पाप्याला वाघासारख
फाडावं लागतं..
वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच
महत्व
यायला
माझ्या राजांसारख
रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे
असावं लागतं…
॥॰ एकच विचार एकच प्रचार
तोही सातासमुद्रापार....॰॥
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय...!
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण हिंदू धर्म सोडणार नाही. "
ll जय भवानी ll ll जय शिवराय ll
माघार घेणे हे मावळ्यांच्या रक्तात
नाही
!!
दम असेल थोडीसी लाज वाटत असेल त
नक्की तिघांना तरी पाठवा तितकीच
मनाला शांती मिळेल

Friday 4 July 2014

मर्दाची तुटली बघारं ढाल | रक्तानं शरीर झालं लाल ||

मर्दाची तुटली बघारं ढाल |
रक्तानं शरीर झालं लाल ||
हाताला गुंडाळितो शाल |
झेलितो वार, वार बघा तलवार ||

किल्ला हा कोंढाणा श्रेष्ठ |
रक्षक उदयभान दुष्ट ||
करतो अबलांना भ्रष्ट |
तयाला करावया नष्ट ||
निघाला तान्हा हा झुंजार |
झेलितो वार वार बघा तलवार ||

मराठे मोगलास भिडले |
कैक चे धडशिर उड़ले ||
कैक ते धरणीवर पडले |
कैक ते दबा धरून बसले ||
गातो थोडासा आधार |
झेलितो वर वार बघा तलवार ||

बघा त्या कोंढाण्यावरती |
रक्तानं लाल झाली धरती ||
मराठे मागे ना फिरती |
वर्णु मी काय त्यांची किर्ती ||
शोधीतो थोडासा आधार |
झेलितो वार वार बघा तलवार ||

शिवबा म्हणे सिंह गेला |
अवघा महाराष्ट्र रडला ||
तुकड्या पुढे हेच गाणार |
झेलितो वार वार बघा तलवार ||

- अनामिक 

आज आषाढ शुक्ल अष्टमी , शालिवाहन शक १९३४ (शिवशक ३४१) !!! जागतिक महाशुद्धीकरण दिवस!!! याच दिवशी, शालिवाहन शके १५९८ ला एका अवलियाने घाट घातलेला- महाशुध्दीकरणाचा!!!

आज आषाढ शुक्ल अष्टमी , शालिवाहन शक १९३४ (शिवशक ३४१) !!! जागतिक महाशुद्धीकरण दिवस!!!
याच दिवशी, शालिवाहन शके १५९८ ला  एका अवलियाने घाट घातलेला- महाशुध्दीकरणाचा!!!

नेतोजी पालकर  (नेताजी नव्हे) हे नाव ठाऊक नाही असा मराठी माणुस नाही! जन्मगांव शिरूर ते पार काबुल कंदहार पर्यंत अतुलनीय शौर्य गाजवून आलेला हा महापराक्रमी योद्धा! किती पराक्रमी? की याला प्रतिशिवाजी असे नाव पडावे!!!
पण आपल्याला नेतोजी प्रकरण नीट समजलेच नाही की काय असे कधी कधी वाटते! नेतोजींचा पराक्रम एकवेळ बाजूला ठेऊया. परंतु या प्रकरणात शिवराय कसे वागले? हे अपार महत्वाचे आहे!!!

नेतोजीचा महंमद कुलीखान केला गेला व  तब्बल ९ वर्षे त्यांना इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे वागवले गेले, नाचवले गेले, दमविले गेले तरीही महाराजांनी त्यांच्यातली आशा सोडून दिली नाही!!!
जेंव्हा औरंग्याचा विश्वास संपादन करून अल्लाचा हा नेक (?) बंदा दक्खनला मोहीमेवर आला तेंव्हा शिवरायांनी नेमकी संधी साधून त्यास बोलाविले व तत्काळ हिंदू करून घेतले!! तोच हा दिवस!!!
तोवर असे शुद्धीकरणाचे विधीच कुणी हिंदू धर्मात करीत नव्हते! त्या प्रथेचे महाराजांनी पुनरुज्जीवन केले! समाजाला एक नवीच चेतना दिली, की अरे आपल्यासाठी जुन्या घराची दारे अजून उघडी आहेत!

सनीतन्यांना महाराजांनी त्याकाळी नक्कीच प्रबोधित तरी केले असेल किंवा गप्प तरी! धर्म महत्वाचा! स्वधर्म महत्वाचा!!!
"स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह:।"
या भगवद्गीतेतील वाक्याचा जिवंत नमुना म्हणजे नेतोजी प्रकरण व त्यात शिवरायांनी जातीने दाखविलेले स्वारस्य!! राजाच पुढाकार घेतो आहे हे कळाल्यावर त्या कळात अशी अनेक शुद्धीकरणे नक्की झाली असतील!!!

शिवराय जर सर्व धर्म समभाव मानत असते तर त्यांनी नेतोजीस महंमद कुली खान म्हणूनच स्वीकारला असता ना! कशाला हा खटाटोप केला असता? पण आज आपल्याला महाराजांहून अधिक अक्कल आली आहे अशा आविर्भावात महाराजांना सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष दाखविण्याचा आटापिटा काही लोक करताना दिसतात, त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीव करावीशी वाटते!
साधे गणित आहे! सर्वधर्म समान असते तर एकच धर्म अस्तित्वात असता ना! काहीतरी भेद आहेत म्हणुन तर इतके धर्म आहेत!
असो,

तात्पर्य: शिवरायांच्या माणसासाठी नेतोजी हा नेतोजीच! महंमद कुलीखान चालणार नाही! महाराजांनाही चालला नाही, आम्हालाही चालणार नाही.

Tuesday 1 July 2014

कविराज भूषण रायगडी असताना असाच पाऊस आला असावा या पावसाला बघून भूषण म्हणत आहेत

कविराज भूषण रायगडी असताना असाच पाऊस आला असावा या पावसाला बघून भूषण म्हणत आहेत  :-

चमकती चपला न फेरत फिरंगै भट इंद्र की न चाप रूप बैरख समाज कौ |
धाए धुरवा न छाए धूरी के पटल मेघ गजिबौ न साजिबौ है दंदुभी आवाज कौ |
भ्वैसिला के डरन डरानी रिपुरानी कहै पिय भजौ देखि उदौ पावस की साज कौ |
घन की घटा न गजघटनि सनाह साज भूषण भनत आयौ सैन सिवराज कौ ||
:- कविराज भूषण

अर्थ :-

ही चमकणारी चपला(विज) नव्हे. या विरांच्या सळसळणा-या तलवारी आहेत. हे इंद्राचे धन्युष्य नव्हे, हा तर सैन्याचा झेंडा आहे. हे ढग नाहीत. ही तर सैन्याच्या हालचालीमुळे उठलेली धूळ आहे. ही मेघ गर्जना नाही. हा रणवाद्यांचा घोष आहे. तो मेघसमुदाय नाही, तर कवचांनी सिध्द झालेले हत्ती आहेत. शिवरायांच्या या भिषण रणघोषाने भेदरलेल्या शत्रुस्त्रिया आपल्या सख्यांना म्हणत आहेत की, ही पावसाची चिन्हे नाहीत. हा तर शिवरायांच्या सैन्याचा हल्ला यावयाची चिन्हे आहेत.

Monday 30 June 2014

मराठा


छाती पहाडी
भाळी चंद्रकोर
आग रक्तात
हाती तलवार

मुखी शिवनाम
हर हर महादेवाचा गजर
दौडतो सह्याद्रित
मराठ्याचा पोर

जय शिवराय

- प्रदिप फोंडके

शिवछत्रपती | लोकराजा खरा प्रेरणेचा झरा | स्वातंत्र्याचा ||

गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा
पिडीतांचा राजा | शिवराय ||
गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू
शोषकांचा शत्रू | शिवराय ||
थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा
भक्त समतेचा | शिवप्रभू ||
मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी
धर्मांतरबंदी | मोडितसे ||
स्त्रियांचा कैवारी | पुत्र जिजाऊंचा
पालक प्रजेचा | निष्ठावंत ||
मानवताभक्त | थोर शिवराय
न दे अंतराय | नीतीतत्वा ||
सामान्या प्रतिष्ठा | दिली शिवबाने
जिजाऊंचे स्वप्नं | खरी केली ||
शिवछत्रपती | लोकराजा खरा
प्रेरणेचा झरा | स्वातंत्र्याचा ||

- अनामिक

म्हणून रोज शिवरायांच्या पाया पडतो आणि तलवार घेऊन फिरतो...।।

आईने सांगितले की
दररोज देवाच्च्या पाया पडायच
आणि देवा सारख राहयच....।

म्हणून रोज शिवरायांच्या पाया पडतो
आणि तलवार घेऊन फिरतो...।।

जय शिवराय
जय शंभूराजे

- अनामिक े

Sunday 29 June 2014

वाघच होता कापत सुटला मुघलांना तरी औरंग्या नुसता बघत होता

छत्रपती शिवाजी महाराज

वाघच होता..
कापत सुटला मोगलाना तरी
औरंग्या नुसता
बघत होता..

पराक्रम ऐसा नजर फिरली
ती विजयाची दिशा
होती..
रयतेच्या सुखासाठी त्याला
सत्तेची नशा
होती..

ज्याच्या पराक्रमाने फाटले
आभाळ..
औरंग्याच्या काळजात केला
जाळ..
भासला ऐसा महाकाळ..
करुन गेला मृत्युलाही
घायाळ..

गाजवीली रणांगने ऐसा
दिमाखदार होता..
वचनाला जागलेला वतनाचा
वतनदार होता..

गर्जला मराठा छावा..
वाटला देवाला हेवा..
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय शंभुराजे...

Friday 21 March 2014

मराठा म्हणजे जणु "जाळ" आहे. जो सह्याद्रीचा "बाळ" आहे

जय शिवराय मराठ्यांनो
मराठा म्हणजे जनु
"जाळ" आहे
जो सह्याद्रीचा "बाळ" आहे
यवनांसाठी "काळ" आहे
ज्याच्या गळ्यात
सदैव विजयाची "माळ" आहे
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभुराजे॥
॥ एकच आवाज तो
ही मराठ्यांचाच ॥
"एक जातीवंत विद्रोही मराठा"

- अनामिक

महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो…

महाराष्ट्राच्यामाती
मधुनी आवाज उठतो…
मराठीचा सह्याद्रीच्या रांगा मधूनी
सूर्य उगवतो मराठीचा कीती ही
डोंगर पोखरले परक्यांनी तरी ही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटा मध्ये
घुमतो आवाज मराठीचा एकतेची
साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द
चिंगार आवाज मराठीचा संस्कार
दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार
तळपते रणांगणात गर्जतो यलगार
मराठीचा गरजले परके सारे जरी
घरात आपापल्यान भी उठतो बुलंद
आवाज हाललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत,
बाणा मराठीचा...
झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभुराजे !!

संभाजी म्हणजे स्वराज्याचे भगवे वादळ

|| संभाजी म्हणजे स्वराज्याचे भगवे आभाळ
अन्यायाविरुध्द काळजात पेटलेला जाळ ||
------------------------------
दुनिया ज्याला भिते त्या मृत्युला तु नमवीले........
हि तुझी खासियत ........
फेडले आभाळाचे उपकार........
राखली मराठ्यांची रियासत........
सह्यांद्रिचा सिंह तु........
महाराष्ट्र देशाचा राजा........
फितुर झाले स्वराज्यात सख्खे........
तरी एकटा लढला बाप माझा........
झंजावात असा मिरविला........
ओलांडले अग्निच्या दरीयाला........
नतमस्तक आजही जग........
पाहुन अलौकिक धर्याला........
गुनवान पंडित असा........
शुरविर हा रांगडा........
जन्मला नहि असा पुत........
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा........
झुकली आज ति वसुंधारा........
३३ कोटि देवांचा तुला झाला रे मुजरा........
हसल्या त्या चांदण्या चंद्र आकाशतला........
पाहुन तेजपुंज शंभुच्या पाळण्यातला........
तु होता म्हणुन आहे मि........
या स्वातंत्र्याचा तुच जबाबादार........
मान शेकडो पीढ्यांचा तुझा........
तुच खरा या मराठा दौलतीचा एकमेव वारसदार........

श्रीमान छत्रपति संभाजी राजे !!
दौलतीच्या धाकल्या धन्याला
मानाचा त्रिवार मुजरा __/|\__

जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....!!

- अनामिक

आपला भगवा झेंडा.... भगवाच का ?

हिंदू आणि शिवराय यांच्या झेंड्याचा रंग
भगवा आणि आकार
इतर झेन्ड्यान पेक्षा वेगळा आहे मात्र यामागे
प्राचीन
भारतीय विज्ञान आहे .
.
आकार :
इतर सर्व ध्वज हे आयाताकारी असतात पण
भगवा मात्र
दुहेरी त्रिकोण आकार आहे ..........!!! याचे
कारण असे
कि जोराने वारा वाहत
असताना वाऱ्याच्या घर्षणामुळे
आयाताकारी झेंडा लगेच फाटतो ..
.
मात्र भगव्याचा आकार
निमुळता त्रिकोणी असल्याने
वाऱ्याशी होणारे घर्षण खूप कमी होते
आणि वारा सहज
पार होतो परिणामी भगवा झेंडा कधी फाटत
नाही .......
.
रंग :
हिंदूंचा रंग भगवाच का ????????
कारण ........
जेव्हा सूर्य सकाळी उगवतो तेव्हा त्याचे तांबूस
चमकदार
बिंब पडत ..
तोच खरा भगवा रंग .....
अंधार हे पापाचे प्रतिक तर प्रकाश हे पाप
विरुद्ध
लढणाऱ्या सद्गुणांचे प्रतिक .......
अशा पापा विरुद्ध
लढणाऱ्या प्रकाशाच्या पहिल्या किरणाचा रंग
म्हणजेच
भगवा होय ............ अन्याय विरुद्ध
लढणाऱ्या पहिल्या शक्तीचे नेतुत्व
भगवा करतो ......
.
भगवा रंग उष्ण आहे . म्हणजे
तो मोठ्या प्रमाणावर
सूर्याची किरणे व
त्यांची शक्तीचा साठा करतो तसेच
त्याचे उत्सर्जनही करतो .......
त्यामुळे भगव्याच्या संगतीत
राहणाऱ्या व्यक्तींना त्या उर्जेचा सतत
पुरवठा राहतो आणि थकलेला पणा जाणवत
नाही ..........
म्हणूनच साधू आणि संत
भगवी कफनी परिधान
करतात
आणि अल्प आहार घेऊनही सर्व प्रवास
पायी करतात
आणि थकतही नाही ....
.
शिवरायांचे मावळे याच भगव्या खाली लढले
आणि सतत
विजयी झाले ...........
.
अर्थातच
दूरदृष्टी असणाऱ्या शिवरायांनी झेंड्याचा संपूर्ण
भगवा हाच रंग ठेवला ......

- अनामिक