मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Tuesday 16 July 2013

**छत्रपती शिवराय आणि stress management skill(मानसिक दबाव नियंत्रण प्रणाली)***


आज जगभरातील आधुनिक सैन्यशास्त्र ज्या stress release management skill साठी अब्जावधी रुपय खर्च करते तीच stress release management skill वापर ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी अत्यंत प्रभावीदृष्ट्या केला होता..
संघटन कौशल्य,वकृत्व,पराक्रम ,धैर्य संयम,मातृभक्ती,देशप ्रेम,रयतेविषयी आत्मीयता असे व ह्या सारखे अनेक सदगुण शिवरायांच्या अंगी ठायी ठायी भरले होते..परंतु ह्या सर्व गुणात शिवरायांचा एक गुण कायम दुर्लक्षिला जातो आणि तो म्हणजे stress release management...
जगातील सर्वाधिक पराक्रमी व सर्वात शक्तिशाली व्यक्ती सुद्धा मानसिक व शाररीक दबावाच्या आहारी जाऊन नमोहरम होतात जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली साम्राज्य हि ह्याच दबावाखाली उन्मळून पडलेली आपण पाहेलेली आहेत ...
परंतु शिवराय कधीच अशा शाररीक मानसिक,कौटुंबिक अथवा राजकीय दबावाच्या भाराखाली दडपले गेले नाहीत.उलट पक्षी प्रत्येक दबावाच्या क्षणी शिवरायांनी अत्यंत संयमानेव धैर्याने सामना केला व त्यातून तावून-सुखावून बाहेर पडत आपल्या व्यक्तिमत्वाला अभूतपूर्व अशी झळाळी दिले ...
१६४८ साली शहाजीराजे महाराज आदिशाहाच्या कैदेत असताना स्वराज्य प्रेम,मातृप्रेम व पितृप्रेम यांना योग्य न्याय देत शिवरायांनी कुठल्याही दबावाला न जुमानता पुरंदरवर झालेले आदिलशाही आक्रमण परतवून लावत आपल्या कणखर मानसिकतेचे दर्शन घडवले होते...
१६५९ साली आपल्या प्राणप्रिय पत्नी महाराणीसाहेब यांच्या निधानंतर डोक्यावर दुखांचाडोंगर असतानाही आपल्या वैयक्तिक दुखाचा व वियोगाचा आपल्या कार्यशैलीवर यत्किंचित हि प्रभाव न पाडू देता अफलातून नियोगन आणि प्रखर बुद्धीमतेचे प्रदर्शन करत अफजल खानाचा फडशा पडला होता...
आग्र्यात औरंघ्याच्या कैदेत असताना एकीकडे स्वराज्य धोक्यात होते दुसरीकडे स्वताचे तसेच युवराज शंभूराजे यांचे प्राण टांगणीला लागले असताना एक कणभर चूक हि दोघांच्या प्राण घेऊ शकत होती..
अशा बिकट समयी औरंघ्याचा प्रचंड दबाव सहन करत शिवरायांनी आपल्या प्रघ्ल्भ मनोवृत्ती आणि सय्यम यांचा योग्य समन्वय साधत आपली तसेच युवराज शंभूराजे यांची सहीसलामत सुटका करून घेतली होती...
अशा प्रकारच्या शेकडो घटनांना शिवराय आपल्या ५० वर्षाच्या तुफानी कारकिर्दीत सामोरे गेले होते..परंतु कधीही आणि कोणत्याही राजनैय्तिक,लष्क री,सामाजिक अथवा कौटुंबिक दबावाला शिवराय बळी पडले नाहीत...
किंवा दबावाखाली स्वराज्यासाठी घातक ठरणाराएक हि निर्णय घेतला नाही...
कधी अनेक प्रसंगी आपली वैयक्तिक दुखांचा भांडवल न मांडता येणाऱ्या प्रत्येक संकटावर अचूक निर्णय घेत त्यावर मात करून आपल्या सारासार बुद्धीचा वापर करत त्यांनी स्वराज्याचा मेरुमांदार उभा केला.
म्हणूनच ज्या काळात जगातील कोणत्याही राजाला stress release management system ह्या प्रणालीचा वापर करता आला नाही त्याच काळात शिवरायांनी ह्या प्रणालीचायोग्य वापर करत पडणार्या सर्व दबावाला झुगारून आपण एक युगपुरुष राजे आहोत ह्यावर शिक्का मोर्तब केले.

महाराष्ट्रावर सत्ता शेवटी मराठ्यांची.


कपाळी शिवगंध,

धारदार नासिका,
भरदार कल्ले,
ओठांवरच्या भारदस्त मिशा,
उंच शरीरयष्टीचा,

चेहरयावर तेजस्वीपणा
हाच मराठ्यांचा साज
आणि मराठ्यांची मिजास..


टकमकावर उभे राहता होऊन जातो वार्याचे झोत

श्रीसांबाचा अंश बाळगतो अंतरी
माथा झुकतो रायगडीच्या जगदीश्वरी
जन्मसोहळा उभा ठाकतो डोळ्यासमोर
फत्ते बुरूजावरुन पाहता पूरंधरी
ढाळत राहतो आसू आम्ही
शक्तिपीठ तुळापूरी

टकमकावर उभे राहता
होऊन जातो वार्याचे झोत
होळीच्या चौकात होतो
भवानीचा धगधगता पोत

रक्ताचा थेंबन् थेंब करतो मुजरा
राजसदरेवर गारद देता
झुंजारासम फुलते छाती
तोरण्याच्या झुंजारमाचीवर येता

सळसळतय आमचं
मर्दमराठी रक्त
होय आम्हीच
शिवशंभूंचे भक्त

आम्हास तुळापूर ही आळंदी देहू
अन् रायगड हीच आमची पंढरी
"जय शिवराय"ची गर्जना ऐकता
ओळखून जा...


आम्हीच ते गडवाटकरी

- उनाड...

जिथे तुझ चरण शिवराय सिर माझं झुकत

जिथे तुझ चरण शिवराय
सिर माझं झुकत

चित्त माझं तुझिया ठायी
मी तुझाच भक्त

कुपा आई भवानीची
स्वराज्यात जन्मलो

चरणधुळ कपाळी तुमची
सह्याद्रित वावरलो

जय भवानी । जय जिजाऊ
जय शिवराय । जय शंभुराजा

कवी - गणेश पावले

शिवबा आयुष्याचा भाग आविभाज्य.

शिवबा म्हणजे पवित्रता,
शिवबा म्हणजे सुन्दरता
शिवबा म्हणजे संपन्नता,
शिवबा म्हणजे साहस
शिवबा म्हणजे स्वातंत्र,
शिवबा म्हणजे खास
शिवबा म्हणजे एकी ,
शिवबा म्हणजे नेकी
शिवबा म्हणजे श्वास,
शिवबा म्हणजे ध्यास
शिवबा म्हणजे विश्वास,
शिवबा म्हणजे पापाचा नाश
शिवबा म्हणजे स्वराज्य,
शिवबा आयुष्याचा भाग आविभाज्य.
!!जय भवानी जय शिवाजी !!

-अनामिक 

गर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी

देवल गिराविते फिराविते निसान अली, ऐसे डूबे रावराने सबी गए लबकी,
गौर गणपती आप औरनको देत ताप, आपनी ही बार सब मारी गये दबकी ,
पीरा पैगंबर दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की,
कासी की कला गई मथुरा मस्जिद भई, गर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी

अर्थ – यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी त्यांचा ध्वज फडकविला तेव्हा राव – राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते, इतके ते निर्बल व निस्तेज झाले, थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणा-या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून ‘रबची’ चर्चा सुरू झाली, काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.

शिवनामाचा गजर मुखी अन रौद्रशम्भूंचा अभिमान…

शिवनामाचा गजर मुखी 
अन रौद्रशम्भूंचा अभिमान… 

शिवभक्त आम्ही शिववेडे आम्ही...
 तय समोर न कसले भान…

अर्ध्य तया रक्ताने जरी केले 
न चुके त्यांचे उपकार…
"गडवाटकरी" हे नाम अमुचे…. 
हाच अमुचा सत्कार…

जय जिजाऊ…!!!
जय शिवराय…!!!
जय रौद्र शंभू राजे…!!!

Sunday 14 July 2013

कसा सांगू लेका उर माझा फुटत आहे, रायगड आणि प्रतापगडी मी तिळ तिळ तुटत आहे,

कैलासाच्या माथी जरी शिवशंकर
विराजला,
बघ माज्या कुशीत माझा शिवबा गर्जला,
टाप मारताच येथे
उधलली तलवारीची पति,
येथेच
जुलली माज्या मराठी मनाची नाती,
स्वराज्याचा पुरावा देत आहे
माजा एक एक कडा,
येथेच
सांडला गड्या शत्रुच्या रक्ताचा सडा,
यवनाच्या आक्रमनाची याद आहे अजून
ताजी,
गनिमाच्या उरावर नाचेल
माझा तानाजी आन बाजी,
ह्रदयात माझ्या खळखळतात
कोयना आणि कृष्णा,
मराठी मनाची आणि मातीची भागवली
त्यानी तृष्णा
जवा बापुच्या शब्दाला येत होती धार,
तवा माझ्या नानान या मातीत बाधल
पत्री सरकार,
कसा सांगू लेका उर माझा फुटत आहे,
रायगड
आणि प्रतापगडी मी तिळ तिळ तुटत आहे,
आफजल्याचा वाढता बुरुंज
काळीज माझं तोडू पाहे,
सांगा ओरडून त्याला हे राज्य शिवबाचे
आहे….!

"मला शिवराय व्हायचंय"

तुला काय व्हायचंय आहे?
या प्रश्ना वर एका लहान मुलाने दिलेले
उत्तर.
"मला शिवराय व्हायचंय"
मी जे क्षेत्र निवडेल, ज्या क्षेत्रात
जाईन,
त्या क्षेत्रात मला सर्वोच्च
स्थानी पोहचायच आहे.
म्हणजेच मला त्या क्षेत्रा मधील शिवराय
व्हायचंय.


कारण शिवराय म्हणजे विजयाचे सर्वोच्च
स्थान आहे.

जय शिवराय.

माता असावी तर अशी

माता असावी तर अशी
"शिवबा रयत बळीराजाची वाट पाहत
आहे
तो तुम्ही घडावा.तलवारीला माणसां
लावू देवू नका तर
ती स्वराज्यातील
नागरिकांना त्रास
देणाऱ्या गनिमांना कापून काढून
स्वराज्यातील
नागरिकांच्या रक्षणासाठी रयतेच

- राजमाता जिजाऊ

भडकती दाही दिशा ।। चढली पराक्रमाची नशा ।।

भगव्यात मिसळु दे रक्त ।।
झुकवु दे तख्त ।।
रक्तात भरे अंगार ।।
करुनी श्रृंगार ।।
तळपवु दे अशी तलवार ।।

होऊनी बेभानं ।।
गर्जती रणांगन ।।
छातीवर झेलीतो वार ।।
पेलुनी स्वराज्याचा भार ।।
तळपवु दे अशी तलवार ।।

भडकती दाही दिशा ।।
चढली पराक्रमाची नशा ।।
तिक्ष्ण नजरेची या धार ।।
वार होऊ दे आरपार ।।
तळपवु दे अशी तलवार ।।

उध्दारली कोटि कुळे.... शिवराया तुझ्या जन्मामुळे...

उध्दारली कोटि कुळे....
शिवराया तुझ्या जन्मामुळे...
ठरला शिवराया खरा रयतेचा आधार तो....
शिवशाहीने महाराष्ट्राचा केला खरा उद्धार तो....
त्या दरबारी शोभुनी दिसतो"शिवराय" राजा तो....!!!!
तोडल्या गुलामगीरीच्या श्रुंखलाज्याने सफल झाले प्रयत्न,
शिवराय तुम्हीच खरे स्वराज्याचे रत्न .
दारीद्र्याच्या भिंतीकोसळल्या ज्यांच्या पराक्रमाने,
नतमस्तक केल्या दाही दिशा याच शिवबाने.
संहारीले तुच लेखनीने दृष्ट दुर्जना,
दुमदुमते आजही तुझीच शिवगर्जना.
जय जिजाऊ
जय शिवराय

- अनामिक 

जगात शिवरायांना "महान राजा" का म्हणतात याचे जिवंत व ज्वलंत उदाहरण़

***शिवरायांची युदधनिती***

जगात शिवरायांना "महान राजा" का म्हणतात याचे जिवंत व ज्वलंत उदाहरण़

आम्ही एकदाच बोलतो, नाही ऐकल तर जित्तच फाडतो.

आम्ही एकदाच बोलतो,
नाही ऐकल तर जित्तच फाडतो.
आम्ही कधी घाबरतनाही.
पाच पाऊल मागे सरकुन
कापल्याशिवाय राहत नाही..

जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय रौद्रशंभो...

आम्ही काय दशा करतो याचा पण एक ईतिहास आहे .

काही जण म्हणता
मराठे नशेत असता यांची नशा उतरावी लागते
आ रे हो नशेत असतो आम्ही
अन गेल्या ३५० वर्षा पासुन नशेतच आहोत
पण आमची नशा उतरविणाऱ्‍यांची
आम्ही काय दशा करतो
याचा पण एक ईतिहास आहे .

..ණ गजानन बोरकर

मला लोकं विचारतात.., "काय तुला एवढे कसले वेड आहे शिवाजी महाराजांचं..???

मला लोकं विचारतात..,
"काय तुला एवढे
कसले वेड आहे
शिवाजी महाराजांचं..???
आणि

कशासाठी..???"
मी आज त्यांना फ़क़्त एवढेच सांगतो,
हो, आहेच वेड
आम्हाला शिवरायांचे..
कारण,
त्यांचा इतिहास आम्ही वाचलाय....
त्यांचे कर्तृत्व
आम्हाला माहिती आहे...
राज्य कसे घडवावे हे
आजच्या नाकर्त्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून शिकावं...
शिवराय फक्त आणि फक्त
रयतेसाठीच जगले..
त्यांचा इतिहास
आम्ही विसरूच कसा
शकतो...???
ज्या राजांनी उभे आयुष्य सोनेरी महाराष्ट्र घडवण्यासाठी घालवले, 
पण आजही तो राजा सोनेरी सिंहासनावर
नाही तर
मातीच्या सिँहासनावर वाघ दिसतो..
कारण, शिवरायांनी आपलं संपुर्ण आयुष्य
या मातीसाठी खर्ची घातलयं याच
रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट
घेतले...
हाच राजा सह्याद्रीसाठीजग ­ला...
त्याच राजाला कसं काय विसरू शकतो आम्ही....???
कधीतरी माझ्या राजाला समजून घ्या...
एकादी लव स्टोरी ,
वाचण्यापेक्षा कधीतरी महाराजांचा इतिहास वाचून
बघा..
मग तुम्हाला समजेन ..,
का वेड आहे
आम्हाला
शिवरायांचे.....
जय जिजाऊ..!!
जय शिवराय..!!

सांर विश्व करी नमन ज्यांना असे युगपुरुष तुम्ही.

शहाजी राजेँचे स्वप्न तुम्ही..
जिजाऊंच्या काळजाचा
तुकडा तुम्ही.. 
महाराष्ट्राला लाभलेलेछत्र तुम्ही..
लोक कल्याणकारी
स्वराज्य निर्माता तुम्ही.. 
सईबाईँना मिळालेलं सौभाग्याचं देणं तुम्ही.. 
शंभु राजांचे एक आदर्श

पिता तुम्ही..
मराठ्यांचे लाडके
धनी तुम्ही..
स्त्री जातीचा मान राखने शिकविले तुम्ही..
जो नडला त्याला उभाच
फडला तुम्ही..
गनिम काव्यांने जिँकले दिल्लीचे तख्त तुम्ही.. 
मना-मनात धगधगनारी
आग तुम्ही..
ज्वलंत इतिहासाच्या पाऊलखुणा तुम्ही..
सांर विश्व करी नमन ज्यांना असे युगपुरुष तुम्ही.

.छञपती शिवाजी महाराज की जय

- अनामिक 

'बहुत जणासी आधारू' म्हणुन म्हणतात शिवाजी महाराजांना...



अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्या नंतर महाराजांची योजना होती की लगेच गडाच्या दरवाज्या कडे धाव घ्यायची.

महाराजांनी वाघनखे खुपसली, कोथला काढला. सय्यद बंडा आला, जिवा महालांनी त्याला ठार केलं. क्रुष्णाजी भास्कर आडवा आला, महाराजांनी त्याला कापला आणि प्रतापगडाच्या दरवाज्याकडे पळत सुटले.


जाता जाता सोबतचे अंगरक्षक मोजु लागले...

१,२,३,४,५,६,७,८,९

फक्त ९?

सोबत तर दहा होते...

मग कोण बाकी राहिलं राजांनी विचारलं...

कोणी तरी म्हटलं,'संभाजी कावजी नाही जी'

राजे म्हणाले,'नाही? काय झालं? मधुनच कुठे गेला?'

तेवढ्यात संभाजी कावजी धापा टाकत आला.
राजे संतापले आणि म्हणाले, 'संभाजी कुठे होतास?'
संभाजी कावजी म्हणाला,
'राजं तुम्ही वाघनख मारली खानाला पण म्हटलं मरत्यो की न्हाई म्हणुन मागे गेलो आणि त्याचं शीर कापुन आनलं'
आणि त्यानी कापुन आनलेलं खानाचं डोकं वर केलं राजांना दाखवायला...

राजे म्हणाले,'अरे गड्या त्या वाघनखांना विष लावलं होतं. खान कसाही करुन मरणारच होता मग तू हे वेडं धाडस का केलं.. यापुढे लक्षात ठेव जे आपल्या योजनेत नाही ते कधीही करायचं नाही..
एक वेळेस खान मेला नसता तरी चाललं असतं पण जर तुझ्या जिवाला काही बर वाईट झालं असतं तर तुझ्या आईला काय तोंड दाखवलं असतं मी. ती तर हेच म्हटली असती ना की शिवाजी ने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीव घालवला. तुझ्या जागेवर एक वेळेस मी मेलो असतो तर चाललं असतं पण स्वराज्याचा एकही मावळा मरता कामा नये.'

जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे जो आपल्या एका साध्या अंगरक्षासाठी सुद्धा मरायला तयार आहे. आपल्या प्रजेवर लेकरांसारखं प्रेम केलं आहे ह्या राजानी...

'बहुत जणासी आधारू' म्हणुन म्हणतात शिवाजी महाराजांना...

राजा रयतेचा राजा..



राजा रयतेचा राजा..

आमच्याकडे ना श्रीमंती सोन्या चांदीची,

आमच्याकडे ना श्रीमंती प्रभावळ परगण्याची,

आमच्याकडे ना श्रीमंती सुरत, आग्र्याची,

आमच्याकडे श्रीमंती ती मनामनाची अन् जनाजनाची..

शिवराय एक असा राजा ज्यांनी देशावर नाही तर,

तर राज्य केले ते माणसांच्या मनामनावर...

म्हणूनच शब्दांविना गर्जे त्यांचा दरारा...

कर्तव्याच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा !!


- अनामिक

वाघासारखे जगायचे शिकविले आम्हा राजा शिवछत्रपतीने..



दैवाच्या भरवशावर नव्हे तलवारीने

बदलतो आम्ही भविष्य..

ईतिहास भुगोल बदललाय याच

तळपत्या पातीने..

वाघासारखे जगायचे शिकविले आम्हा

राजा शिवछत्रपतीने..


- अनामिक

"हमे किसीका डर नही लगता लेकीन हमारे वजेसे सबको डर लगता है"



महापराक्रमी शाक्तवीर,स्वातंत्रवीर , ज्ञानवीर,
रणवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो...!!

औरंगजेब संभाजी राजेंना बघुन म्हणतो.
नौ बरसका था संभा तब ये मिलाता आग्रा मे

तो पुछा था हम ने इसे.
'क्युं रे संभा तुमे हमारा डर नही लगता',
तब इसने जवाब दिया था,
"हमे किसीका डर नही लगता लेकीन हमारे वजेसे
सबको डर लगता है"
संभाजी महाराजांना पकडल्यावर औरंगझेबा कडे
बघनारी ती संभाजी महाराजांची नजर बघुन
तो म्हणाला,
''ये मरहट्टे क्या खिलाते है अपने बच्चो को.
क्युं पैदा नही हुआ ऐसा एकभी शक्स हमारे जनाने में''
त्यावर गरजला सर्जा संभाजीराजा
''अरे स्वताच्या बापाला विष देऊन मारणारा तू.
स्वताच्या भावांची खुले आम कत्तल करणारा तू.
तुझ्या पोटी कसा जन्माला येईल संभाजी.

संभाजी जन्माला येईल तर फक्त सह्याद्रीच्या कुशीत
आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच''
महापराक्रमी शाक्तवीर,स्वातंत्रवीर , ज्ञानवीर,

रणवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो...!!

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराज


-अनामिक

माझ्या शिवबाचही एक राज्य होत..



माझ्या शिवबाचही एक राज्य होत..
स्वर्गाहुन सुंदर ते स्वराज्य होत..
माज नव्हता जिथे कुणाला जातीचा..
आभिमान दरवळायचा चोहीकडे मातीचा..
सह्यांद्रीच्या कडेपारीतुन
सुटनाऱ्या सुगंधाचा श्वास होता..
प्रत्येकाच्या वाट्याला सुखाचघास होता..
जो जगला रयतेसाठी तो राजा काय होता..
कुतुहल कराव जगाने असा त्याचा न्याय होता..
रयतेच्या भरवशावर जगनारे बहुत होऊन गेले..
रयतेसाठी जगनारे फक्त माझे
शिवरायच झाले.


- अनामिक