मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Monday 30 June 2014

मराठा


छाती पहाडी
भाळी चंद्रकोर
आग रक्तात
हाती तलवार

मुखी शिवनाम
हर हर महादेवाचा गजर
दौडतो सह्याद्रित
मराठ्याचा पोर

जय शिवराय

- प्रदिप फोंडके

शिवछत्रपती | लोकराजा खरा प्रेरणेचा झरा | स्वातंत्र्याचा ||

गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा
पिडीतांचा राजा | शिवराय ||
गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू
शोषकांचा शत्रू | शिवराय ||
थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा
भक्त समतेचा | शिवप्रभू ||
मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी
धर्मांतरबंदी | मोडितसे ||
स्त्रियांचा कैवारी | पुत्र जिजाऊंचा
पालक प्रजेचा | निष्ठावंत ||
मानवताभक्त | थोर शिवराय
न दे अंतराय | नीतीतत्वा ||
सामान्या प्रतिष्ठा | दिली शिवबाने
जिजाऊंचे स्वप्नं | खरी केली ||
शिवछत्रपती | लोकराजा खरा
प्रेरणेचा झरा | स्वातंत्र्याचा ||

- अनामिक

म्हणून रोज शिवरायांच्या पाया पडतो आणि तलवार घेऊन फिरतो...।।

आईने सांगितले की
दररोज देवाच्च्या पाया पडायच
आणि देवा सारख राहयच....।

म्हणून रोज शिवरायांच्या पाया पडतो
आणि तलवार घेऊन फिरतो...।।

जय शिवराय
जय शंभूराजे

- अनामिक े

Sunday 29 June 2014

वाघच होता कापत सुटला मुघलांना तरी औरंग्या नुसता बघत होता

छत्रपती शिवाजी महाराज

वाघच होता..
कापत सुटला मोगलाना तरी
औरंग्या नुसता
बघत होता..

पराक्रम ऐसा नजर फिरली
ती विजयाची दिशा
होती..
रयतेच्या सुखासाठी त्याला
सत्तेची नशा
होती..

ज्याच्या पराक्रमाने फाटले
आभाळ..
औरंग्याच्या काळजात केला
जाळ..
भासला ऐसा महाकाळ..
करुन गेला मृत्युलाही
घायाळ..

गाजवीली रणांगने ऐसा
दिमाखदार होता..
वचनाला जागलेला वतनाचा
वतनदार होता..

गर्जला मराठा छावा..
वाटला देवाला हेवा..
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय शंभुराजे...