मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Tuesday 16 July 2013

**छत्रपती शिवराय आणि stress management skill(मानसिक दबाव नियंत्रण प्रणाली)***


आज जगभरातील आधुनिक सैन्यशास्त्र ज्या stress release management skill साठी अब्जावधी रुपय खर्च करते तीच stress release management skill वापर ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी अत्यंत प्रभावीदृष्ट्या केला होता..
संघटन कौशल्य,वकृत्व,पराक्रम ,धैर्य संयम,मातृभक्ती,देशप ्रेम,रयतेविषयी आत्मीयता असे व ह्या सारखे अनेक सदगुण शिवरायांच्या अंगी ठायी ठायी भरले होते..परंतु ह्या सर्व गुणात शिवरायांचा एक गुण कायम दुर्लक्षिला जातो आणि तो म्हणजे stress release management...
जगातील सर्वाधिक पराक्रमी व सर्वात शक्तिशाली व्यक्ती सुद्धा मानसिक व शाररीक दबावाच्या आहारी जाऊन नमोहरम होतात जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली साम्राज्य हि ह्याच दबावाखाली उन्मळून पडलेली आपण पाहेलेली आहेत ...
परंतु शिवराय कधीच अशा शाररीक मानसिक,कौटुंबिक अथवा राजकीय दबावाच्या भाराखाली दडपले गेले नाहीत.उलट पक्षी प्रत्येक दबावाच्या क्षणी शिवरायांनी अत्यंत संयमानेव धैर्याने सामना केला व त्यातून तावून-सुखावून बाहेर पडत आपल्या व्यक्तिमत्वाला अभूतपूर्व अशी झळाळी दिले ...
१६४८ साली शहाजीराजे महाराज आदिशाहाच्या कैदेत असताना स्वराज्य प्रेम,मातृप्रेम व पितृप्रेम यांना योग्य न्याय देत शिवरायांनी कुठल्याही दबावाला न जुमानता पुरंदरवर झालेले आदिलशाही आक्रमण परतवून लावत आपल्या कणखर मानसिकतेचे दर्शन घडवले होते...
१६५९ साली आपल्या प्राणप्रिय पत्नी महाराणीसाहेब यांच्या निधानंतर डोक्यावर दुखांचाडोंगर असतानाही आपल्या वैयक्तिक दुखाचा व वियोगाचा आपल्या कार्यशैलीवर यत्किंचित हि प्रभाव न पाडू देता अफलातून नियोगन आणि प्रखर बुद्धीमतेचे प्रदर्शन करत अफजल खानाचा फडशा पडला होता...
आग्र्यात औरंघ्याच्या कैदेत असताना एकीकडे स्वराज्य धोक्यात होते दुसरीकडे स्वताचे तसेच युवराज शंभूराजे यांचे प्राण टांगणीला लागले असताना एक कणभर चूक हि दोघांच्या प्राण घेऊ शकत होती..
अशा बिकट समयी औरंघ्याचा प्रचंड दबाव सहन करत शिवरायांनी आपल्या प्रघ्ल्भ मनोवृत्ती आणि सय्यम यांचा योग्य समन्वय साधत आपली तसेच युवराज शंभूराजे यांची सहीसलामत सुटका करून घेतली होती...
अशा प्रकारच्या शेकडो घटनांना शिवराय आपल्या ५० वर्षाच्या तुफानी कारकिर्दीत सामोरे गेले होते..परंतु कधीही आणि कोणत्याही राजनैय्तिक,लष्क री,सामाजिक अथवा कौटुंबिक दबावाला शिवराय बळी पडले नाहीत...
किंवा दबावाखाली स्वराज्यासाठी घातक ठरणाराएक हि निर्णय घेतला नाही...
कधी अनेक प्रसंगी आपली वैयक्तिक दुखांचा भांडवल न मांडता येणाऱ्या प्रत्येक संकटावर अचूक निर्णय घेत त्यावर मात करून आपल्या सारासार बुद्धीचा वापर करत त्यांनी स्वराज्याचा मेरुमांदार उभा केला.
म्हणूनच ज्या काळात जगातील कोणत्याही राजाला stress release management system ह्या प्रणालीचा वापर करता आला नाही त्याच काळात शिवरायांनी ह्या प्रणालीचायोग्य वापर करत पडणार्या सर्व दबावाला झुगारून आपण एक युगपुरुष राजे आहोत ह्यावर शिक्का मोर्तब केले.

महाराष्ट्रावर सत्ता शेवटी मराठ्यांची.


कपाळी शिवगंध,

धारदार नासिका,
भरदार कल्ले,
ओठांवरच्या भारदस्त मिशा,
उंच शरीरयष्टीचा,

चेहरयावर तेजस्वीपणा
हाच मराठ्यांचा साज
आणि मराठ्यांची मिजास..


टकमकावर उभे राहता होऊन जातो वार्याचे झोत

श्रीसांबाचा अंश बाळगतो अंतरी
माथा झुकतो रायगडीच्या जगदीश्वरी
जन्मसोहळा उभा ठाकतो डोळ्यासमोर
फत्ते बुरूजावरुन पाहता पूरंधरी
ढाळत राहतो आसू आम्ही
शक्तिपीठ तुळापूरी

टकमकावर उभे राहता
होऊन जातो वार्याचे झोत
होळीच्या चौकात होतो
भवानीचा धगधगता पोत

रक्ताचा थेंबन् थेंब करतो मुजरा
राजसदरेवर गारद देता
झुंजारासम फुलते छाती
तोरण्याच्या झुंजारमाचीवर येता

सळसळतय आमचं
मर्दमराठी रक्त
होय आम्हीच
शिवशंभूंचे भक्त

आम्हास तुळापूर ही आळंदी देहू
अन् रायगड हीच आमची पंढरी
"जय शिवराय"ची गर्जना ऐकता
ओळखून जा...


आम्हीच ते गडवाटकरी

- उनाड...

जिथे तुझ चरण शिवराय सिर माझं झुकत

जिथे तुझ चरण शिवराय
सिर माझं झुकत

चित्त माझं तुझिया ठायी
मी तुझाच भक्त

कुपा आई भवानीची
स्वराज्यात जन्मलो

चरणधुळ कपाळी तुमची
सह्याद्रित वावरलो

जय भवानी । जय जिजाऊ
जय शिवराय । जय शंभुराजा

कवी - गणेश पावले

शिवबा आयुष्याचा भाग आविभाज्य.

शिवबा म्हणजे पवित्रता,
शिवबा म्हणजे सुन्दरता
शिवबा म्हणजे संपन्नता,
शिवबा म्हणजे साहस
शिवबा म्हणजे स्वातंत्र,
शिवबा म्हणजे खास
शिवबा म्हणजे एकी ,
शिवबा म्हणजे नेकी
शिवबा म्हणजे श्वास,
शिवबा म्हणजे ध्यास
शिवबा म्हणजे विश्वास,
शिवबा म्हणजे पापाचा नाश
शिवबा म्हणजे स्वराज्य,
शिवबा आयुष्याचा भाग आविभाज्य.
!!जय भवानी जय शिवाजी !!

-अनामिक 

गर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी

देवल गिराविते फिराविते निसान अली, ऐसे डूबे रावराने सबी गए लबकी,
गौर गणपती आप औरनको देत ताप, आपनी ही बार सब मारी गये दबकी ,
पीरा पैगंबर दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की,
कासी की कला गई मथुरा मस्जिद भई, गर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी

अर्थ – यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी त्यांचा ध्वज फडकविला तेव्हा राव – राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते, इतके ते निर्बल व निस्तेज झाले, थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणा-या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून ‘रबची’ चर्चा सुरू झाली, काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.

शिवनामाचा गजर मुखी अन रौद्रशम्भूंचा अभिमान…

शिवनामाचा गजर मुखी 
अन रौद्रशम्भूंचा अभिमान… 

शिवभक्त आम्ही शिववेडे आम्ही...
 तय समोर न कसले भान…

अर्ध्य तया रक्ताने जरी केले 
न चुके त्यांचे उपकार…
"गडवाटकरी" हे नाम अमुचे…. 
हाच अमुचा सत्कार…

जय जिजाऊ…!!!
जय शिवराय…!!!
जय रौद्र शंभू राजे…!!!

Sunday 14 July 2013

कसा सांगू लेका उर माझा फुटत आहे, रायगड आणि प्रतापगडी मी तिळ तिळ तुटत आहे,

कैलासाच्या माथी जरी शिवशंकर
विराजला,
बघ माज्या कुशीत माझा शिवबा गर्जला,
टाप मारताच येथे
उधलली तलवारीची पति,
येथेच
जुलली माज्या मराठी मनाची नाती,
स्वराज्याचा पुरावा देत आहे
माजा एक एक कडा,
येथेच
सांडला गड्या शत्रुच्या रक्ताचा सडा,
यवनाच्या आक्रमनाची याद आहे अजून
ताजी,
गनिमाच्या उरावर नाचेल
माझा तानाजी आन बाजी,
ह्रदयात माझ्या खळखळतात
कोयना आणि कृष्णा,
मराठी मनाची आणि मातीची भागवली
त्यानी तृष्णा
जवा बापुच्या शब्दाला येत होती धार,
तवा माझ्या नानान या मातीत बाधल
पत्री सरकार,
कसा सांगू लेका उर माझा फुटत आहे,
रायगड
आणि प्रतापगडी मी तिळ तिळ तुटत आहे,
आफजल्याचा वाढता बुरुंज
काळीज माझं तोडू पाहे,
सांगा ओरडून त्याला हे राज्य शिवबाचे
आहे….!

"मला शिवराय व्हायचंय"

तुला काय व्हायचंय आहे?
या प्रश्ना वर एका लहान मुलाने दिलेले
उत्तर.
"मला शिवराय व्हायचंय"
मी जे क्षेत्र निवडेल, ज्या क्षेत्रात
जाईन,
त्या क्षेत्रात मला सर्वोच्च
स्थानी पोहचायच आहे.
म्हणजेच मला त्या क्षेत्रा मधील शिवराय
व्हायचंय.


कारण शिवराय म्हणजे विजयाचे सर्वोच्च
स्थान आहे.

जय शिवराय.

माता असावी तर अशी

माता असावी तर अशी
"शिवबा रयत बळीराजाची वाट पाहत
आहे
तो तुम्ही घडावा.तलवारीला माणसां
लावू देवू नका तर
ती स्वराज्यातील
नागरिकांना त्रास
देणाऱ्या गनिमांना कापून काढून
स्वराज्यातील
नागरिकांच्या रक्षणासाठी रयतेच

- राजमाता जिजाऊ

भडकती दाही दिशा ।। चढली पराक्रमाची नशा ।।

भगव्यात मिसळु दे रक्त ।।
झुकवु दे तख्त ।।
रक्तात भरे अंगार ।।
करुनी श्रृंगार ।।
तळपवु दे अशी तलवार ।।

होऊनी बेभानं ।।
गर्जती रणांगन ।।
छातीवर झेलीतो वार ।।
पेलुनी स्वराज्याचा भार ।।
तळपवु दे अशी तलवार ।।

भडकती दाही दिशा ।।
चढली पराक्रमाची नशा ।।
तिक्ष्ण नजरेची या धार ।।
वार होऊ दे आरपार ।।
तळपवु दे अशी तलवार ।।

उध्दारली कोटि कुळे.... शिवराया तुझ्या जन्मामुळे...

उध्दारली कोटि कुळे....
शिवराया तुझ्या जन्मामुळे...
ठरला शिवराया खरा रयतेचा आधार तो....
शिवशाहीने महाराष्ट्राचा केला खरा उद्धार तो....
त्या दरबारी शोभुनी दिसतो"शिवराय" राजा तो....!!!!
तोडल्या गुलामगीरीच्या श्रुंखलाज्याने सफल झाले प्रयत्न,
शिवराय तुम्हीच खरे स्वराज्याचे रत्न .
दारीद्र्याच्या भिंतीकोसळल्या ज्यांच्या पराक्रमाने,
नतमस्तक केल्या दाही दिशा याच शिवबाने.
संहारीले तुच लेखनीने दृष्ट दुर्जना,
दुमदुमते आजही तुझीच शिवगर्जना.
जय जिजाऊ
जय शिवराय

- अनामिक 

जगात शिवरायांना "महान राजा" का म्हणतात याचे जिवंत व ज्वलंत उदाहरण़

***शिवरायांची युदधनिती***

जगात शिवरायांना "महान राजा" का म्हणतात याचे जिवंत व ज्वलंत उदाहरण़

आम्ही एकदाच बोलतो, नाही ऐकल तर जित्तच फाडतो.

आम्ही एकदाच बोलतो,
नाही ऐकल तर जित्तच फाडतो.
आम्ही कधी घाबरतनाही.
पाच पाऊल मागे सरकुन
कापल्याशिवाय राहत नाही..

जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय रौद्रशंभो...

आम्ही काय दशा करतो याचा पण एक ईतिहास आहे .

काही जण म्हणता
मराठे नशेत असता यांची नशा उतरावी लागते
आ रे हो नशेत असतो आम्ही
अन गेल्या ३५० वर्षा पासुन नशेतच आहोत
पण आमची नशा उतरविणाऱ्‍यांची
आम्ही काय दशा करतो
याचा पण एक ईतिहास आहे .

..ණ गजानन बोरकर

मला लोकं विचारतात.., "काय तुला एवढे कसले वेड आहे शिवाजी महाराजांचं..???

मला लोकं विचारतात..,
"काय तुला एवढे
कसले वेड आहे
शिवाजी महाराजांचं..???
आणि

कशासाठी..???"
मी आज त्यांना फ़क़्त एवढेच सांगतो,
हो, आहेच वेड
आम्हाला शिवरायांचे..
कारण,
त्यांचा इतिहास आम्ही वाचलाय....
त्यांचे कर्तृत्व
आम्हाला माहिती आहे...
राज्य कसे घडवावे हे
आजच्या नाकर्त्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून शिकावं...
शिवराय फक्त आणि फक्त
रयतेसाठीच जगले..
त्यांचा इतिहास
आम्ही विसरूच कसा
शकतो...???
ज्या राजांनी उभे आयुष्य सोनेरी महाराष्ट्र घडवण्यासाठी घालवले, 
पण आजही तो राजा सोनेरी सिंहासनावर
नाही तर
मातीच्या सिँहासनावर वाघ दिसतो..
कारण, शिवरायांनी आपलं संपुर्ण आयुष्य
या मातीसाठी खर्ची घातलयं याच
रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट
घेतले...
हाच राजा सह्याद्रीसाठीजग ­ला...
त्याच राजाला कसं काय विसरू शकतो आम्ही....???
कधीतरी माझ्या राजाला समजून घ्या...
एकादी लव स्टोरी ,
वाचण्यापेक्षा कधीतरी महाराजांचा इतिहास वाचून
बघा..
मग तुम्हाला समजेन ..,
का वेड आहे
आम्हाला
शिवरायांचे.....
जय जिजाऊ..!!
जय शिवराय..!!

सांर विश्व करी नमन ज्यांना असे युगपुरुष तुम्ही.

शहाजी राजेँचे स्वप्न तुम्ही..
जिजाऊंच्या काळजाचा
तुकडा तुम्ही.. 
महाराष्ट्राला लाभलेलेछत्र तुम्ही..
लोक कल्याणकारी
स्वराज्य निर्माता तुम्ही.. 
सईबाईँना मिळालेलं सौभाग्याचं देणं तुम्ही.. 
शंभु राजांचे एक आदर्श

पिता तुम्ही..
मराठ्यांचे लाडके
धनी तुम्ही..
स्त्री जातीचा मान राखने शिकविले तुम्ही..
जो नडला त्याला उभाच
फडला तुम्ही..
गनिम काव्यांने जिँकले दिल्लीचे तख्त तुम्ही.. 
मना-मनात धगधगनारी
आग तुम्ही..
ज्वलंत इतिहासाच्या पाऊलखुणा तुम्ही..
सांर विश्व करी नमन ज्यांना असे युगपुरुष तुम्ही.

.छञपती शिवाजी महाराज की जय

- अनामिक 

'बहुत जणासी आधारू' म्हणुन म्हणतात शिवाजी महाराजांना...



अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्या नंतर महाराजांची योजना होती की लगेच गडाच्या दरवाज्या कडे धाव घ्यायची.

महाराजांनी वाघनखे खुपसली, कोथला काढला. सय्यद बंडा आला, जिवा महालांनी त्याला ठार केलं. क्रुष्णाजी भास्कर आडवा आला, महाराजांनी त्याला कापला आणि प्रतापगडाच्या दरवाज्याकडे पळत सुटले.


जाता जाता सोबतचे अंगरक्षक मोजु लागले...

१,२,३,४,५,६,७,८,९

फक्त ९?

सोबत तर दहा होते...

मग कोण बाकी राहिलं राजांनी विचारलं...

कोणी तरी म्हटलं,'संभाजी कावजी नाही जी'

राजे म्हणाले,'नाही? काय झालं? मधुनच कुठे गेला?'

तेवढ्यात संभाजी कावजी धापा टाकत आला.
राजे संतापले आणि म्हणाले, 'संभाजी कुठे होतास?'
संभाजी कावजी म्हणाला,
'राजं तुम्ही वाघनख मारली खानाला पण म्हटलं मरत्यो की न्हाई म्हणुन मागे गेलो आणि त्याचं शीर कापुन आनलं'
आणि त्यानी कापुन आनलेलं खानाचं डोकं वर केलं राजांना दाखवायला...

राजे म्हणाले,'अरे गड्या त्या वाघनखांना विष लावलं होतं. खान कसाही करुन मरणारच होता मग तू हे वेडं धाडस का केलं.. यापुढे लक्षात ठेव जे आपल्या योजनेत नाही ते कधीही करायचं नाही..
एक वेळेस खान मेला नसता तरी चाललं असतं पण जर तुझ्या जिवाला काही बर वाईट झालं असतं तर तुझ्या आईला काय तोंड दाखवलं असतं मी. ती तर हेच म्हटली असती ना की शिवाजी ने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीव घालवला. तुझ्या जागेवर एक वेळेस मी मेलो असतो तर चाललं असतं पण स्वराज्याचा एकही मावळा मरता कामा नये.'

जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे जो आपल्या एका साध्या अंगरक्षासाठी सुद्धा मरायला तयार आहे. आपल्या प्रजेवर लेकरांसारखं प्रेम केलं आहे ह्या राजानी...

'बहुत जणासी आधारू' म्हणुन म्हणतात शिवाजी महाराजांना...

राजा रयतेचा राजा..



राजा रयतेचा राजा..

आमच्याकडे ना श्रीमंती सोन्या चांदीची,

आमच्याकडे ना श्रीमंती प्रभावळ परगण्याची,

आमच्याकडे ना श्रीमंती सुरत, आग्र्याची,

आमच्याकडे श्रीमंती ती मनामनाची अन् जनाजनाची..

शिवराय एक असा राजा ज्यांनी देशावर नाही तर,

तर राज्य केले ते माणसांच्या मनामनावर...

म्हणूनच शब्दांविना गर्जे त्यांचा दरारा...

कर्तव्याच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा !!


- अनामिक

वाघासारखे जगायचे शिकविले आम्हा राजा शिवछत्रपतीने..



दैवाच्या भरवशावर नव्हे तलवारीने

बदलतो आम्ही भविष्य..

ईतिहास भुगोल बदललाय याच

तळपत्या पातीने..

वाघासारखे जगायचे शिकविले आम्हा

राजा शिवछत्रपतीने..


- अनामिक

"हमे किसीका डर नही लगता लेकीन हमारे वजेसे सबको डर लगता है"



महापराक्रमी शाक्तवीर,स्वातंत्रवीर , ज्ञानवीर,
रणवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो...!!

औरंगजेब संभाजी राजेंना बघुन म्हणतो.
नौ बरसका था संभा तब ये मिलाता आग्रा मे

तो पुछा था हम ने इसे.
'क्युं रे संभा तुमे हमारा डर नही लगता',
तब इसने जवाब दिया था,
"हमे किसीका डर नही लगता लेकीन हमारे वजेसे
सबको डर लगता है"
संभाजी महाराजांना पकडल्यावर औरंगझेबा कडे
बघनारी ती संभाजी महाराजांची नजर बघुन
तो म्हणाला,
''ये मरहट्टे क्या खिलाते है अपने बच्चो को.
क्युं पैदा नही हुआ ऐसा एकभी शक्स हमारे जनाने में''
त्यावर गरजला सर्जा संभाजीराजा
''अरे स्वताच्या बापाला विष देऊन मारणारा तू.
स्वताच्या भावांची खुले आम कत्तल करणारा तू.
तुझ्या पोटी कसा जन्माला येईल संभाजी.

संभाजी जन्माला येईल तर फक्त सह्याद्रीच्या कुशीत
आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच''
महापराक्रमी शाक्तवीर,स्वातंत्रवीर , ज्ञानवीर,

रणवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो...!!

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराज


-अनामिक

माझ्या शिवबाचही एक राज्य होत..



माझ्या शिवबाचही एक राज्य होत..
स्वर्गाहुन सुंदर ते स्वराज्य होत..
माज नव्हता जिथे कुणाला जातीचा..
आभिमान दरवळायचा चोहीकडे मातीचा..
सह्यांद्रीच्या कडेपारीतुन
सुटनाऱ्या सुगंधाचा श्वास होता..
प्रत्येकाच्या वाट्याला सुखाचघास होता..
जो जगला रयतेसाठी तो राजा काय होता..
कुतुहल कराव जगाने असा त्याचा न्याय होता..
रयतेच्या भरवशावर जगनारे बहुत होऊन गेले..
रयतेसाठी जगनारे फक्त माझे
शिवरायच झाले.


- अनामिक

Thursday 4 April 2013

वाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही ....

वाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही ....
लढण्याचा मोह आवरत नाही ...
जर औकातीवर उतरलो तर
मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही....
थाटला आम्ही अवघ्या महाराष्ट्राचासं ­सार ...
घेऊन पदरी माँ साहेब जिजाऊंचे संस्कार ....
आम्हीच लाविले भगवे झेंडे अटकेपार ....
तळपली शिवछत्रपतिंची भवानि तलवार ....
या मातिची तहान आम्ही रक्ताने भागविली ....
गुलामगीरीच्याका ­ळजात ज्योत स्वातंत्र्याची जागविली ....
पेटविली रणांगने देह झिजविला मातिसाठी ....
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी ...

Thursday 28 March 2013

गर्जतात मराठे आवाजात वाघाच्या

गर्जतात मराठे आवाजात वाघाच्या.....
पायाखालची जमीन सरकते लांडग्याच्या... .
दरारा आजही कायम आहे
जातीत फितुरांच्या....
कुत्रे पीसाळले आता
जे कारणीभुत होते मृत्युला शंभुच्या... तौबा करतील जन्मावर येतील जेव्हां तडाख्यात
या वादळाच्या...
छातित
धडकतो छत्रपती आजही मराठ्याच्यां...
॥जय जिजाऊ॥ ॥जय शिवराय॥

- विकास

Tuesday 26 March 2013

एकची तो राजा शिवराय जाहला..

एकची तो राजा शिवराय जाहला.
नगाऱ्‍याच्या नादात
शिवनेरी आनंदला आई
जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास
आला.
पराक्रमाचा बादशाह
महाराष्ट्री अवतरला.
एकची तो राजा शिवराय
जाहला.
हजारो मावळे उभे
ठाकले,
दिसली नवी आशा मर्दमराठा पराक्रमाने
दुमदुमल्या दाही दिशा तोफांसमोरी तलवार
घेऊनी उभा ठाकला
एकची तो राजा शिवराय
जाहला..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराज

तळपते समशेर माझी रणांगणी... तांडवाने माझ्या कापते हि धरणी..

तळपते समशेर माझी रणांगणी...
तांडवाने माझ्या कापते हि धरणी..
कलम करितो मी मुंडकी गानिमांची ...
मनगटात ताकत माझ्या शंभरहत्तींची...
छातीत माझ्या स्वातंत्र्यचा अंगार...
प्राणपणे लढतो मी झेलून छातीवरी वार..
रुद्रावतार
पाहुनी माझा थरारतो यमराज..सह्याद्र
ीच्या कड्या-कड्यातून चाले माझे
राज...उफाळतो आहे
लाव्हा माझ्या रक्ताचा ...
घालितो अभिषेक मी माझ्यारुधिराचा. ­ .
त्रिवार
गरजूंनी सांगतो जगताला मी वीर
मावळा छत्रपती शिवरायांचा

Thursday 21 March 2013

मर्द आम्ही मराठे खरे, शत्रूला भरे कापरे|

मर्द आम्ही मराठे खरे , शत्रूला भरे
कापरे|
देश रक्षाया, धर्म ताराया, कोण
झुंजीत मागे सरे || धृ ||
वादळापरी आम्ही पुढेच चालतो ,
जय शिवाजी गर्जुनी रणांत
झुंजतो |
मराठा कधी न
संगरातुनी हटे ,मारुनी दहास एक
मराठा कटे |
सिंधु ओलांडुनी,
धावतो संगिनी, पाय आता न
मागे सरे || १ ||
व्हा पुढे
अम्हा धनाजी ,बाजी सांगती,
वीर हो उठा कडाडतात नौबती |
विजय घोष दुमदुमे
पुन्हा दिगंतरी ,पूर्वजापरी आम्ही अजिंक्य
संगरी |
घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी , मृत्यू
अम्हा पुढे घाबरे || २ ||
भारता आम्ही तुलाच देव मानतो ,
हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो |
राखतो महान आमची परंपरा, रक्त
शिंपुनी पवित्र ठेवती धरा |
ह्याच मातीवरी प्राण
गेला तरी ,अमुची वीर गाथा उरे
|| ३ |
बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज
की जय........

मी स्वप्न पाहिले... जिजाऊंचा शिवबा होण्याचे,

मी स्वप्न पाहिले...
जिजाऊंचा शिवबा होण्याचे,
सईचा राजे होण्याचे,
शंभुचा आबासाहेब होण्याचे...
मी स्वप्न पाहिले...
पहिला तोरणा जिंकण्याचे,
हिरव्यागार
सह्याद्रिचे, गनीमी काव्याचे...
मी स्वप्न पाहिले...
महाराष्ट्रावर
भगवा फडकवण्याचे,
हिंदवी स्वराज्याचे,
दिल्लीच्या तख्ताचे...
मी स्वप्न पाहिले,
मी स्वप्न पाहिले...
जय जिजाऊ...
जय शिवराय...

जिजाऊ तुम्ही होत्या म्हणुन मराठ्याची जात आहे.

जिजाऊ तुम्ही होत्या म्हणुन
मराठ्याची जात आहे
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणुन
देव्हार्यातील दिव्याची वात आहे
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणुन
भगव्याची आग काळजात आहे
जिजाऊ तुम्ही होत्या म्हणुन
तुम्हाला मुजरे करणारे हे हात आहेत
जय जिजाऊ माता
जय शिवराय

Wednesday 20 March 2013

करता है राज लाखो दिलोँ नाम उसका है शिवाजीराजा....

कैसा है ये राजा,
जिसके दिल मेँ है तुफान सारा।
शेर दिल इस बच्चे को देखकर फत्तेखान भी भागा,
अफजल को जिसने एक की झटके मे उखाडा,
शास्ताखान तो उँगलीया छोडकर आया।
पहाडो मे ये कैसा शेर आया,
हिँदूस्थान को शैतानो से छुडाने आया,
भवानी तलवार से जिसने हर एक दुश्मन को झुकाया,
करता है राज लाखो दिलोँ नाम उसका है शिवाजीराजा....
!! जयस्तु मराठा !!
!! जय श्री राम !!
!! जय भवानी !!
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभुराजे!!

Tuesday 19 March 2013

अन्याया विरुध्द पेटला.. बांध काळजाचा फुटला..

अन्याया विरुध्द पेटला..
बांध काळजाचा फुटला..
रयतेच्या दुख्खाःवर..
घालीतो फुंकर..
डोळ्यात उठे आग..
तो सह्यांद्रीचा वाघ..
हाती तया तलवार..
दहाडला शत्रुवर..
गाजीवितो रण..
तळहाती घेतला प्राण..
निष्ठावंताचा धनी..
तो या मातीचा ऋणी..
तळपती दाही दिशा..
उजाळती महाराष्ट्र देशा..
शोभतो भुपती..
राजा शिवछत्रपति
.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे

आम्हा नाही नशिबाचा डर.. हाती तलवार जगतो निडर..

बेफान होऊनी विर..
तळहाती घेऊनी शिर..
प्राणाच्या दिल्या आहुत्या..
झेलुनी तलवारी तळपत्या..
तव स्वराज्य उभे राहीले..
दुनियेन गुण आमुचे गायीले..
स्वातंत्र्य केली माती..
सह्याद्री बघ सांगती..
फडकतो भगवा अभिमानाने..
पेटतो उर स्वाभिमानाने..
आम्ही लेकर शिवरायाची..
नाही कुणा दगा द्यायाची..
आम्हा नाही नशिबाचा डर..
हाती तलवार जगतो निडर..
मांडीवर थाप मिशावर ताव..
आमुचा गनिमी डाव..
कुणा नाही ठाव..
तुकडा करी फितुरीचा
एकच असा घाव..
दिला शब्द न फिरनार..
दुनियेसी भिडनार..
तरी
उरुन पुरणार..
हि जात मराठ्यांची

मी प्रत्येक वादळ पेलिन मला आत्मविश्वास आहे...

मी प्रत्येक वादळ पेलिन,
मला आत्मविश्वास आहे...
माझ्या पायाशी जमिन,
पाठीशी आकाश आहे,
पाय जमीनीत घट्ट रोवुन,
मी सह्याद्रि सारखा ताठ आहे..
जाउन सांगा,
तुमची'शिवबाच्या ­ -मावळ्यांशी' गाठ ­ आहे.....
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

जगताचा राजा माझा

जगताचा राजा माझा
गरीबांचा कैवारी
नाद घुमतोय दरीदरीतून
सह्याद्रीच्या कड्याकपार्यातून
"जय शिवराय जय शिवराय"
भगवा झळकतो डौलात
वीर मराठ्यांच्या उरात.
पेलतील भगवा बाहू आमचे,
आशिर्वाद आम्हा आई भवानीचां,
भीती नाही उरी आमच्या
राजे असता पाठीशी., वार्याशी संगत आमुची
नात तलवारीशी
रक्ताचा अभिषेक केला
शपथ आहे स्वराज्याची...
होय.!!
पुन्हा एकदा चटक
लागली या मातीला मराठ्यांच्या रक्ताची...
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभुराजे !!
!! जय महाराष्ट्र !!

याच तीन अक्षरात दडला आहे या मातीचा जाज्वल्य इतिहास

"शिवाजी"हे शब्दच कितीतरी सांगूनजातात,
त्यांचा अर्थ स्पष्ट करायची गरज नाही !
याच तीन अक्षरात दडला आहे या मातीचा जाज्वल्य इतिहास,
या नावातच दडला आहे शिवप्रभूंचा वास,
हा शब्दच सांगतो इथल्या लोकांच्या पराक्रमाचा ध्यास,
हा शब्दच देतो जगण्याचा विश्वास !
|| जय शिवराय ||

राजे शिवछत्रपती

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती..
जाणता राजा एकची झाला
ते फक्त “राजे शिवछत्रपती। !!
धर्म
मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती..
केली चहूकडे जनजागृती
ते फक्त “राजे शिवछत्रपती” !!

नाद करायचा नाय

अरे जगतो आम्ही ताठ मानेने
मान ताठ आहे म्हणुनच थाट आहे
औरंगजेबाच्या दरबारात ताठ मानेने उभे राहुन
नजरेत नजर भिडवत वरच्या स्वरात बोलणारे
पहिले

राजे शिवछत्रपती
अन दुसरे संभाजीराजे

नाद करायचा नाय
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभुराज..

भगवा हातात धरायला ह्रुदयात आग लागते

भगवा हातात धरायला ह्रुदयात आग लागते
मनगटात
अब्जावधी हत्तींच बळ लागते
भगवा धरण म्हणजे
येड्या गबाड्याच काम नव्हे कारण
त्यासाठी ह्रुदयात "छत्रपती शिवराय"
लागतात .
!!जय महाराष्ट्!!

शिव छत्रपति म्हणजे

छत्रपति म्हणजे
जिजाउच्यां गळ्यातली मोत्याची माळ.........
छत्रपति म्हणजे
सईचं कुकंवान भरलेल कपाळ.........
छत्रपति म्हणजे
बलीदानी पुत्र ज्याचा शभुंबाळ........ ­.
छत्रपति म्हणजे
तुकोबारायाच्यां ­ अभंगातला टाळ.........
छत्रपति म्हणजे
सोन्याच्या नागराला चादींचा फाळ.........
छत्रपति म्हणजे
कायम अठवणीतले आभाळ.........
छत्रपति म्हणजे
कतृत्वच्या सरीने हिरवा झालेला
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....!!

राजे तुम्ही जन्माला येताय नक्की नक्की या

राजे तुम्ही जन्माला येताय
नक्की नक्की या
पवित्र तुमच्या चरणाच
दर्शन आम्हाला दया
ज्या गडा साठी तुम्ही
अहो रात्र जागलात
रक्ताचे थारोले सांडून
गड ताब्यात घेतलात
त्या गडावर्ती ...
दारूचे शिंतोडे दिसतील
बाटल्या पाहून घ्या ....
.राजे तुम्ही जन्माला येताय नक्की नक्की या
आज तुमची जयंती
उस्ताहात साजरी होतेय
जिकडे तिकडे तुमच्या नावाची
साद ऐकू येतेय
भल्या मोठ्या ब्यानर मधे
तुमची छोटीशी प्रतिमा
खुप सुंदर दिसतेय ....
यांचे मोठे मोठे फोटो पाहून घ्या.........
राजे तुम्ही जन्माला येताय
नक्की नक्की या
अधि लगींन कोंढा न्याचमग राय बाच
..... अस म्हणत प्रानाची आहुति
देनारया नरवीर तानाजी मालूसर्यांच्या
पुतल्या खाली रेव पार्टी चालते
या हिज डया ना बार कमी पडलेत
....यांना इतिहासाची माहिती करून दया
राजे तुम्ही जन्माला येताय
नक्की नक्की या
लाल गुलाल हिरवा होत चाललाय
प्रतिष्ठे पाई मानुस खुप बिघडत चाललाय
माता जिजाऊ सारखी आई आणि
हर हर महादेवाची घोषणा
पुन्हा घुमु दया
राजे तुम्ही जन्माला येते नक्की नक्की या
गोड तुमच्या चरणाच दर्शन आम्हाला सुद्धा दया

आहेच माझ्या शिवबाची अशी किर्ति

आहेच माझ्या शिवबाची अशी किर्ति
..
बरोबरी काय करेल ती मंदिरातील
दगडाची मुर्ति..
जय जिजाऊ....!!
जय शिवराय....!!
जय शंभुराजे....!!

मराठी माणूस

“मराठी माणूस म्हणजे: जो स्वत:हून
कधी मुंगीच्याही वाटयालाही जात नाही, पण जर
गरज पडली तर वाघाचे दातही मोजायला ही भित
नाही..."
"जय महाराष्ट्र . . . .

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या जगाचे आराध्य दैवत.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या जगाचे आराध्य दैवत.
हिटलरपासून तर मार्शल बुल्गानिन पर्यँतच्या जगभरातल्या मान्यवरांनी वाकुन मुजरा करावा असे श्रध्दास्थान... ­_/\_
विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!

झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात

झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळव की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती कर की काळही पाहत रहावा.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

राजे

!! जय शिवराय !!
"उचलली वेळीच तलवार म्हणुनी धर्म रक्षण जाहिले
तुमच्या मुळेच राजे आम्ही हिंदवी स्वराज्यपाहिले !!! "
''पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतं ­ ­स
सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज
छत्रपती शिवाजी महाराज की जय...

संकटे येतिल हजार तु मात दे मराठ्या !!

संकटे येतिल हजार तु मात दे मराठ्या !!
दिप ऊजळवु उत्कर्षाचे वात दे मराठ्या !!
एकमेका साह्य करु साथ दे मराठ्या!!
काळाची गरज आहे हात दे मराठ्या !!

Friday 15 March 2013

मी तुळजा भवानीचा भक्त

तुळजा भवानीचा भक्त ।
अंगात सळसळत मराठी रक्त ।
जिवन जगताना रहा ताठ ।
हिच मराठ्याची जात ।
शिवरायाचा आठवाव स्वरुप ।
छत्रपतिंचा आठवावा प्रताप ।
या माझ्या पराक्रमी राजाला माझाशत
कोटि प्रणाम !
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥

Thursday 14 March 2013

आमचा राजा

आमचा राजा ऊन्हात तडपतोय
म्हणून मंदिरातील दगड आज सावलीत बसतोय
भरभरून दिलेय आमच्या राजानं
तरी मंदिरातील दगड दानपेट्या मिरवतोय...
आमचा राजा काळोखात राहतोय
तरी सर्वांना उजेड देतोय
माझ्या राजाच्या चरणी कोणी दिवाही लावत नाही
अन मंदिरातील दगड दिव्यांनी प्रकाशतोय...
आमचा राजा उपाशी झोपतोय
पण सर्वाची पोट भरतोय
आमच्या राजाला कोणी पाणीही पाजत नाही
अन मंदिरातील दगडासमोर फळांचा थाट सजतोय...
आमचा राजा एकटाच बसतोय
पण प्रत्येकाला साथ देतोय
माझ्या राजा चरणी कोणीही झुकत नाही
अन मंदिरातील दगडावर झुकण्या आम्ही रांगेत ठाकतोय...
आमचा राजा लाख अत्याचार झेलतोय
पण सर्वांना सुख देतोय
माझ्या राजाला कुण्या पुजाऱ्याची गरज नाही
अन मंदिरातील दगड पुजाऱ्याच्या गुलामीत जगतोय...
जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज
दि - १५/०३/२०१३ —
http://photos-f.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/s720x720/537756_439017029507473_1642229851_n.jpg

फितुराचीं पर्वा नाही विश्वास आहे हातातल्या तलवारीचा..... आहेच गर्व या मातिचा. मस्तक तिथेच टेकवीन जिथे पदस्पर्श झाला माझ्या छत्रपतिंचा..... जय जिजाऊ...! जय शिवराय...! जय शंभुराजे.. .!

Thursday 7 March 2013

सेर सिवराज है ॥

"इंद्र जिमि जंभपर,
वाढव सुअंभ पर,
रावन सदंभ पर,
रघुकुल राज है ॥

पौनबारीबाह पर,
संभु रतिनाह पर,
जो सहस्रबाह पर,
राम द्विजराज है ॥

दावा द्रुमदंड पर,
चीता मृगझुंडपर,
भूषन बितुंड पर,
जैसे मृगराज है ॥

तेज तम अंस पर,
कान्ह जिमि कंस पर,
त्यों मलिच्छ बंस पर,
सेर सिवराज है ॥
" सजॉ सिवराज है ॥"
॥जय भवानी, जय शिवाजी॥"

बुद्धिमान, उत्कृष्ट, आणि चरित्राचे शंभू राजांशिवाय पृथ्वीवर कोणी नव्हते..!

संभाजी महाराजांनी क्रांतीच्या उपक्रमांच्या स्वीकार करून विविध योजनांना आरंभ केला होता. ते स्वतच्या तोंडाने आद्ध घालीत असत.
माझ्या भक्तीने मनु निघून जाईल आणि खूप धन मिळविण्याची इच्छा धरल असे ते म्हणत असत.
संभाजी महाराजांनी आश्रय दिलेले पंडित दरबारात समतेची गाणी रचित असत.
लाखो दलित प्रत्यक्ष शंभू राजांच्या बाजूस होते.
आपण सर्वजण विक्रम करू. सागराचा अंतही जिकू, असे ते म्हणत असत.
"शंभूराजांवर सैनिकांचा, सेवकांचा, आणि जनतेचा मोठा जीवहोता. शिवाजी महारांची समाधी शंभू राजांनी बांधली होती.
ते रोज तेथे जात असत व 'स्फुट' म्हणत असत.
प्रसाद म्हणून कान्धाचा रस ते पीत असत.
शंभू राजांच्या बळाने सैन्याचा रध गतीने जाऊ लागला होता.
बुद्धिमान, उत्कृष्ट, आणि चरित्राचे शंभू राजांशिवाय पृथ्वीवर कोणी नव्हते..!
-युवराज शंभूमहाराज कि जय.!
आम्ही गडवाटकरी.

शंभु.. म्हटल की कळ उठते इंद्रायणीच्या छतीतुन

शंभु..
म्हटल की
कळ उठते इंद्रायणीच्या छतीतुन
तळपतो रंग रक्ताचा तुळापुरच्या मातीतुन
ज्वालाच्या उठती लाठा
तप्त करी इंद्रायणी काठा
कसा तडपतो वध स्थंभाचा जीव
त्या साखळदंडाना येते का आज तरी किव
रुसले असेल का आभाळ
ओशाळला असेल तो काळ
का घाव ते रुततात काळजात
का लाभली नाही आम्हा नशिबाची साथ
जय विरराजे जय शंभुराजे
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

गजानन बोरकर

कडेलोट होतो ईथे फितुरांचा.. रिवाज आहे गर्दन मारण्याचा..

मराठे नाही कुणा हातुन हरले..
जिद्दी मराठ्याँच्या पुढे येण्याची
कुणाची ताकत नव्हती.. मर्दाची जात ऐसी जिव गेला तरी
कुणापुढे तसुभर वाकत
नव्हती..
मराठ्यांची पहाडा सारखी काया..
करी मातीवर जिवापाड माया..
घारीची नजर करारी.. सहण झाली नाही कधीच फितुरी..
कडेलोट होतो ईथे फितुरांचा..
रिवाज आहे गर्दन मारण्याचा..
जय जिजाउ!!
जय शिवराय !!
जय शभुंराजे !!

मराठोँ की कहाणी तलवारो ने लिखी.

फुलो की कहाणी
बहारो ने लिखी ,
रातो की कहाणी
सितारो ने लिखी,
लेकीन मराठा किसी
कलम का मौताज नही
क्योँकी मराठो की कहाणी
तलवारो ने लिखी.
जय शिवराय

।। क्रमेण जित्वा सदिश्चतस्रो राजा शिवछत्रपति: प्रपात् ।।

।। क्रमेण जित्वा स दिश्चतस्रो राजा शिवछत्रपति: प्रपात् ।।
।। नि:शेषयन् म्लेच्छगणं समस्तं पाति स्म पृथ्वीं परिपूर्णकामः ।।


अर्थ :
आपल्या पराक्रमाने चारही दिशा एकामागून एक जिंकून, सर्व म्लेंच्छांचा संहार करून आपले मनोगत पूर्ण झालेला तो राजा शिवछत्रपती पृथ्वीचे राज्य करू लागला.
राज्यव्यवहार कोश

अनुवाद : अश्विनी मराठे

नाद करायचा नाही आमचा नादच खुळा

सळसळते रक्त , शिवबाचे भक्त,
आणि कपाली भगवा टिळा...
आल आल वादळ अन् कोण आडविल
या वादळा....
आणि आलाच कुणी आडवा तर
त्यांचा वाजवू आम्ही 'खूळ-खुळा'..... ­.
अय नाद करायचा नाही,
आमचा नादच
खुळा....
छाती ठोकून
सांगतो जगाला शिवबाचा मावळा.... एक केले बारा-बलुते, एक
केला मावळा,....
नाद करायचा नाही आमचा नादच
खुळा.....!!!!!! ­!!!

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ग्रंथाची सुची.....!!

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ग्रंथाची सुची.....!!
१. छावा = शिवाजी सावंत.
२. संभाजी = विश्वास पाटील.
३. शिवपुत्र संभाजी = डाँ. कमल गोखले.
४. छत्रपती संभाजी = वा. सी. बेद्रे.
५. मराठ्याची धारातीर्थे = प्रविण भोसले.
६. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज= अरुण जाखडे.
७. रौद्र = नितीन बानगुडे पाटील.
८. खरा संभाजी = प्रा. नामदेवराव जाधव.
९. शंभुराजे = प्रा. सु. ग. शेवडे.
१०. अद्वितीय श्री छत्रपती संभाजी= अनंत दारवटकर.
११. बुधभुषन राजनिती = राम कदम.
१२. बुधभुषन = स्वत: संभाजी महाराज.

भगव्याचा रक्षिता मि विखुरलो जरीईंद्रायणी काठा.. रक्तात भिजलो, स्वराज्यासाठी लढलो मी मर्द मराठा

भगव्याचा रक्षिता मि विखुरलो जरी ईंद्रायणी काठा..
रक्तात
भिजलो स्वराज्यासाठी लढलो प्राणपणाने मि
मि मर्द मराठा..
छातित भडकला सागर उठल्या तुफाणी लाटा..
तिळ तिळ करे जंजिरा थर थरवितो धरणी मि
मि मर्द मराठा..
मातला सैतान सोसीला घाव काळजात रुते
फितुरीचा काटा..
रणांगना जरब बसवितो अजिंक्य मि
मि मर्द मराठा..
शक्तीच्या बळावर आसमंत
फाडुनी रोखील्या वादळच्या वाटा..
रणी गर्जतो सह्यांद्रिचा छावा मि
मि मर्द मराठा..
रुद्राचा अवतार मृत्युची करी थट्टा..
शिव पुत्र शंभु मि
मि मर्द मराठा..
- Gajanan ßorkar

शिवाजी महाराजांची ताकद पहा कशी होती......


इ.स.१ ६५७ मध्ये शिवरायांचं लक्ष्य होत-स्वराज्याच
आरमार....
कारण या समुद्रावर सत्ता होती,
अरबी हबशी आणि फिरंगी पोर्तुगीज यांची. आरमार
उभारायलासुरुवात झाली, एक एक बंदर राजांचे
सहकारी काबीज करून तिथे भगवा फडकवत होते.
त्या दरम्यान पोर्तुगीज व्हाइसरॉय याने आपल्या पोर्तुगीज
आरमार प्रमुखाला पत्र पाठवलं की,
"डोंगरातला राजा आता पाण्यात उतरला, आता कुठे जायचं ते
ठरवा".
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर सन १६५९ मध्ये
स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. पोर्तुगीज,
सिद्धी, इंग्रजांसारख्या प्रबळ आरमारी शक्तींना तोंड देवून
"सिंधुसागर" स्वराज्याच वर्चस्व निर्माण
करण्यासाठी महाराजांनी उभारलं.
स्वराज्याच्या आरमाराविषयी गोव्याचा व्हाइसरॉय सन
१६६७ मध्ये आपल्या पोर्तुगीजच्या राजाला लिहितो की,
शिवाजीँच नौदलही मला भीतीदायक वाटत. कारण
त्याच्या विरुद्ध आम्ही सुरुवातीस कारवाई न केल्याने त्याने
किनाऱ्यावर चांगले किल्ले बांधले. आणि त्याच्या जवळ
पुष्कळ "तारवे" आहेत.पण ही तारवे मोठी नाहीत,
आपल्या आरमाराच्या जोरावर त्याने इंग्रज व
सिद्धी यांच्याही समुद्रावर लढाई करून "खांदेरी दुर्ग"
उभारला. यावरून
मराठा आरमाराच्या वाढत्या बळाची जाणीव होते..
विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!

Wednesday 6 March 2013

शिवाजी महाराज आरती..


जयदेव जयदेव जय जय शिवराया !

या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला

आला आला सावध हो भूपाला

सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला

करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी

दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी

ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता

तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२

त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो

परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो

साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया

भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला

करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला

देशास्तव शिवनेरी घेई देहाला

देशास्तव रायगडी ठेवी देहाला

देशस्वातंत्र्या ­ चा दाता जो झाला

बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४

बोला शिवाजी महाराज की ... जय !!



- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

वाघाला जागवू नका...!!!

वाघ जर डरकाळी फाडत नसेल
तर याचा अर्थ
हा नव्हे
कि त्याला डरकाळी फोडता येत नाही...!!!
वाघात आणि कुञ्यात फरक असतो.
वाघ तेव्हाच डराकाळी फोडता जेव्हा
एक तर तो शिकार करणार असेल
किंवा शिकार केलेला असेल
म्हणून वाघाला जागवू नका...!!!
जय शिवराय.........

लाज वाटते का रे?

३५० वर्षापूर्वी सर्व भारताच्याकैफियती ऐकणाऱ्या माझ्यासारख्याला आज स्वतःची कैफियत तुमच्या समोर मांडावी लागती आहे , याहून मोठे माझ्या आयुष्यातील दुर्दैव ते कोणते ? कारण की , तुमच्या सारखा मी माझ्या परिवाराच्या भविष्याचा विचार न करता तळागाळातील रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची स्थापना केली , ती तुमची पोरे - बाळे आणि तुमचा परिवार सुखी रहावा म्हणून , पण आजमी रक्ताचे पाणी करून स्थापना केलेल्या स्वराज्यातील गड - किल्ल्यांची काय अवस्था आहे ? आणि माझे नाव लावून स्वतःची पोटेभरणाऱ्या भारत सरकारच्या पर्यटनखात्याकडून आणि सांगायलाही लाज वाटावी अशा माझ्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याकडून भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे निधी देऊन सुशोभित केली जात आहेत ! मग मी स्वराज्याची सुरुवात केलेल्या , माझ्याच बारा मावळामधील , आणि सर्व महाराष्ट्रातील मी स्वतः उभे केलेल्या किल्ल्यांची आजची अवस्था तुम्हाला ए.सी कार्यालयात बसून कळणार आहे का रे? एरव्ही आक्रमक भाषणे करणाऱ्यां तुमच्या पैकी किती जण माझ्या गड - किल्ल्यांवर स्वतः पायी चालत जाऊन आलेत रे ? माझे नाव घेवुन जगणाऱ्या तुम्हाला , माझा एवढ्या लवकर विसर पडला का रे ? भविष्यात पण तुम्ही आज जन्माला आलेले सर्व पक्ष हे सर्वविश्व उभे करणारया माझ्यासारख्याला असे तुमचे नाकर्तेपण दाखवणार असाल तर माझ्या सर्व सामान्य रयतेला तुम्ही काय न्याय देणार आहात ? लक्षात ठेवा जो कोणी माझे हे सांगणे विसरेल , त्याला मी ' टकमक ' टोक दाखविल्याशिवाय राहणार नाही !

लेखन सीमा.

राजे राजे राजे

कळू लागल्या पासून राजे
चित्र काढू लागलो तुमचे
मंदिल मोती धारधार नाकाचे
टोकदार दाढी तेजस्वी डोळ्यांचे
पण आता काढत नाही
कारण काढायची गरजच नाही
इतके ते हृदयात ठसले आहे
आमचे हृदयच झाले आहे
तुमचे नाव मनात उमटताच
अनामिक भावनांचा पूर येतो
देहातील पेशी पेशी स्फुरित होतो
कण कण तुम्हाला मुजरा करतो
कवी संत आणि शाहिरांनी
गाईलेले तुमचे तेजस्वी यशोगान
ऐकताच आदरान अभिमानान
ओतप्रोत भरून जाते मन
लाखो मराठी मनातील प्रार्थना
उमलू लागते माझ्या मना
या राजे या आता पुन्हा
इथे फिरूनिया जन्मा

विक्रांत

सह्याद्री माझा सखा....

'शिवनेरीवर' जन्म घेत, विडा घेत 'रायरेश्वरी'
पराक्रमाचे 'तोरण'बांधी, 'राजगडाच्या' दिव्य महाली
'प्रतापगडावर' विजय मांडिला जंजि-यावर स्वारी
रणनितिचा खेळ दावतो 'रायगडाचा' दरबारी ||
पड़े गनिमांचा वेढा, आली फिरंग्यांची टोळी
झेले तोफांचा मारा, पाहि प्रेतांची होळी
दिली महाराष्ट्राची साथ नाही वाकलो मी कधी
उभे आयुष्य वेचिले, सांगु लागला सह्याद्री ||

राहुल बुलबुले

ताब्यात आला गड परी सिंह तो गेला! ॥

पुन्हां सारा उलटला भाला ।
मावळा एक झाला ।
केला मग हल्ला ।
मोंगलाची झाली तारपिट फार ।
पळती हो खाल्ला त्यांनीं लइ मार ।
घेण्याला लावली त्यांना माघार ॥
मामाची झुंज लागली ।
भानाशीं भली ।घालुन खालीं ।
भानुला धाडलं घोर नर्कांत ।
फडफडे भगवा झेंडा किल्ल्यांत ।
प्रसिद्ध झाला तिनहि लोकांत ॥
वृत्तांत सारा घडलेला ।
 कळला राजाला ।
लागली डोळ्यांला ।
 पाण्याची धार, गेला आधार ।
शिवबाला तान्हा प्राणापर प्यार ।
दुःखाचा झाला त्यास लइ भार ॥
हुंदक्यानं आला उमाळा, ।
 शिवबा बोलला ।
हाय ! घात झाला ।
ठेवुन पृथ्वीवरती आम्हांस ।
सोडुन गेला । तान्हा स्वर्गास ! ।
दैवाला नाहिं दया लव खास ॥
चाल
स्वातंत्र्यदेवि च्या गळ्यामधुन मणि गळला ॥
काय एकदांच सद्भाग्यचंद्र मावळला ॥
तो देशभक्तिचा सिंधु कोरडा पडला !॥
माणीक एक हरपला ! । स्वातंत्र्यहंस तो मेला ।
ताब्यांत आला गड परी सिंह तो गेला! ॥
पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥१०॥
- शाहीर पां.द.खाडिलकर

शिवाजी महाराजांनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे

छत्रपती शिवाजी महाराज साहेबांनी स्वराज्यात होणार्या आक्रमणामुळे
होणारी तुट आणि नुकसान भरून काढण्यासाठी वेळोवेळी मुघल आणि आदिलशाही मुलखावर स्वारी केली होती.
इ.स.१६६४ पासून शिवाजी महाराज साहेबांनी शत्रूंचे मुलुख लुटण्यास प्रारंभ केला .
शिवाजी महाराज साहेबांनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे
१. सुरत दोनदा (१६६४,१६७०)
२.बारिसाल ((१६६४)
३.बऱ्हाणपूर तीन वेळा (१६७०,१६७५,१६७९ )
४.कारंजा (१६७०)
५.बेतीगिरी, भागन गर, कुकली, वेरुड( १६७५)
६.कारवार (१६७७)
७.श्रीरंगपट्टण (१६७७)
८.हुबळी व आसपासचा प्रदेश (१६७७-७८) -महाराज साहेबांचे सरदार दत्ताजी पंडित यांनी आक्रमण करून लुटलेला प्रदेश.
९.नासिक-त्र्यंबक (१६७७-७८)
१०.अथणी व संगम (१६७७-७८)
११.धरणगाव (१६७५)
१२.चोपडे व धरणगाव(१६७९)
१३.औरंगाबाद (१६७९)
१४.कल्याण-भिवंडी येथून भूमिगत द्रव्य

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे....

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे .....
आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी महाराज जगले पाहिजेत, अस वाटायला लगाव अशी किमया शिवाजी महाराज करू शकले. इतर राजांना ते शक्य नव्हते. इतर राजांसाठी लढणारे होते, पण त्याचं लढण हे मर्दुमकी गाजवून जहागिरी अन इनाम मिळवण्यासाठी होत, उदात्त कार्यासाठी नव्हे.
शिवकार्यात लढवय्ये सैनिके तर सहभागी होतेच परंतु सर्वसामान्य रयतसुद्धा आपल्या परीने सहभागी होती आणि हे फार महत्वाच होत. राजाच्या कार्यात जेव्हा रायत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होत.
खर म्हणजे ते कार्य राजाच नसत तर सर्व रयतेच असत आणि म्हणूनच ते यशस्वी होत.
- साभार : शिवाजी कोण होता ? (गोविंद पानसरे)

जिवंतपणी मृत्यूचा अनुभव घेणारे संभाजीराजे :

जिवंतपणी मृत्यूचा अनुभव घेणारे संभाजीराजे :
मजल - दरमजल करत शिवाजीराजे राजगडावर आले. माँसाहेबांना आनंदझाला. बाळराजांची विचारपूस केली तेव्हा शिवराय अंत्यत शोकाकूल होऊन म्हणाले, "प्रवासाच्या त्रासाने शंभूबाळाचे वाटेतच निधन झाले !" राजांच्या या उदगाराने गडावर एकच रडारड सुरु झाली. संभाजीराजांच्या ­ महाराणी येसुराणी साहेब यांनी कपाळावरचे कंकू पुसले.त्यांच्या ­ निधनाची बातमी महाराष्ट्रासह संपुर्ण देशात पसरली.अनेक स्नेहांकित व नातेवाईक राजांना भेटण्यासाठी राजगडावर आले. संभाजीराजेँच्या ­ तपासाची मोहीम मघारी बोलावली.
मथुरेत असणा-या बाळराजांनादेखील ­ त्यांच्या कथित निधनाची वार्ता समजली.आपल्या जिवंतपणासाठीच निधनाची अफवा आपल्या वडिलांनी पसरवलेली आहे याची कल्पना संभाजीराजांना आली. संभाजीराजांना जिवंतपणीच मृत्यूचा अनुभव घ्यावा लागला स्वराज्यासाठी वयाच्या नवव्या वर्षी असा कटू अनुभव घेणारे संभाजीराजे हे जगातील एकमेव राजपुत्र आहेत.
शोकाकूल परिवार शांत झाल्यावर शिवरायांनी संभाजीराजांना आणण्यासाठी निवडक सैन्य मथुरेला पाठवले. वाटेत अनेक जीवघेण्या प्रसंगाला तोंड देत संभाजीराजे सैनिकांसोबत राजगडावर आले. संभाजीराजे राजगडावर आल्याबरोबरसर्वाँना आश्चर्याचा धक्का बसला."संभाजीराजे जिवंत आहेत आणि ते रायगडावर आलेले आहेत." ही वार्ता वेगाने संपुर्ण भारतात पसरली.संभाजीराज ­ांच्या सुरक्षिततेसाठी ते जिवंत असताना त्याच्या मृत्यूची बातमी पसरवणारे शिवराय विज्ञाननिष्ट तर होतेच, पण हे गुपित फक्त स्वत : पुरतेच मर्यादित ठेवणारे शिवराय मोठ्या मनाचे निश्चयी महापुरुष होते.
राजगडावर आल्यावर जिजाऊमाँसाहेबां ­नी नऊ वर्षाच्या बाळराजांना मांडिवर घेतले.बालवयात दिल्लीच्या सम्राटाला जिँकणा-या बाळराजांचा सर्वाँना अभिमान वाटला.कपाळावर कुंकू नसणा-या महाराणी येसुबाई पाहिल्यानंतर त्यांना काय वाटले असेल ? जिवंत पती पाहिल्याबरोबर येसुराणीँना काय वाटले असेल ? शिवरायांच्या परिवाराला हा त्रास कशासाठी तर भूमिपुत्रांच्या ­ स्वराज्यासाठी! वैधव्य हे कधीही अपशकुन व निरुपयोगी नसते, हे शिवरायांनी दाखवून दिले.

साडे सहाफुट उंचीचा अफझलखान मारायला सहा फुट तलवार नाही तर चार इंची वाघनख. याला म्हणतात management चा गुरु, cost effectiveness चा बाप

अफझलखान भेट प्रसंगासाठी महाराजांनी वाघनखे
बनविली.
किती खर्च आला असेल विचार करा.
तलवार, पट्टा या हत्यारांपेक्षा एक दशांश
सुद्धा नाही.
आणि विशेष म्हणजे हे वाघनख एवढ
मजबूत कि जर अफझलखानाने चिलखत घातल असेल तरी ते एका झटक्यानिशी तुटाव अस.
आणि effectiveness तर बघा, साडे सहाफुट
उंचीचा अफझलखान मारायला सहा फुट तलवार
नाही तर चार इंची वाघनख.
याला म्हणतात management चा गुरु,
cost effectiveness चा बाप.
जय शिवराय

एक लढाई संपली तरी युद्ध अजून बाकी आहे|

कैद होवूनही शंभू
अंतरी स्वराज्यबाकी आहे |
एक लढाई संपली तरी
युद्ध अजून बाकी आहे|
जरी पराभव झाला क्षणभर तरी
लढण्याची जिद्द बाकी आहे|

|| जयोस्तु मराठा ||
जय शिवराय

औरंगजेबाने सर्व पैसा ओतला. लाखो माणसे खर्च केली. हजारो दिवस महाराष्ट्रात घालवले. तरी पण शेवटपर्यँत अजिँक्यच

वर्षभराच्या आत संभाजीराजांना लीलया पराभूत करण्याच्या इराद्याने राजधानीपासून महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला तब्बल 27 वर्षे महाराष्ट्रात संघर्ष करावा लागला. शेवटी येथेच त्याचा 1707 मध्ये अंत झाला. सतत 27 वर्षे राजधानीबाहेर असणारा औरंगजेब जगातील एकमेव राजा आहे. म्हणजे सभाजीराजांचा पराक्रम, धैर्य, नियोजन किती महान होते याची प्रचिती येते.
संभाजीराजांना पराभुत करण्यासाठी औरंगजेबाने सर्व पैसा ओतला. लाखो माणसे खर्च केली. हजारो दिवस महाराष्ट्रात घालवले.पण संभाजीराजे शेवटपर्यँत अजिँक्यच राहिले. त्यांच्यावर आलेले संकट जगाच्या इतिहासात आजपर्यँत कोणावरही आलेले नव्हते.अशा सर्व संकटांवर संभाजीराजांनी मात केली.
महापराक्रमी बुधभुषणकार छत्रपतीसंभाजी राजेँना मानाचा मुजरा !!

मुजरा त्या झुंजार फौलादी देहाला.... तुझ्या स्वराज्याच्या अपार भक्तीला

नतमस्तक उभा महाराष्ट्र.....
माझ्या शभुंच्या चरणी.....
राजे मुजरा.....
मुजरा त्या झुजाँर फौलादी देहाला....
तुझ्या स्वराज्याच्या अपार भक्तीला....
तुझ्या जखमातुन वाहनारया रक्ताला....
रागंड्या तुझ्या सहनशक्तीला.....
पुन्यवान समजतो तुला जखडलेला साखळदडं
स्वताहला.......
तु शुरवीर.......
तुच रनवीर.....
तुच नरवीर......
तुच होता धर्यवीर....
तुच खरा क्रान्तीवीर....
तुच या भुमिचा स्वराज्यवीर....
अजिक्यं झुजीं दिल्या....
गनीमाचीँ वाट लावीली.....
फितुराचीँ मान छाटली......
कित्येकाची पाठ पाहीली....
कित्येकाना आस्माने दाविली......
माय बहिनीचीँ आब्रु राखली....
कितीदा तु आमच्यासाठी पेटला......
घाबरुन तुला आसमतंफाटला.....
हवेगत चालवीली तलवारीची पाती.....
कितीदा तरी भिजली असेल तुझ्या रक्ताने
स्वराज्याची माती....
ज्याने जन्माला घातले त्या श्री छत्रपतीचें
काय कौतुक....
ईथेच होतो नतमस्तकमी अपसुक.....
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हे शिवाजी राजे तसूभर हि कसूर करणार नाहीत..

खामोश...
कुंवर रामसिंह...
खामोश..
सांगा तुमच्या ह्या गाझी आलमगिराना..
या उपरी आमच्या रक्ताने
न्हाऊ घातलेल्या स्वराज्याकडे
वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्यामुघल
सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास
हे शिवाजी राजे तसूभर हि कसूर करणार
नाहीत..
साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे
राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने
मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय
सम्राट जगाच्या इतिहासाने
या आधी कधी पाहिला नव्हता आणि या पुढे
हि पाहणार नाही..
जय जिजाऊ !!
जय शिवराय !!
जय शंभूराय !!

शिवरायांचे संस्कार आम्हावर, करणार नाही दगा...

शिवरायांचे
संस्कार आम्हावर,
करणार नाही दगा...
पाठीमागुन वार करणाऱ्यांनी
एकदा
समोर तर येवुन बघा...
जय शिवराय..

''एक मराठा, लाख मराठा"

शेकडो वर्षे झाली तरी
राजे
तुमच्या आठवणीने
छातीचा भाता फुलतो.,
नुसत्या तुमच्या नामघोषातुन
''एक मराठा,
लाख मराठा" बनतो...!!!

बोला
छत्रपती शिवाजी महाराज की जय

धूळ चारून गनिमाला.. छाती ठोकून सांगतो जगताला,

अभेद्य आमुची नजर..
रांगडा अमुचा बाणा,
मुखी शिवरायांचा गजर..
जीवन अमुचे वाहिले सह्याद्रीला,
धूळ चारून गनिमाला..
छाती ठोकून सांगतो जगताला, ।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

ज्यांच्या स्पर्शाने पवित्रझाली हि माती, ज्यांचे नाव घेता फुगते.

ज्यांच्या स्पर्शाने पवित्र
झाली हि माती,ज्यांचे नाव घेता फुगते
गर्वाने छाती...!!
ज्यांनी स्वबळावर
सत्ता आणली मराठ्यांच्या हाती त्यांनाच
म्हणतात ''राजा शिवछत्रपती''... .
जय जिजाऊ...
जय शिवराय....
राजाधिराज, कर्तव्यदक्ष
छत्रपती शिवराय दुर्गपती,
गजअश्वपती, भूपती, प्रजापती,
सुवर्णरत्नंश्रीपती, अष्टावधानजागृत,
अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडीत,
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रीयकुलावतंस, सिँहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज, श्रीमंत पुण्यश्लोकश्री
श्री छ. शिवाजी महाराज की जय||

बिथरले स्वर अन थरथरल्या जिव्हा॥ माय जिजाऊ पोटी तुझ्या आता पुन्हा शिवबा हवा॥

बिथरले स्वर
अन
थरथरल्या जिव्हा
माय जिजाऊ
पोटी तुझ्या आता पुन्हा शिवबा हवा
रक्तात भिजुन मराठ्यांच्या भगव्यालाजोर
चढावा
उसळुदे छातीत दर्या
अन
तप्त लाव्हा
माय जिजाऊ
पोटी तुझ्या आता पुन्हा शिवबा हवा
बहुजनात क्रांतीचा पेटु दे दिवा
हर महादेवाचा सुर दाही दिशा घुमावा
माय जिजाऊ
पोटी तुझ्या आता पुन्हा शिवबा हवा
मागने ईतकेच तु ऐक देवा
या मातीला खरच आहे हवा
पुन्हा तोच शिवपुत्र छावा
माय जिजाऊ
पोटी तुझ्या आता पुन्हा शिवबा हवा
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।-

भगवा धरण म्हणजे येड्या गबाड्याच काम नव्हे

भगवा हातात धरायला
ह्रुदयात शिवतेजाची आग लागते

मनगटात अब्जावधी हत्तींच बळ लागते

भगवा धरण म्हणजे
येड्या गबाड्याच काम नव्हे
कारण त्यासाठी ह्रुदयात
"छत्रपती शिवराय" लागतात .
जय शिवराय
!!जय महाराष्ट्!!

चक्रवर्ती छत्रपती शिवराय...

राजांनी फक्त सिंहासनावर बसून राज्य करायचे नसते
तर समरप्रसंगीरणांगणात उतरून आपल्या रक्ताचा अभिषेक घालत
मातृभूमीचे रक्षण करायचे असते ..
आपल्या स्वराज्याला मातृभूमी मानून तहयात लढा पुकारणारे
अद्वितीय चक्रवर्ती छत्रपती शिवराय...

शिवा माझा मूघलांच्या बापांचा बाप

तलवार एक धारी
तर शिवा
दोन धारी होता ।
एकटाच शिवा माझा
लाखात भारी होता ।।
सर्व मूघलांना
शिवाचा धक्का होता ।
शिवा माझा
मूघलांच्या
बापांचा बाप होता।।
जय शिवराय

छत्रपतींचे ४ शिवविचार डोक्यात रुजवुन त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणारे जिवन कधीही बेहत्तर

स्वार्थासाठी माणुसकी वेशीला टांगत
माणसांची मने दुखवुन पैशाच्या ढिगभर कागदी नोटा जमवुन
करोडपती होण्यापेक्षा
छत्रपतींचे ४ शिवविचार डोक्यात रुजवुन त्यानुसार
जगण्याचा प्रयत्न करणारे जिवन कधीही बेहत्तर
जय जिजाऊ जय शिवराय

।। प्रेरणा मंत्र ।। - धर्मासाठी झुंझावें । झुंझोनीं अवघ्यासी मारावें ।

।। प्रेरणा मंत्र ।।
धर्मासाठी झुंझावें । झुंझोनीं अवघ्यासी मारावें ।
मारितां मारितां घ्यावें । राज्यआपुलें ।।१।।
देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावें परते ।
देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशोयो नाही ।।२।।
देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावां ।
मुलुख बडवावा कीं बुडवावा । धर्मसंस्थापनेसा ­ठीं ।।३।।
।। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजीमहाराज की जय ।।
।। धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज की जय ।।
... ।। भारत माता की जय ।।
।। हिन्दुधर्म की जय ।।

मोडेन पण वाकणार नाही

संस्कार जिजाऊचे
प्रेरणा शिवरायांची
उरात आठवण शंभुची
हिच परपरा मराठ्याची
तलवारची धार या मनगटातील ताकद तुमची
रक्ताने वीर मी छाताडातली आग तुमची
मोडेण पण वाकणार नाही
मृत्यु जवळचा पण झुकणार नाही

रक्त सांडले या माती

रक्त सांडले या माती..
वेचले आम्ही स्वराज्य मोती..
भिडवीली रणांगनांशी छाती..
रोखली आम्हीच वादळांची गती..
पराक्रमापुढे थरथरली धरती..
म्यानातुन उसळे तलवारीची पाती..
 भगव्याच्या अभिमाना प्रती..
श्वासातुन वाहे राजा शिवछत्रपति..

मराठे

जेवढ्या ताकदीने मराठी माणुस
तरवार चालवु शकतो...
तेवढ्याच ताकदीने ( कौशल्याने )
लेखनी सुद्धा चालवु शकतो

ll मृत्यू सुद्धा थरथरत होता स्वराज्याच्या धाकल्या छत्रपतीला ll

ll मृत्यू सुद्धा थरथरत होता स्वराज्याच्या धाकल्या छत्रपतीलाll
संभाजीराजे म्हणजे वाघासारखी डरकाळी फोडणारा ,
संभाजीराजे म्हणजे हरणासारखा दौँडत पळणारा,
संभाजीराजे म्हणजे चित्यांसारखाचपळ असणारा ,
संभाजीराजे म्हणजे वादळासारखे तुफान काळजावर घेऊन फिरणारा ,
संभाजीराजे म्हणजे संघर्षाँची अनुभूती हर क्षणी घेणारा ,
संभाजीराजे म्हणजे अवघे विश्व आपल्या तलवारीच्या पात्यावर पेलून धरणारा ..राजा
!!जय शंभुराजे!!

Tuesday 5 March 2013

अन्याय करायचाही नाही अन सहनही करायचा नाही.

एका गालावर मारल्यास
दुसरा गाल पुढे करणारे
आम्ही नाही
आम्ही तो हातच मुळासकट
छाटुन टाकतो
कारण आम्हा शिकवण आहे
राजांची
अन्याय
करायचाही नाही अन
सहनही करायचा नाही.
जय जिजाऊ !!
जय शिवराय !!
जय शंभुराजे !

उंचविला भगव्याचा सन्मान तु

उंचविला भगव्याचा सन्मान तु,
जगविले मरगळलेले हिंदु तु,
घडविले श्रींचे राज्य तु,
ऐसा श्रीमंत योगी माझा शिवराय तु..!!!!!

एकच राजे शिव छञपती माझे
जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभुराजे.

महाराष्ट्राचा पहिला मुजरा
माझ्या शिवाजी राजांना.....!!

शंभूराजे आहेतच इतके तेजस्वी की.. त्यांच्याविषयी वाचताना गवतालाही भाले फुटतील...

शंभूराजे आहेतच इतके तेजस्वी की..
त्यांच्याविषयी वाचताना गवतालाही भाले
फुटतील...
दगडातही प्राण येईल..
तलवारी तर तांडव नृत्य
करतील..
आपण तर हाडा-मासांची माणसे..
आपले काय झाले पाहिजे..?
अंगावर काटा आला तर त्या कट्यातही समशेर
झळाळली पाहिजे..
!! जय शंभूराजे..!!

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।

कुणी वीट मारे दगड हेच उत्तर ।
दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर ।।
स्वये होई वणवा गिळाया आगीला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।११।।
घणाघात घालू मुघलतख्त फोडू ।
पुरे जाळुनी राख पाताळी गाडू।।
अटकपार सूडार्थ आसूसलेला ।
... मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१२।।
फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूंना ।
तसा चित्तीँ ध्यातो शिवा काशिदाना ।।
सदा सिध्द त्रयीवत तनु झोपण्याला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१३।।
शिवा काशिदांचा असामान्य त्याग ।
मला हि असा लाभू दे कर्मयोग।।
असे मागतो नित्य तुळजापदाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१४।।
कुणी क्रुर भेटे बने लक्ष क्रुर ।
त्वरे मारतो पोट फाडूनी ठार।।
शिवाजी जसें फाडिती अफझल्याला।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१५।।

पुण्यश्लोक छत्रपती श्री. शिवाजी महाराज की जय ।
धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज की जय

Monday 4 March 2013

गर्व आहे मला मी शिवबाच्या पंढरीत जन्म घेतला

सह्याद्रीचे सांगणे….
मी कुणाचा?
मी कशाचा?
हे कुणीही दाखवू नका
पिढ्या न पिढ्या
शतको न शतके
एकंच मी सांगत आहे..!!
कुणाची न जहागिरी
न कुणाच्या पदरी
मजवरी राज्य फक्त दोहोंचे
प्रथम शिवरायांचा गनिमीकावा
तदनंतर शिवरायांचाच छावा..!!

मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही... ११ मार्च : आपल्या शंभूराज्यांचा बलिदान दिन

मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही...
११ मार्च : आपल्या शंभूराज्यांचा बलिदान दिन..
मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही...
या उक्ती प्रमाणेच औरंग्याच्या कुटीलमनसुब्यांना सुरुंग लावून
राज्यासाठी आणि स्वराज्यासाठी बलिदानाचा मार्ग स्वीकारलेले
स्वराज्याचे धाकले धनी अखंड लक्ष्मी अलंकृत
श्री राजमान्य राजश्री श्रींमंत छत्रपती
महावीर महापराक्रमीसंभाजीराजे भोसले यांना आदरांजली अर्पण करायला विसरू नका,,,

शंभू राया ,बलिदान तुमचे व्यर्थ न जाओ
हि प्रार्थना शिवचरणी..
स्वप्न साकारण्या तुमचे
आम्ही करू एक आकाश आणि धरणी!!!!

अभेद्य आमुची नजर.. रांगडा अमुचा बाणा,

अभेद्य आमुची नजर..
रांगडा अमुचा बाणा,
मुखी शिवरायांचा गजर..
जीवन अमुचे वाहिले सह्याद्रीला,
धूळ चारून गनिमाला..
छाती ठोकून सांगतो जगताला,
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

Sunday 3 March 2013

"उभाच राहीन मी सांगेन गाथा तुमच्या पराक्रमाची"...! ­!! "आठवण सदा करून देईन मराठ्यांच्या इतिहासाची"...!!

"उभाच राहीन मी सांगेन गाथा तुमच्या पराक्रमाची"...! ­!!
"आठवण सदा करून देईन मराठ्यांच्या इतिहासाची"...!! ­!
होय अम्हिच ते वेडे,ज्यांना आस इतिहासाची. असेल कोणा ताकद येथे आमच्या सामोरे येण्याची? अरे नुसत्या फ़ुंकेत उडवूनी टाकू,अशीछाती फ़ोलादाची.
मराठा इतिहास हा माझा आवडीचा विषय त्यातूनच इतिहासाबद्दल गोडी निर्माण झाली व पुढे जाऊन कादंबरी ,संदर्भ पुस्तके वाचण्याचा छंद निर्माण झाला.त्यातूनच माहित असलेला इतिहास सर्वाना उपलब्ध व्हावा या विचारातून हे पेज बनवले गेले .
इतिहासाच्या वाटेवर या पेजवर परिचित-अपरिचित इतिहासाचा मागोवा आणि इतिहासाच्या पाऊलखुणा उजेडात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला जात आहे,त्यात शिवपूर्व काळ ,शिवाजी महाराजांचा काळ व त्या नंतरचा काळ अशा स्वरूपातील इतिहास सदर करण्याचा मानस आहे.
।। एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय ।।
- इतिहासाच्या वाटेवर

मराठे भित नाही कोणाच्या बापाला..

मराठे भित नाही कोणाच्या बापाला..
छाताडावर तलवारीचे घाव घ्यायला..
असा तसा नाय आम्ही ईतिहास घडविला..
अजुनही दहा वेळा विचार
करावा लागतो मराठ्यांच नाव घ्यायला..
आरे कोण कुठला सरदार..
आमच्या वाटेला येशिल तर खबरदार..
फाडुन टाकीन वाघाची जात हाय..
हा मर्द मराठा कोणाला काय समजत
नाय..
सह्यांद्रिच वारा पिउन
जगतो हा मराठा..
टोळक्यांना कोण डरतो हा वाघ
फिरतो एकटा..
थरथर कापतात आत्मे आजुनही मोगलांचे..
नाव घेताच छत्रपति शिवरायांचे..
कापल्या आम्हीच
सैतानी मोगलांच्या टोळ्या..
खेळल्या त्यांच्याशी रक्ताच्या होळ्या..
जिजाऊंची स्वप्न पेटतात आमच्या उरात..
त्यांचीच जगा आहे आमच्या देवघरात..
आमचा देव नाही दुजा..
करतो फक्त छत्रपतिंची पुजा..
मराठे विसरले नाहीत अजुन गनिमी कावा..
कस
झुंजत झुंजत झुंजुण
मरायच शिकवुन गेलाय
शंभु छावा..
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!

मराठा म्हणजे

मराठा म्हणजे वाघासारखा डरकाळी फोडणारा
मराठा म्हणजे हरनासारखा दौडत पाळणारा
मराठा म्हणजे चीत्यासारखा चपळ असणारा
मराठा म्हणजे वाऱ्यासारखे तुफान काळजात घेऊन फिरणारा
मराठा म्हणजे संघर्षाची अनुभूती हरक्षणी घेणारा ...
मराठा म्हणजे हे उभे विश्व आपल्या तलवारीच्या पत्यावर पेलून धरणारा,
मर्हाटा म्हणजे मर कर जो हटा सो मर्हाटा
जय शिवराय

जो महाराष्ट्रात राहतो.. तो मराठी बोलतो...

जो महाराष्ट्रात राहतो..
मराठी बोलतो...
या मुलुखासाठी लढतो...
मग तो कोणत्याही जाती व धर्माचा असो..
त्याला मराठा अस म्हटल जात....
मी मराठा आहे..
मराठी नव्हे..
कारण
मराठा ही आपली ओळख आहे..

मराठी ही आपली मायबोली..
जय शिवराय..
जय महाराष्ट्र..

हृदयात जपतो आम्ही राजा शिव छत्रपती...

शोभतो भगवा टिळा आमच्या ललाटी
नाद करू नका आमचा आणि नका येऊ वाटी...
थकला नव्हता मालोजी जरी उलटली होती साठी
आई जिजाऊची संस्कार रुपी थाप आहे
आमच्या पाठी...
मनगटाने कापतो आम्ही तलवारीच्या पाती
हृदयात जपतो आम्ही राजा शिव छत्रपती...
|| आमचा देव नाही पंढरपुरी ||
|| चार धामचा उगम आहे किल्ले शिवनेरी ||
जय जिजाऊ
जय शिवराय.

शंभुराजेंचे जन्म व बालपण:

त्या वेळी शिवाजी महाराज छत्रपतीझालेले नव्हते. ते सार्वभौम राजे नव्हते. तसे ते जहागिरदारच होते. पण कुणाचीही सत्ता चालवून घेत नव्हते. आदिलशाही, कुतुबशाही, मोगल इ. सारे त्यांना वठणीवर आणायला टपले होते. एका सरदाराचा बंडखोर मुलगा एवढीच त्यांची प्रतिमा होती. पण कुणालाच आवरेनासा झालेला हा बंडखोर.
उभा महाराष्ट्र त्यांच्या पराक्रमाने दिड:मुढ झाला होता. एका नवविवाहीत तरूणीवर अत्याचार करणार्या रांझ्याच्या गुजर पाटलाचे हातपाय याच शिवबांनी तोडले होते. तोरणा, सिंहगड इत्यादी अनेक किल्ले त्यांनी स्वराज्यात आणले होते. रायरीच्याचंद्रराव मोरेचा बिमोड याच शिवरायांनी केला. कल्याण- भिवंडी ते रायरीपर्यंतचा मुलूख यांनीच काबीज केला होता. यामुळे महाराष्ट्रात शिवरायांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता.
इकडे मे १६५७ मध्ये पुरंदर गडावर सईबाईना प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. त्यांना या पूर्वी तीन मुलीच झाल्या होत्या. सखुबाई , राणूबाई, अंबिकाबाई ; या खेपेला पुत्र व्हावा ही सर्वांचीकामना होती. सारा शिवपरिवार पुत्र व्हावा यासाठी आसुसलेला होता. सार्यांची प्रार्थना जणू त्या आई जगदंबेने ऐकली. आणि १४ मे १६५७, शालिवाहन शक १५७९ , ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुरंदरावर पुत्रजन्माची गोड वार्ता पसरली. भोसल्यांच्या वंशवेलीला अंकूर फुटला. नातवाला पाहून जिजाऊ माँसाहेब अत्यंत आनंदीत झाल्या. नातू म्हणजे दुधावरची साय- नाजूक प्रकृतीच्या सईबाई साहेब बाळंतपणातून सुखरूप बाहेर पडल्या. गोरेपान, गुटगुटीत , अत्यंत लोभस, तेजस्वी डोळे, भरपूर जावळ असे ते वजनदार बाळ सार्या पुरंदरचा जीव की प्राण बनले.
सारी कामे बाजूला ठेवून शिवाजीराजे पुत्राचे मुख पाहण्यासाठी पुरंदरकडे झेपावले. श्री शिवशंभूची कृपा म्हणून बाळाचे नाव शंभुराजे अर्थात संभाजी असे ठेवण्यात आले. कदाचित जिजाऊ माँसाहेबांच्या दिवंगत ज्येष्ठ पुत्राची स्मृती म्हणूनही हे नाव ठेवण्यात आले असेल!
प्रभु श्री रामांना तीन माता होत्या. शंभुबाळासही अनेक माता लाभल्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई इ. या सर्वजणी शंभुबाळाचे खूपच लाड करीत. त्यांची सख्खी आई कोणती हे ओळखणं हे कठीण जाई.
सईबाईसाहेब प्रकृतीने अगदीच नाजूक होत्या. बाळ मात्र भलताच दणदणीत. आईकडून बाळाचे पोट भरेना. बाळासाठी दाई ठेवणे आवश्यक होते. दूधआई मिळवण्यासाठी शोध सुरू झाला. नसरापूर जवळील कापूरहोळ गावच्या गाडे पाटलाची पत्नी धाराई ही सुद्घा नुकतीच प्रसूत झालेली होती. आऊसाहेबांनी धाराईला आवतन धाडले व धाराई लगबगीनं आपल्या बाळासह पुरंदरला आली. धाराईच शंभुबाळाची दूधआई झाली. महाराजांनी २६ होनांचे वार्षिक मानधन तिला दिले.
शंभुबाळ वर्षाचे झाले तेव्हा स्वराज्यात चाळीस किल्ल्यांवर महाराजांची सत्ता होती. महाराजांनी औरंगजेबाचे प्रदेश जिंकणे, घोडे, खजिना, शस्त्रास्त्रे, रसद लुटणे इ. प्रकार दणक्यात चालविले होते. विजापूरकरांना त्यांनी पुरते पजवले होते.
विजापूरकरांनी शिवरायांना कायमचे नष्ट करण्यासाठी अफझलखानाला पाठविला . पण महाराजांनी ११ नोव्हेंबर १६५९ लात्याचा वध केला. अफझलखानासारख्या ­मातब्बर सरदाराची वाताहात झाल्याने सर्वच शाह्यांनी धास्तीच घेतली. त्या वेळी शंभुराजे केवळ अडीच वर्षाचे होते. पण या भिमपराक्रमाने उभा महाराष्ट्र हादरलेला त्यांनी पाहिला होता.
दुर्देवाने यापूर्वीच फक्त २ महिने म्हणजे ५ सप्टेंबर १६५९ ला शंभुबाळाच्या आई सईबाईसाहेब देवाघरी गेल्या होत्या. यानंतर प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड करीत काही महिन्यांनी शंभुराजे आणि माँसाहेब यांना घेऊन महाराज आता राजगडास आले होते.
शंभुबाळ आपल्या बालपणात महाराजांच्या पराक्रमाच्या अनेकगोष्टी ऐकत होते. अफझलखानाचा वध, सूरतेची लूट, सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडली इ. सार्या गोष्टी ऐकताना शंभुराजेंच्या अंगावर चेव चढत असे. त्यांचे शरीर अत्यंत डौलदार होते. मल्लखांब, जोर, बैठका, सुर्यनमस्कार इत्यादी व्यायामप्रकार सुरू होतेच. भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी इ. शिक्षण चालूच होते. असे म्हणतातकी, त्या काळी पळत्या घोड्याला एका पायावर उभे करुन डोळ्याची पापण्या लवतो न लवतो तोच गर्रदिशी फिरवणारा जगाच्या पाठीवर एकच योद्धा होऊन गेला, तो म्हणजे 'संभाजी'.
उमाजी पंडित आणि केशव पंडित संस्कृत भाषा, साहित्य, काव्य, रामायण, महाभारताचे बाळकडू देत होते. दिसामासांनी शंभुराजे ८ वर्षांचे झाले.
संदर्भ- प्रा. सु. ग. शेवडे लिखित 'शंभुराजे'

एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करणारे आम्ही नाही

एका गालावर मारल्यास
दुसरा गाल पुढे करणारे
आम्ही नाही
आम्ही तो हातच मुळासकट
छाटुन टाकतो
कारण आम्हा शिकवण आहे
राजांची
अन्याय
करायचाही नाही अन
सहनही करायचा नाही.
जय जिजाऊ !!
जय शिवराय !!
जय शंभुराजे !

माझे राजे

माझे राजे
शिवछत्रपती मराठ्यांचा श्वास....
शिवछत्रपती मराठ्यांचा प्राण....
शिवछत्रपती मराठ्यांचा अभिमान...
शिवछत्रपती आपुले
आयुष्य....
शिवछत्रपती मराठ्यांच्या नसानसामध्ये
वाहणारे नाव...
शिवछत्रपती उत्तुंग
उभ्या सह्याद्रीचे वाघ...
शिवछत्रपती समस्त
विश्वाचे
महानायक.....
शिवछत्रपती रांगड्या मराठ्यांचीशान.....
शिवछत्रपती स्वराज्याच्यादु
श्मनांचे
कर्दनकाळ...
शिवछत्रपती जिजाऊच्या पोटी जन्मलेला ढाण्या वाघ....
शिवछत्रपती माणसाला माणसाप्रमाणे
जगायला शिकवणारे....
शिवछत्रपती गडकोटांचे
धनी... माझे
शिवछत्रपती वाघाच्या डरकाळीत,
तलवारीच्या धारित...
शिवछत्रपती माझ्या ध्यानी,
मनी फक्त आणि फक्त
राजा शिवछत्रपती.....
!!!!

मराठ्याची पोरे आम्ही नाही भित मरणाला....

मराठ्याची पोरे
आम्ही नाही भित
मरणाला .......
सांगुन गेला कोणी शाहिर
अवघ्या विश्वाला .......
तिच आमुचि जात........
मराठी मळवट
भाळी भवानीचा .......
पोत दाखवूनी नाचतो......
दिमाख आहे
जबानीचा ........
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभूराजे !!

राजांच्या कर्तुत्त्वामुळे ­ स्वत: "इतिहासाचा" गौरव झाला आहे.

राजांच्या कर्तुत्त्वामुळे ­ स्वत: "इतिहासाचा"
गौरव झाला आहे...
शिवरायांचे वेड डोक्यात गेल्यावर दुसरे काहीच
सुचत नाही...
दुसरे सुचायला आम्हीच आमच्यात उरत नाही....

जयस्तु शिवशंभु..!!!

गेल्या बाधुंन भगव्या झेंड्याला.. सह्यांद्रिच्या टोकाला.. जो धाकात ठेवतो लाल किल्ल्याला..

गेल्या बाधुंन भगव्या झेंड्याला..
सह्यांद्रिच्या टोकाला..
जो धाकात ठेवतो लाल किल्ल्याला..
हे पाहुन हिमालय आजुनहि झुकतो मुजऱ्याला...
तुम्हीच घडवीले शिवबाला...
आग पाजली वाघाला..
ज्याने एक हाती घडविले स्वराज्याला..
जो नमवुन गेला ईतिहासाला...
अशा विर मातेला मि मुजरा करतो झुकुन
स्वराज्याला..
या मावळ्याचा
राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब
याच्यां चरणी मानाचा मुजरा...
! ! ! ! ! ! ! ! !
_/\_

अर्जव करीतो महाराष्ट्र यावे राजे पुन्हा जन्माला

अर्जव करीतो महाराष्ट्र यावे राजे
पुन्हा जन्माला
पहा येऊन एकदा काय चाललय तुम्ही जिथे
ईतिहास घडवीला
पत्थराच्या चीऱ्यातुन निखळतोय एक एक दगड
तुमच्या अठवणीने विव्हळतोय बघा कसा रायगड
कसले राजकारणाचे खेळ खेळले जातात
वाघाची खोळ घालुन लांडगे डरकाळ्या देतात
कालपरवाचे उतावळे नकलाच्या भरवशावर
जगतात
शिवस्मारकाला विरोध करुन
मंदिराला वर्गनी मागतात
काय चाललय राजे
तुमच्या स्वराज्याच्या छातीवर
का खेळल जातय ईथे राजकारण जातीपातीवर
तुमचा मावळा म्हणजे या देशाचा कणा
तलवार सोडुन तंबाखुला लावतो चुना
रोज घेतो या पक्षातुन त्या पक्षात उड्या
अन
तोंडात रिचवतो गुटक्याच्या पुड्या
खर सांगु राजे
आता तुम्हालाही ईथे किंमतनाही
शिवस्मारकाला विरोध करणाऱ्याची गर्दन
मारायची कुणात हिंमत नाही
राजे
मी सुध्दा दोषी आहे तुमचा
तुम्ही खुषाल कडेलोट करा आमचा
माझ जरी
तुमच्या स्मरणा शिवाय भागत नाही
पण
हे सुध्दा खर आहे
कि तुमच्या शिकवनी नुसार
मी वागत नाही
राजे
माफी मागायलाही लाज वाटते
तुमच्या नसन्याची खंत आज काळजात दाटत

शिवबळ

शिवबळ...
काय रणांगण सोडूनी परताया मागे
असे का आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी
जपावे पराभूत प्राणा..||१||
कोट्यावधी जगतात जीवाणू जगती आणिमरती
जशी ती गवताची पाती
शिवप्रेमी आम्ही फिरतो सात नभाखाली
निर्मितो नव क्षितिजे पुढती..||२||
वाट आमुची रोखू शकती ना धन ,
ना फितुरांची धारा
शिवरायांचे निशाण मिरवू महासागरात
जिंकू खंड खंड सारा..||३||
चला उभारू नव स्वराज्य अन सजवू
सह्याद्रीला
अनंत आमुची शिवभक्ती दाखवू
फितूर वानराला..||४||
जय जिजाऊ
जय शिवराय .

Saturday 2 March 2013

!! धर्मवीर छत्रपती संभाजीराजे!! ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो ..

!! धर्मवीर छत्रपती संभाजीराजे!!
ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलयापेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.
इतिहासामध्ये ज्यांची नोंद एकहि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली
शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयारकरण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशयप्रबळ आणि प्रभावी बनवले.
टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज, निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही . तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला.शिवरायां नी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.
याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव"सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्वअसलेला हा राजा.
खुद्द औरंजेब दक्खन स्वारीवर आलेला असतांना त्या पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच संभाजी राजांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते.केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला.
स्वकीयांनीच विश्वास घात करूनसंभाजीमहाराजांन ा औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळेकाढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंतऔरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही.खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः लाहा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंतत्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.
संभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातूनआणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी मातीमधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरतायेणार नाही.
याच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचेकाम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनीआणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही.
मराठ्यांच्या ह्या शाक्तवीर, नरवीर, दूरदर्शी, अविस्मरणीय पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा...

!!जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे!!

जो जगतो मनगटातील ताकदीच्या जोरावर त्या हाती तलवार आहे

दैवाच्या भरवशावर जगनाऱ्याच्या हाती
पुजेच ताट
अन
फुलांचा हार आहे
पण
जो जगतो मनगटातील ताकदीच्या जोरावर
त्या हाती तलवार आहे
अशा शुरविरांनाच माझा सलाम आहे
ईतिहास ज्यांचा गुलाम आहे
जय जिजाऊ जय शिवराय

- गजानन बोरकर

स्वराज्याचा पुरावा देत आहे माझा एक एक कडा, येथेच सांडला गड्या आम्ही शत्रुच्या रक्ताचा सडा

हे राज्य माज्या शिवरायांचे आहे -
कैलासाच्या माथी जरी शिव शंकर विराजले,
बघ मराठ्यांच्या कुशीत माझे शिवराय गरजले,
टाप मारताच येथे उधळली तलवारीची पाती,
येथेच जुळली माझ्या मराठा मनाची नाती..
स्वराज्याचा पुरावा देत आहे माजाएक एक कडा,
येथेच
सांडला गड्या आम्ही शत्रुच्या रक्ताचा सडा,
यवनाच्या आक्रमनाची याद आहे आजुनताजी,
गनिमाच्या उरावर नाचले माझे तानाजी अन
बाजी..
ह्रदयात माज्या खलखलतात
कोयना आणि कृष्णा,
मराठा मनाची आणि मातीची भागीवली त्यानी तृष्णा,
कसा सांगू लेका उर माजा फुटत आहे,
रायगड आणि प्रतापगडी मी तीळतीळ तुटत
आहे..
आफजल्याचा वाढता बुरुंज काळीज माज तोडू
पाहे,
सांगा ओरडून त्याला हे राज्य
माज्या शिवरायांचे आहे...

उंचविला भगव्याचा सन्मान तु

उंचविला भगव्याचा सन्मान तु,
जगविले मरगळलेले हिंदु तु,
घडविले श्रींचे राज्य तु,
ऐसा श्रीमंत योगी माझा शिवराय तु..!!!!!
एकच राजे शिव छञपती माझे
जय जिजाऊ. जय शिवराय.
जय शंभुराजे.
महाराष्ट्राचा पहिला मुजरा
माझ्या
शिवाजी राजांना.....!!

Friday 1 March 2013

११ मार्च : आपल्या छत्रपती संभाजीराजेंचा बलिदान दिन..

११ मार्च : आपल्या छत्रपती संभाजीराजेंचा बलिदान दिन..
स्वताच्या तेजाने प्रकाशमान होत भारतीयांना स्वातंत्र्याची दिशादाखवणाऱ्या व आपल्या रक्तात स्वाभिमानाचा अंगार फुलवणाऱ्या ह्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याला श्रद्धांजली वाहायला विसरायचे नाही मित्रानो...
शंभू राया ,बलिदान तुमचे व्यर्थ नजाओ हि प्रार्थना शिवचरणी..
स्वप्न साकारण्या तुमचे आम्ही करू एक आकाश आणि धरणी !!!! —

Thursday 28 February 2013

घासल्या तलवारी आम्ही या फौलादी छातीवर..... गर्वच नाही तर माज आहे या मराठ्याच्यां जातीवर......

घासल्या तलवारी आम्ही
या फौलादी छातीवर.....
गर्वच नाही
तर माज आहे
या मराठ्याच्यां जातीवर......
गनीमाला भित नाही
विश्वास तलवारीच्या पातीवर......
फितुर जळतात पाहुन
आमच्या वाघाच्या कातीवर......
लोळवीले षडं
पाजले पाणी
याच स्वराज्याच्या मातीवर......
आमची निष्ठा`प्रतिष्ठा`
मान`मर्यादा` स्वाभिमान` अभिमान`
फक्त आणि फक्त
``श्री शिव छत्रपतीँ`` वर...
♥♥♥शिवसकाळ मावळ्यांनो♥♥♥

॥छत्रपति शिवाजी महाराज॥

छत्रपति शिवाजी महाराज !!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :-महाराष्ट्राची ­ ­­ शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
म्हणजे
"॥छत्रपति शिवाजी महाराज॥"

पुन्हा माणुसम्हणुन जन्माला आलो तर मला फक्त छत्रपतींचा मावळा म्हणुनच येऊ दे.

वार झालो तर
भवानी तलवार
होवु दे,
वाघ
नको वाघ
नखे होऊ दे,
मंदीर नको
जगदेश्वराची पायरी होवु दे,
आणि पुन्हा माणुस
म्हणुनच
जन्माला आलो तर
फक्त
आणि फक्त
छत्रपतींचा मावळा म्हणुनच येऊ दे.
राजाधिराज, कर्तव्यदक्ष
छत्रपती शिवराय दुर्गपती,
गजअश्वपती, भूपती, प्रजापती,
सुवर्णरत्नंश्रीपती, अष्टावधानजागृत,
अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडीत,
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रीयकुलावतंस, सिँहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज, श्रीमंत पुण्यश्लोकश्री
श्री छ. शिवाजी महाराज की जय||

जी माणसं, माणसं जोडतात, तीच आयुष्यात यशस्वी होतात :छत्रपति शिवाजी राजे

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो.
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो.
जो आयुष्यभराचा,
शंभर वर्षाचा विचार करतो,
तो माणुस जोडतो ,आणि जी
माणसं, माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात.
:छत्रपति शिवाजी राजे

Wednesday 27 February 2013

सूर्योदय झाला शिवनेरी वर शिव सूर्याचा जन्म झाला



सूर्योदय झाला शिवनेरी वर

शिव सूर्याचा जन्म झाला

सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात

शिव वादळाचा जन्म झाला

पारतंत्र्याचा अस्त करण्या

शिव शक्तीचा जन्म झाला

धन्य झाली आई जिजाऊ

शिव पुत्र हा जन्मास आला

धन्य धन्य झाला महाराष्ट्र

शिव राज्याचा जन्म झाला

या मायभूमीचे रक्षण करण्या

शिव मराठा जन्मास आला

जात पातीचे तोडन्या बंध

शिव धर्माचा जन्म झाला

हिंदवी स्वराज्य घडविण्या

शिव छत्रपतीचा जन्म झाला

-प्रदीप खेकारे ....

शिवकल्याण राज्यासाठी फक्त आणि फक्त शिवा पाहिजे ..

कोंढाणा सर करुन
सिंह ठरलेला " ताना " पाहिजे
रक्ताच्या अभिषेकाने खिंड
पावन करणारा " बाजी " पाहिजे
" शिवजीराजे " म्हणून हसत-हसत
मरणारा " शिवा " पाहिजे
अंधार पडत चाललाय ,
आता खरच, दिवा पाहिजे
सह्याद्रीवर घरटं करणारा अन्
वाऱ्यावर सैर करणारा
गरुडांचा थवा पाहिजे
सह्याद्रीला बाळासारखा लुसणारा
अन् मृत्युला कवटाळताना हसणारा
सिंहकलेजाचा छावा पाहिजे
मळमळीत ह्या समाजाला
जळजळीत दवा पाहिजे
अंधार पडत चाललाय
आता खरच दिवा पाहिजे
शिवकल्याण राज्यासाठी
फक्त आणि फक्त शिवा पाहिजे ..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

राजाधिराज
महाराज श्रीमंत
श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजकि जय...........
""लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
अमृताहूनही गोड जी असे
मायेची ऊब जिच्यात भासे,
गर्व जिचा या महाराष्ट्राला
भाषा असे ती आमुची मराठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...
मातीत या वाढलो आम्ही
मातीत या घडलो आम्ही,
अभिमान जिचा असे आम्हाला
नसानसातून ती वाहे मराठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...
संस्कृतीचा मान असे ही
महाराष्ट्राचीशा न असे ही,
ताकद जिची असे आम्हाला
मनामनातून ती वसे मरठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...
धर्म असू दे कुठलाही
पूत्र आम्ही या मराठीचे,
अभिमान जिचा असे आम्हाला
ह्रुदयात जपतो ती मराठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.."

तमाम मराठी बांधवाना 'मराठी राजभाषा दिना'च्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!!!

अमृताहूनही गोड जी असे,
मायेची ऊबजिच्यात भासे...!!!
गर्व जिचा या महाराष्ट्राला,
भाषा असे ती आमुची मराठी...!!!
मातृभाषा ... माणसाच्या
आत्मसन्मानाचा हुंकार .
त्याच्या अस्तित्वाचा एक मूलाधार .
आज मराठी दिन .
आपल्या मराठीपणाचा झेंडा दिमाखात गगनान फडकावण्याचा शुभदिन .
हा झेंडा मजबूत हातांनी फडकवताना भान हवं विस्तारत असलेल्या गगनाचं
आणि बदलत असलेल्या भवतालाचं .
तमाम मराठी बांधवाना
'मराठी राजभाषा दिना'च्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!!!

मराठी

माजोर शायिस्त्याची बोटे तोडतो मराठी

धर्मवेड्या अवरंगास येथेच गाडतो मराठी

अफ्जुल्ल्याची कोथळी काढतो मराठी

अखेर मदांत तख्त फोडतो मराठी ...

जय शिवराय

|| माझ्या मराठी मातीचालावा ललाटास टिळा ||

!|| माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा ||!
|| माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्‍या खोऱ्‍यातील शिळा ||
|| माझ्या मराठी मातीला
नका म्हणू हीन दीन
मला हीचे महिमान ||
|| रत्नजडित अभंग
ओवी अमृताची सखी
चारी वर्णाँतुनी फिरे
सरस्वतीची पालखी ||
|| रसरंगात भिजला
येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंत द्रवली
झाले वसुधेचे घर ||
|| माझ्या मराठी मातीचा
नका करु अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे
भविष्याचे वरदान ||
|| नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्ण सिँहासनापु­ढे
कधी लवली ना मान ||

अशी एक पहाट असावी जी भगव्या रंगाने भरलेली असावी ..

अशी एक पहाट
असावी जी भगव्या रंगाने
भरलेली असावी ..
तिचा तो प्रकाश पाहुन
प्रत्येकाला
स्वातंञ्य मिळल्याची जाणीव
असावी ..
अशी एक राञ असावी जिणे
भरकटलेल्या पाखरांना घरची
वाट दाखवावी ..
त्या वाटेवरुन
जातांना नव्या स्वप्नांची आस
धरावी ..
पुन्हा ती शक्ती प्रकट व्हावी
ज्यातुन प्रत्येक मराठ्यांनी
गुलामीची बेडी तोडावावी ..
मराठ्यांच्या त्या हुंकाराने
पुन्हा ती भगवी क्रांती
जन्मास यावी ..
.
.
जय जिजाऊ ..
जय शिवराय..
जय शंभुराजे

समाजकारणात आणि राजकारणात आमुलाग्र बदल घडवुन आणण्याची टाप आहे ती फक्त मराठ्यातच

समाजकारणात आणि राजकारणात आमुलाग्र बदल
आणण्याची टाप आहे ती फक्त मराठ्यातच,
मराठा एकी नाही, एकी नाही म्हणून उगाच बोंब ठोकनाऱ्यांनो,
निस्वार्थी भावनेची एकी आहे ती फक्त मराठ्यातच..
आम्हाला बाळकडू पाजलेले आहे ते ताठ मानेने जगायचे,
अरे रक्तातच ज्यांच्या सळसळती भावना कायम जागृत असते
अशा आम्हा मराठ्यांना आवाज नका देऊ,
मराठा शांत आहे म्हणूनच आज
कित्येकांना पोळी भाजायला मिळत आहे,
"मराठा" नावावर राजकारण करणे सोडून द्या,
आमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न
करा, शेवटी आम्ही शिवरायांचे छावे आहोत,
कधीच वेगळे होऊ शकणार नाहीत असे आम्ही "मराठे" आहोत..
कर्म मराठा,
धर्म मराठा,
जात मराठा,
बात मराठा..
जय मराठा,
जयोस्तु मराठा..

Tuesday 26 February 2013

महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा


महाराष्ट्राच्या ­ मातीमधुनी
आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य
उगवतो मराठीचा कीतीही
डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या
पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार
तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी
घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा
ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी
ठेवतो तेवत, बाणा
मराठीचा
.
.
.
.
.
.
झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा..
गर्जा महाराष्ट्र माझा
जय शिवराय !!!!!
.

राजेचं राजपण कालपण, आजपण आणि उद्यापन.


''भलेभले होऊन गेले
पण
शिवराय दुसरे झालेच नाहीत
मराठ्यांचे ते छत्रपती
दिवस उजाडला
आणि
त्यांची आठवण नाहि झाली...
असे कधी झालेच नाही
'' राजेचं राजपण
कालपण,
आजपण
आणि
उद्यापन.
जय शिवराय
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
छञपती शिवरायांना मानाचा मुजरा

सह्याद्री


सिंव्ह मी,
मी सह्याद्री.
मी अनादी अती प्राचीन.
जन्म घेतला मी ज्वालान्तुन.
सळसळणाऱ्या तेजाशिखांच्या सोनेरी धरणी गर्भातून
श्रेष्ट पंचा त्या महाभूतांच्या आवेगातून, अन मिलनातून.
जन्म घेतला त्या कुंडातून.
मी,
मी सह्याद्री.
कडे कपारी शिखरे माझी
जन्म आली ,
शालीनता
स्वातंत्र्य
बंधुता नीती मातीची जिवंत झाली काना कानातून मराठमोळ्याफुले बहरली,
प्रर्थानांचे नाद निनादात विश्व शांतीचे पसाय दानी
सोनियाचा दिन उजळत येई मंगल सुख ग्वाही ओसंडूनी
कालान्चीत चंद्रम्याच्या निवांत शीतल चांदण्यातुनी,
तापहीन मार्तंडाच्या दैदीप्यमन प्रकाश किराणी .
नहान घेई महाराष्ट्रहा आनंदाभूवणी .
फडकत होता अभिमानाने गरुड ध्वज या महाराष्ट्राचा.
पाहत होता ,सांगत होता इतिहास या यादवकुलीचा.
मांदियाळी ईश्वर निश्तांची महाराष्ट्रच्या आत्मा काळांची
निचीन्तीने सुखरूप होती, माखत होती भक्ती रसामध्ये.....

शिवस्पर्शाने धन्य झाल्या त्या सह्यांद्रीच्या रांगा आतुरल्या

शिवस्पर्शाने धन्य झाल्या
त्या सह्यांद्रीच्या रांगा
आतुरल्या शिव चरणस्पर्शाला
सरस्वती यमुना गंगा
गर्जे हिमालया दिशा दाही
राजेंना
आमुचा मुजरा सांगा
राजेंना
आमुचा
मुजरा सांगा
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

अंधार झाला आहे , दिवा पाहिजे महाराष्ट्र नाही तर साऱ्या विश्वाला जिजाऊचा शिवबा पाहिजे....

अंधार झाला आहे , दिवा पाहिजे
महाराष्ट्र नाही तर साऱ्या विश्वाला जिजाऊचा शिवबा पाहिजे....
राजं पुन्हा तो
बाजी पासलकर पाहिजे
पहिल्या लढाईत तुमच्यासाठी
प्राण वेचले पाहिजे...||१||
राजं पुन्हा तो
दर्या सारंग पाहिजे
समुद्रावर जरब बसवण्या
जीगरीचा जिगरबाज पाहिजे ...||२||
राजं पुन्हा तो
नूरखान बेग पाहिजे
कर्म हाच माझा धर्म
मानणारा जिगरबाज मावळा पाहिजे...||३||
राजं पुन्हा तो
जीवा महाल पाहिजे
तुमच्यासाठी जीवाची पर्वा न करता
गनिमाला ठार केले पाहिजे...||४||
राजं पुन्हा तो
बाजी प्रभू पाहिजे
लाख वार झाले असले तरी
तोफांचा आवाज ऐकून देह सोडणारा पाहिजे...||५||
राजं पुन्हा तो
मुरारबाजी पाहिजे
शत्रूवर मृत्यू म्हणून
गरजणारा पाहिजे...||६||
राजं पुन्हा तो
तान्हाजी पाहिजे
मुलाच लग्न सोडून कोंढाण्याच लग्न
करायला निघाला पाहिजे...||७ ||
राजं पुन्हा तो
हिरोजी इंदलकर पाहिजे
स्वतःची जमीन विकून
स्वराज्याची राजधानी बांधणारा पाहिजे...||८||
राजं पुन्हा तो
शिवा काशीद पाहिजे
जन्मला जरी शिवा काशीद असला
तरी शिवराय म्हणवून गेला पाहिजे...||९||
राजं पुन्हा शिवनेरी
दिव्यांनी सजला पाहिजे
साऱ्या विश्वावर भगव्याच
अधीराज्य गाजल पाहिजे...||१०||
अंधार झाला आहे , दिवा पाहिजे
महाराष्ट्र नाही तर साऱ्या विश्वाला जिजाऊचा शिवबा पाहिजे....
जय जिजाऊ
जय शिवराय.

विसरलो नाहीत त्या लाखो मावळ्यांचे बलीदान मराठ्याला आजही वाटतो त्यांचा अभिमान

विसरलो नाहीत त्या लाखो मावळ्यांचे बलीदान
मराठ्याला आजही वाटतो त्यांचा अभिमान
जिथे पडती पाऊले आमचे त्याच इतीहासाचा वाटा
वाकत तर नाहीच पण मोडणार हि नाहि आता हा मराठा
चमकता तेल तलवारीच्या धारा दिशा बदलतो
पाहून आम्हाला वादळिवारा
मराठे आम्ही जगने आमचे ताठ आहे
आडवे जाण्याआधी विचार करा या
मर्द मराठ्यांशी गाठ आहे
जय शिवाजी
जय जिजाऊ

"सर्वोत्तम अभियंता राजा"..

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुमारे
पस्तीस वर्षाच्या साधरणपणे 360 किल्ले
जलदुर्गासह नवे बांधले अथवा जुनेदुरुस्त
केले.सिँधुदुर्ग -,विजयदुर्ग सारखे भरसमुद्रातील
जलदुर्ग आजही 350 वर्षे समुद्राच्या भीषण
लाटा अंगावर न खचता उभे आहेत. शिवरायांचे
स्थापत्य अभियांत्रिकीमधी -ल ज्ञान व
कौशल्य पाहुन अनेक पोर्तुगीज, फ्रेँच, इंग्रज
व्यापारी राज्यकर्ते आश्चर्यचकीत झाले होते.
सतराव्या शतकातील बांधकाम क्षेत्रातील
मर्यादा पाहता शिवरायांनी केलेले अजस्त्र
बांधकाम ही एक जागतिक आश्चर्याचीच बाब
आहे. जागतिक आश्चर्य म्हणुन आपण
चिनी भिँतीचा उल्लेख करतो; परंतु
चिनी भिँतीचे बांधकाम सुमारे सहाशे वर्षे चालले
होते.शिवरायांनी -अवघ्या 35 वर्षात केलेले
सर्व प्रकारचे बांधकाम भितीँत विभागल्यास
त्याची सुमारे चार हजार किमी लांबीची भिँत
होईल. यावरुन
छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापत्य
अभियांत्रिकीमधी -ल निष्णात राजाच म्हणावे
लागेल. प्रत्येक बांधकामाची आखणी,बांधकाम,
मजबुती उपयुक्तता, सौँदर्य आणि विशेष म्हणजे
आयुष्यमान पाहता शिवरायाएवढा तज्ज्ञ
स्थापत्य अभियंता दुसरा इतिहासात सापडत
नाही..
एकच अवाज एकच पर्याय जय जिजाऊ जय
शिवराय.

साथ आहे वाघालावाघाची आता भिती नाही कोण्या कुत्र्याची

साथ आहे वाघाला
वाघाची...
आता भिती नाही कोण्या
कुत्र्याची..... ."दिल्ली चे तख्त राखतो महाराष्ट्र माझा"
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते.......
मराठी अस्मीतेवर हल्ला होण्यापूर्वीच
गडगडतो तो राज गड ,
हल्ल्यासाठी तयार होतो तोप्रतापगड,
आणि, ढाल घेऊन उभा राहतो तोतोरणा........
...
अरे मी, मी मराठी माणूस
जागा झालोय,
आठवूनी बाजीची पावनखिडं,
हातात तलवार घेऊन, दुश्मनांची वाट पाहतोय.......
अरे मी, मी मराठी माणूस
भुकेला झालोय,
आता परप्रातीयांची काही खैर नाही,
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
अरे मी, मी मराठी माणूस
अंगात माझ्या मराठयाचं रक्तं,
शपथ शिवरायांची घेऊन,
उभा करतो आज महाराष्ट्राचा तक्तं......
अरे मी, मी मराठी माणूस
आवाज उठवतोय, अत्याचारावरच नाही तर,
रक्त भ्रष्टाचारी मानसाचं साडूंन
भविष्य मराठय़ाचं जपतोय........
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
!!! जय महाराष्ट्र !!...आम्ही तलवारीसोडल्या पण,
हात तलवारी चालवायला विसरले नाहीत,
आम्ही नांगर सोडले पण,
जमीन फाडायला विसरलो नाहीत..
तोच रक्तातला लाव्हा आजहीउफाळत आहे,
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे,
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे,
मनातले छत्रपति आजही जिवंत आह..
||जय भवानी||....||जय शिवराय||.....