मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Thursday 28 February 2013

घासल्या तलवारी आम्ही या फौलादी छातीवर..... गर्वच नाही तर माज आहे या मराठ्याच्यां जातीवर......

घासल्या तलवारी आम्ही
या फौलादी छातीवर.....
गर्वच नाही
तर माज आहे
या मराठ्याच्यां जातीवर......
गनीमाला भित नाही
विश्वास तलवारीच्या पातीवर......
फितुर जळतात पाहुन
आमच्या वाघाच्या कातीवर......
लोळवीले षडं
पाजले पाणी
याच स्वराज्याच्या मातीवर......
आमची निष्ठा`प्रतिष्ठा`
मान`मर्यादा` स्वाभिमान` अभिमान`
फक्त आणि फक्त
``श्री शिव छत्रपतीँ`` वर...
♥♥♥शिवसकाळ मावळ्यांनो♥♥♥

॥छत्रपति शिवाजी महाराज॥

छत्रपति शिवाजी महाराज !!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :-महाराष्ट्राची ­ ­­ शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
म्हणजे
"॥छत्रपति शिवाजी महाराज॥"

पुन्हा माणुसम्हणुन जन्माला आलो तर मला फक्त छत्रपतींचा मावळा म्हणुनच येऊ दे.

वार झालो तर
भवानी तलवार
होवु दे,
वाघ
नको वाघ
नखे होऊ दे,
मंदीर नको
जगदेश्वराची पायरी होवु दे,
आणि पुन्हा माणुस
म्हणुनच
जन्माला आलो तर
फक्त
आणि फक्त
छत्रपतींचा मावळा म्हणुनच येऊ दे.
राजाधिराज, कर्तव्यदक्ष
छत्रपती शिवराय दुर्गपती,
गजअश्वपती, भूपती, प्रजापती,
सुवर्णरत्नंश्रीपती, अष्टावधानजागृत,
अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडीत,
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रीयकुलावतंस, सिँहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज, श्रीमंत पुण्यश्लोकश्री
श्री छ. शिवाजी महाराज की जय||

जी माणसं, माणसं जोडतात, तीच आयुष्यात यशस्वी होतात :छत्रपति शिवाजी राजे

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो.
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो.
जो आयुष्यभराचा,
शंभर वर्षाचा विचार करतो,
तो माणुस जोडतो ,आणि जी
माणसं, माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात.
:छत्रपति शिवाजी राजे

Wednesday 27 February 2013

सूर्योदय झाला शिवनेरी वर शिव सूर्याचा जन्म झाला



सूर्योदय झाला शिवनेरी वर

शिव सूर्याचा जन्म झाला

सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात

शिव वादळाचा जन्म झाला

पारतंत्र्याचा अस्त करण्या

शिव शक्तीचा जन्म झाला

धन्य झाली आई जिजाऊ

शिव पुत्र हा जन्मास आला

धन्य धन्य झाला महाराष्ट्र

शिव राज्याचा जन्म झाला

या मायभूमीचे रक्षण करण्या

शिव मराठा जन्मास आला

जात पातीचे तोडन्या बंध

शिव धर्माचा जन्म झाला

हिंदवी स्वराज्य घडविण्या

शिव छत्रपतीचा जन्म झाला

-प्रदीप खेकारे ....

शिवकल्याण राज्यासाठी फक्त आणि फक्त शिवा पाहिजे ..

कोंढाणा सर करुन
सिंह ठरलेला " ताना " पाहिजे
रक्ताच्या अभिषेकाने खिंड
पावन करणारा " बाजी " पाहिजे
" शिवजीराजे " म्हणून हसत-हसत
मरणारा " शिवा " पाहिजे
अंधार पडत चाललाय ,
आता खरच, दिवा पाहिजे
सह्याद्रीवर घरटं करणारा अन्
वाऱ्यावर सैर करणारा
गरुडांचा थवा पाहिजे
सह्याद्रीला बाळासारखा लुसणारा
अन् मृत्युला कवटाळताना हसणारा
सिंहकलेजाचा छावा पाहिजे
मळमळीत ह्या समाजाला
जळजळीत दवा पाहिजे
अंधार पडत चाललाय
आता खरच दिवा पाहिजे
शिवकल्याण राज्यासाठी
फक्त आणि फक्त शिवा पाहिजे ..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

राजाधिराज
महाराज श्रीमंत
श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजकि जय...........
""लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
अमृताहूनही गोड जी असे
मायेची ऊब जिच्यात भासे,
गर्व जिचा या महाराष्ट्राला
भाषा असे ती आमुची मराठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...
मातीत या वाढलो आम्ही
मातीत या घडलो आम्ही,
अभिमान जिचा असे आम्हाला
नसानसातून ती वाहे मराठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...
संस्कृतीचा मान असे ही
महाराष्ट्राचीशा न असे ही,
ताकद जिची असे आम्हाला
मनामनातून ती वसे मरठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...
धर्म असू दे कुठलाही
पूत्र आम्ही या मराठीचे,
अभिमान जिचा असे आम्हाला
ह्रुदयात जपतो ती मराठी,
धन्य मानतो आम्ही स्वत:ला
आई आमुची माय मराठी...
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.."

तमाम मराठी बांधवाना 'मराठी राजभाषा दिना'च्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!!!

अमृताहूनही गोड जी असे,
मायेची ऊबजिच्यात भासे...!!!
गर्व जिचा या महाराष्ट्राला,
भाषा असे ती आमुची मराठी...!!!
मातृभाषा ... माणसाच्या
आत्मसन्मानाचा हुंकार .
त्याच्या अस्तित्वाचा एक मूलाधार .
आज मराठी दिन .
आपल्या मराठीपणाचा झेंडा दिमाखात गगनान फडकावण्याचा शुभदिन .
हा झेंडा मजबूत हातांनी फडकवताना भान हवं विस्तारत असलेल्या गगनाचं
आणि बदलत असलेल्या भवतालाचं .
तमाम मराठी बांधवाना
'मराठी राजभाषा दिना'च्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!!!

मराठी

माजोर शायिस्त्याची बोटे तोडतो मराठी

धर्मवेड्या अवरंगास येथेच गाडतो मराठी

अफ्जुल्ल्याची कोथळी काढतो मराठी

अखेर मदांत तख्त फोडतो मराठी ...

जय शिवराय

|| माझ्या मराठी मातीचालावा ललाटास टिळा ||

!|| माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा ||!
|| माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्‍या खोऱ्‍यातील शिळा ||
|| माझ्या मराठी मातीला
नका म्हणू हीन दीन
मला हीचे महिमान ||
|| रत्नजडित अभंग
ओवी अमृताची सखी
चारी वर्णाँतुनी फिरे
सरस्वतीची पालखी ||
|| रसरंगात भिजला
येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंत द्रवली
झाले वसुधेचे घर ||
|| माझ्या मराठी मातीचा
नका करु अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे
भविष्याचे वरदान ||
|| नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्ण सिँहासनापु­ढे
कधी लवली ना मान ||

अशी एक पहाट असावी जी भगव्या रंगाने भरलेली असावी ..

अशी एक पहाट
असावी जी भगव्या रंगाने
भरलेली असावी ..
तिचा तो प्रकाश पाहुन
प्रत्येकाला
स्वातंञ्य मिळल्याची जाणीव
असावी ..
अशी एक राञ असावी जिणे
भरकटलेल्या पाखरांना घरची
वाट दाखवावी ..
त्या वाटेवरुन
जातांना नव्या स्वप्नांची आस
धरावी ..
पुन्हा ती शक्ती प्रकट व्हावी
ज्यातुन प्रत्येक मराठ्यांनी
गुलामीची बेडी तोडावावी ..
मराठ्यांच्या त्या हुंकाराने
पुन्हा ती भगवी क्रांती
जन्मास यावी ..
.
.
जय जिजाऊ ..
जय शिवराय..
जय शंभुराजे

समाजकारणात आणि राजकारणात आमुलाग्र बदल घडवुन आणण्याची टाप आहे ती फक्त मराठ्यातच

समाजकारणात आणि राजकारणात आमुलाग्र बदल
आणण्याची टाप आहे ती फक्त मराठ्यातच,
मराठा एकी नाही, एकी नाही म्हणून उगाच बोंब ठोकनाऱ्यांनो,
निस्वार्थी भावनेची एकी आहे ती फक्त मराठ्यातच..
आम्हाला बाळकडू पाजलेले आहे ते ताठ मानेने जगायचे,
अरे रक्तातच ज्यांच्या सळसळती भावना कायम जागृत असते
अशा आम्हा मराठ्यांना आवाज नका देऊ,
मराठा शांत आहे म्हणूनच आज
कित्येकांना पोळी भाजायला मिळत आहे,
"मराठा" नावावर राजकारण करणे सोडून द्या,
आमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न
करा, शेवटी आम्ही शिवरायांचे छावे आहोत,
कधीच वेगळे होऊ शकणार नाहीत असे आम्ही "मराठे" आहोत..
कर्म मराठा,
धर्म मराठा,
जात मराठा,
बात मराठा..
जय मराठा,
जयोस्तु मराठा..

Tuesday 26 February 2013

महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा


महाराष्ट्राच्या ­ मातीमधुनी
आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य
उगवतो मराठीचा कीतीही
डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या
पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार
तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी
घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा
ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी
ठेवतो तेवत, बाणा
मराठीचा
.
.
.
.
.
.
झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा..
गर्जा महाराष्ट्र माझा
जय शिवराय !!!!!
.

राजेचं राजपण कालपण, आजपण आणि उद्यापन.


''भलेभले होऊन गेले
पण
शिवराय दुसरे झालेच नाहीत
मराठ्यांचे ते छत्रपती
दिवस उजाडला
आणि
त्यांची आठवण नाहि झाली...
असे कधी झालेच नाही
'' राजेचं राजपण
कालपण,
आजपण
आणि
उद्यापन.
जय शिवराय
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
छञपती शिवरायांना मानाचा मुजरा

सह्याद्री


सिंव्ह मी,
मी सह्याद्री.
मी अनादी अती प्राचीन.
जन्म घेतला मी ज्वालान्तुन.
सळसळणाऱ्या तेजाशिखांच्या सोनेरी धरणी गर्भातून
श्रेष्ट पंचा त्या महाभूतांच्या आवेगातून, अन मिलनातून.
जन्म घेतला त्या कुंडातून.
मी,
मी सह्याद्री.
कडे कपारी शिखरे माझी
जन्म आली ,
शालीनता
स्वातंत्र्य
बंधुता नीती मातीची जिवंत झाली काना कानातून मराठमोळ्याफुले बहरली,
प्रर्थानांचे नाद निनादात विश्व शांतीचे पसाय दानी
सोनियाचा दिन उजळत येई मंगल सुख ग्वाही ओसंडूनी
कालान्चीत चंद्रम्याच्या निवांत शीतल चांदण्यातुनी,
तापहीन मार्तंडाच्या दैदीप्यमन प्रकाश किराणी .
नहान घेई महाराष्ट्रहा आनंदाभूवणी .
फडकत होता अभिमानाने गरुड ध्वज या महाराष्ट्राचा.
पाहत होता ,सांगत होता इतिहास या यादवकुलीचा.
मांदियाळी ईश्वर निश्तांची महाराष्ट्रच्या आत्मा काळांची
निचीन्तीने सुखरूप होती, माखत होती भक्ती रसामध्ये.....

शिवस्पर्शाने धन्य झाल्या त्या सह्यांद्रीच्या रांगा आतुरल्या

शिवस्पर्शाने धन्य झाल्या
त्या सह्यांद्रीच्या रांगा
आतुरल्या शिव चरणस्पर्शाला
सरस्वती यमुना गंगा
गर्जे हिमालया दिशा दाही
राजेंना
आमुचा मुजरा सांगा
राजेंना
आमुचा
मुजरा सांगा
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

अंधार झाला आहे , दिवा पाहिजे महाराष्ट्र नाही तर साऱ्या विश्वाला जिजाऊचा शिवबा पाहिजे....

अंधार झाला आहे , दिवा पाहिजे
महाराष्ट्र नाही तर साऱ्या विश्वाला जिजाऊचा शिवबा पाहिजे....
राजं पुन्हा तो
बाजी पासलकर पाहिजे
पहिल्या लढाईत तुमच्यासाठी
प्राण वेचले पाहिजे...||१||
राजं पुन्हा तो
दर्या सारंग पाहिजे
समुद्रावर जरब बसवण्या
जीगरीचा जिगरबाज पाहिजे ...||२||
राजं पुन्हा तो
नूरखान बेग पाहिजे
कर्म हाच माझा धर्म
मानणारा जिगरबाज मावळा पाहिजे...||३||
राजं पुन्हा तो
जीवा महाल पाहिजे
तुमच्यासाठी जीवाची पर्वा न करता
गनिमाला ठार केले पाहिजे...||४||
राजं पुन्हा तो
बाजी प्रभू पाहिजे
लाख वार झाले असले तरी
तोफांचा आवाज ऐकून देह सोडणारा पाहिजे...||५||
राजं पुन्हा तो
मुरारबाजी पाहिजे
शत्रूवर मृत्यू म्हणून
गरजणारा पाहिजे...||६||
राजं पुन्हा तो
तान्हाजी पाहिजे
मुलाच लग्न सोडून कोंढाण्याच लग्न
करायला निघाला पाहिजे...||७ ||
राजं पुन्हा तो
हिरोजी इंदलकर पाहिजे
स्वतःची जमीन विकून
स्वराज्याची राजधानी बांधणारा पाहिजे...||८||
राजं पुन्हा तो
शिवा काशीद पाहिजे
जन्मला जरी शिवा काशीद असला
तरी शिवराय म्हणवून गेला पाहिजे...||९||
राजं पुन्हा शिवनेरी
दिव्यांनी सजला पाहिजे
साऱ्या विश्वावर भगव्याच
अधीराज्य गाजल पाहिजे...||१०||
अंधार झाला आहे , दिवा पाहिजे
महाराष्ट्र नाही तर साऱ्या विश्वाला जिजाऊचा शिवबा पाहिजे....
जय जिजाऊ
जय शिवराय.

विसरलो नाहीत त्या लाखो मावळ्यांचे बलीदान मराठ्याला आजही वाटतो त्यांचा अभिमान

विसरलो नाहीत त्या लाखो मावळ्यांचे बलीदान
मराठ्याला आजही वाटतो त्यांचा अभिमान
जिथे पडती पाऊले आमचे त्याच इतीहासाचा वाटा
वाकत तर नाहीच पण मोडणार हि नाहि आता हा मराठा
चमकता तेल तलवारीच्या धारा दिशा बदलतो
पाहून आम्हाला वादळिवारा
मराठे आम्ही जगने आमचे ताठ आहे
आडवे जाण्याआधी विचार करा या
मर्द मराठ्यांशी गाठ आहे
जय शिवाजी
जय जिजाऊ

"सर्वोत्तम अभियंता राजा"..

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुमारे
पस्तीस वर्षाच्या साधरणपणे 360 किल्ले
जलदुर्गासह नवे बांधले अथवा जुनेदुरुस्त
केले.सिँधुदुर्ग -,विजयदुर्ग सारखे भरसमुद्रातील
जलदुर्ग आजही 350 वर्षे समुद्राच्या भीषण
लाटा अंगावर न खचता उभे आहेत. शिवरायांचे
स्थापत्य अभियांत्रिकीमधी -ल ज्ञान व
कौशल्य पाहुन अनेक पोर्तुगीज, फ्रेँच, इंग्रज
व्यापारी राज्यकर्ते आश्चर्यचकीत झाले होते.
सतराव्या शतकातील बांधकाम क्षेत्रातील
मर्यादा पाहता शिवरायांनी केलेले अजस्त्र
बांधकाम ही एक जागतिक आश्चर्याचीच बाब
आहे. जागतिक आश्चर्य म्हणुन आपण
चिनी भिँतीचा उल्लेख करतो; परंतु
चिनी भिँतीचे बांधकाम सुमारे सहाशे वर्षे चालले
होते.शिवरायांनी -अवघ्या 35 वर्षात केलेले
सर्व प्रकारचे बांधकाम भितीँत विभागल्यास
त्याची सुमारे चार हजार किमी लांबीची भिँत
होईल. यावरुन
छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापत्य
अभियांत्रिकीमधी -ल निष्णात राजाच म्हणावे
लागेल. प्रत्येक बांधकामाची आखणी,बांधकाम,
मजबुती उपयुक्तता, सौँदर्य आणि विशेष म्हणजे
आयुष्यमान पाहता शिवरायाएवढा तज्ज्ञ
स्थापत्य अभियंता दुसरा इतिहासात सापडत
नाही..
एकच अवाज एकच पर्याय जय जिजाऊ जय
शिवराय.

साथ आहे वाघालावाघाची आता भिती नाही कोण्या कुत्र्याची

साथ आहे वाघाला
वाघाची...
आता भिती नाही कोण्या
कुत्र्याची..... ."दिल्ली चे तख्त राखतो महाराष्ट्र माझा"
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते.......
मराठी अस्मीतेवर हल्ला होण्यापूर्वीच
गडगडतो तो राज गड ,
हल्ल्यासाठी तयार होतो तोप्रतापगड,
आणि, ढाल घेऊन उभा राहतो तोतोरणा........
...
अरे मी, मी मराठी माणूस
जागा झालोय,
आठवूनी बाजीची पावनखिडं,
हातात तलवार घेऊन, दुश्मनांची वाट पाहतोय.......
अरे मी, मी मराठी माणूस
भुकेला झालोय,
आता परप्रातीयांची काही खैर नाही,
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
अरे मी, मी मराठी माणूस
अंगात माझ्या मराठयाचं रक्तं,
शपथ शिवरायांची घेऊन,
उभा करतो आज महाराष्ट्राचा तक्तं......
अरे मी, मी मराठी माणूस
आवाज उठवतोय, अत्याचारावरच नाही तर,
रक्त भ्रष्टाचारी मानसाचं साडूंन
भविष्य मराठय़ाचं जपतोय........
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
!!! जय महाराष्ट्र !!...आम्ही तलवारीसोडल्या पण,
हात तलवारी चालवायला विसरले नाहीत,
आम्ही नांगर सोडले पण,
जमीन फाडायला विसरलो नाहीत..
तोच रक्तातला लाव्हा आजहीउफाळत आहे,
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे,
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे,
मनातले छत्रपति आजही जिवंत आह..
||जय भवानी||....||जय शिवराय||.....

छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा

छ : छंद तुझा करी मृत्युला बेधुंद
त्र : त्रस्त झाला मृत्यु पाहुन डोळे लालबुदं
प : पचवीले विष तु धर्मासाठी
ती : तीर्थस्वरुप दैवत मराठ्याचें
रा : राखीला धर्म तु आमच्यासाठी
जे : जेव्हां कोपला सैतान तुटला स्वराज्यावर
सं : संभाळली दौलत मराठी तळहातावर
भा : भागवीली तहान शत्रुच्या रक्तावर
जी : जीवाशि खेळनाऱ्या शिवबाचा तुपुत्र
म : मशाल तुच क्रांतीची बलीदानाचेसुत्र
हा : हार न मननारा
रा : राजाच राजेपन जाणनारा
जा : जातीचा वाघ तु मर्द मराठा
ना : नाही जन्मला असा तुच एकटा
मा : माघार नाही मंजुर तुला
ना : नाही सैतानापुढे तु झुकला
चा : चारही दिशा तुझाच धाक
मु : मुगलाचां तु एकमेव बाप
ज :जय जय जयकार तुझा
रा : राजा एकटा शंभु माझा

स्वराज्याचा शिरताज

शिरभूषण आगळे शिवबाचे, तो जिरेटोप शुभ रंगाचा
देखणी शिवण शिवमुकुटाची, शिरपेच रुपेरी चांदीचा
मोत्यांच्या माळा रुळताना, वाटे आदर, वाटे माया
शिरभुषण ऐसे शिवबाचे, शिव भासेराजा पृथ्वीचा
छत्रपती शिवाजीराजे, राजे म्हणून किंवा छत्रपती म्हणून जे शिरभूषण वापरीत होते.
त्या राजेशाही पगडीला, त्या शिरताजाला त्या मुकुटाला शिवरायांनी जिरेटोप
हे वैशिष्टपूर्ण नाव ठेवले होते. त्याची घडण सुदधा वैशिष्टपूर्ण केलेली होती.
छत्रपती शिवाजीराज्यांच् या पूर्वीचे राजे जी शाही पगडी वापरीत असत
त्या शाही पगडीचा विकास करून, पगडीची शिखा उंच करून (वासुदेवाच्या टोपीसारखी)
 त्याच्यात मोराच्या तुऱ्यासारखा उच्चतम्म पेच खोवलेला असे.
स्वराज्याचे वैभव म्हणून पगडीच्या टोकातून रुळणाऱ्या मोत्यांच्या माळा असत
 व भालावर शिरपेच विलसत असे. असे ते स्वराज्याचे एकमेव भूषण होते.
छत्रपती शिवाजीराज्यांच् या पश्चात राजे म्हणून फक्त
छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती राजारामराजे हेच तसा जिरेटोप वापरू शकत होते.
त्या जीरेटोपाचे अनुकरण जगातील इतरकोणत्याही राजाला करता आलेले नाही.
जिरेटोप व त्यावर बसविलेल्या मोत्याच्या रुळत्या माळा किंचितश्या हलण्याने आंदोलित होत असत.
तसेच सोबतीला रुळणारेमोत्यांचे कर्णभूषण, यांनी शिवरायांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाची समोरच्या व्यक्तीवर विशेष छाप पडत असे.
छत्रपती शिवरायांचा हा जिरेटोप म्हणजे स्वराज्याचे वैभव, स्वराज्याचा उच्चतमपणा,
स्वराज्याचा स्वाभिमान यांची साक्ष देणारा, निदर्शक असा शिरताज होता.
जगातील लहानशा बालकाने हि छत्रपतींच्या चित्रातील, प्रतिमेतील हा शिरताज
पाहून ठामपणे सांगावे कि हे छत्रपती शिवाजीराजेच आहेत. असा तो वैशिष्ट्यपूर्ण शिरताज होता.
।। एकच आवाज एकच पर्याय ।।
।। जय जिजाऊ ।। जय शिवराय ।।

मागुन वार करशील तर समोरुन उभा फाडीन,

मागुन वार करशील

 तर समोरुन उभा फाडीन,
वाकड्यात शिरलास
तर जमिनीत गाडीन ....
महाराष्ट्रात नाव असे शिवरायांचे ....
म्हणुन .....
वाघासारखे जीवन बनले
आम्हां मराठ्यांचे..... ­
☀जय भवानी जय शिवराय☀

Sunday 24 February 2013

आमचं वैर माणसाच्या कर्माशी असतेमाणसाशी नसते. शञू संपला म्हणजे वैर संपलेअसे आम्ही मानतो

संभाजी राजेंनी एकदा खानाच्या कबरीकङे बोट
दाखवित शिवरायांना प्रश्न विचारला की आपण
खानाची कबर का बांधलित..?
मोघल आपल्या मावळ्याचीकामी आलेली शरीर
सुद्धा परत करत नाही मग खानासारख्या शञुवर
दया का..?
यावर शिवरायांनी उत्तरदेतांना म्हणाले होते,
आमचं वैर माणसाच्या कर्माशी असते
माणसाशी नसते. शञू संपला म्हणजे वैर संपले
असे आम्ही मानतो आम्ही जरतसेच वागलो तर
आपल्या आणि त्यांच्या राज्यात फरक काय..?

एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय.

---|| राजे शिवराय ||---

नगार्‍यांच्या नादात शिवनेरी आनंदला
आई जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास आला
पराक्रमाचा बादशाह महाराष्ट्री अवतरला
एकची तो राजा शिवाजी जाहला
हजारो मावळे उभे ठाकले,दिसली नवीआशा
मर्दमराठी पराक्रमाने दुमदुमल्या दाही दिशा
तोफांसमोरी तलवार घेऊनी उभा ठाकला
एकची तो राजा शिवाजी जाहला
उरी बाळगूनी स्वप्न हिंदवी स्वराज्याचे
बांधूनी तोरण हजारो गड-किल्ल्यांचे
घडविले ज्याने नव्या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला
राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला
--- श्वेता देव ---

Saturday 23 February 2013

बेहेलोल....आता या स्वराज्याच्या भूमीवर तुझ्या रक्ताचापाट वाहणार आहे

"एक जबर्दश्त दुश्मन माझ्या तलवारीच्या धारेखाली आला होता;
परंतु आम्हाला त्याची दया आली, कीव वाटली .

आम्ही त्याला सलामत सोडून दिला. जो बेहेलोल दाती तृण धरून शरण आला होता
तोच बेहेलोल उपकार विसरला,
बेईमान झाला. त्याने पून्हा स्वराज्यावर तलवार उचलली आहे.
कारण मी त्याचवेळी त्याची गर्दन मारली नाही.

आता खानाला त्याच्या दगाबाजीचे प्रायश्चित हे मिळायलाच पाहिजे.
हा प्रताप राव गुजर स्वराज्याचा सरसेनापती
आहे.
बेहेलोल खानाचे पारिपत्य करून त्याला गर्दीस मिळवला नाही,
तर हे काळे तोंड महाराजांना दाखवणार नाही.

महाराजांनी आजवर आम्चावर जीवापाड प्रेम केले आहे
आणि आताच का म्हणून रागावले आहेत? कारण हि ठाऊक आहे
आणि म्हणूनच आता एकच लक्श! ते म्हणजे बेहेलोल खान!
बेहेलोल....आता या स्वराज्याच्या भूमीवर तुझ्या रक्ताचा
पाट वाहणार आहे
गद्दार कि आवलाद! हा मराठ्याचा सेनापती तुझीच वाट पाहतो आहे ...

सांगा ओरडून हे राज्य माज्या शिवबाचेआहे..

सांगा ओरडून हे राज्य माज्या शिवबाचे
आहे..||
एकच जयघोष..,
"हर हर महादेव"
अन पाखरे सारी जमा झाली..,
राजे तुमच्या खातर..||
ती पाखरे सारी..,
गर्जता वनराज बनली ||
एकच ध्येय...हिंदवी स्वराज्य...,
एकच छत्र...भगवा झेंडा..||
पाठीशी...आईचा आशीर्वाद...
अन शिवशंभुंचे बळ..||
लाखोंच्या उमेदीचे बळ हत्तीचे..,
जिजाऊंच्या चुड्याची ताकद..,
व अनेकांचे बलीदान..||
बस...राजे तुमच्यासाठी..,
हा प्राणही कवडीमोल..||
।। जय शिवराय ।।
।। जय महाराष्ट्र ।।

धरतीच्या उदरात मराठा, कधी न सोडीसाथ मराठाया देशातून प्रेम वाहते, या देशाची जात मराठा

नररत्नांची खाण मराठा,
सदैव उन्नत मान मराठा
अजिंक्य आहे, अजिंक्य राहील,
भारतभूची' जान' मराठा
पक्ष्यांची ही साद मराठा,
कडे कपारी, नाद मराठा
'हर हर हर 'डरकाळी फुटते,
विजयाचा अस्वाद मराठा
लाजलाजिरी रात मराठा,
महाराष्ट्राची बात मराठा
गवतांनाही भाले फुटती
त्या हिरव्या कोंबात मराठा
या मातीचा श्वास मराठा,
या दर्याचा न्यास मराठा
या व्योमाच्या अणु रेणूतून,
वसते अमुची खास मराठा
या दुर्गांची माळ मराठा,
कधी न तुटते नाळ मराठा
वरून कणखर, आतून हळवे,
हृदयामधले बाळ मराठा
धरतीच्या उदरात मराठा,
कधी न सोडीसाथ मराठा
या देशातून प्रेम वाहते,
या देशाची जात मराठा…..
!! जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे !!

आज २४ फेब्रु. १६७४वेडात मराठी वीर दौडले सात

२४ फेब्रु. १६७४
“प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!”
आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान
जिवंत जातो याचा महाराजांना राग
आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून
प्रतापरावांची कान उघाडणी केली.
त्या पत्रात एक वाक्य असं होतं
की,
"बहलोल खानास गर्दीस
मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड
दाखवू नका"
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर
मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न
प्रतापरावांना दिवसरात्र सातावीत
होता.अवघे सात मराठे हजारोंच्या सैन्यावर
चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य
विश्वास,
पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं
काही !
प्रतापरावंचं ठीक पण
त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले
नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात
वीर हे मराठी इतिहासातील एक
स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
प्रतापराव आणि सोबतचे सरदार मरण
पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले.
स्वराज्याची हानी झाली. मात्र
शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं.
पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.
राज्याभिषेकाच्य ा तयारीत असणारेमहाराज प्रतापरावांच्या ह्या बलिदानानंतर उद्गारले " तोंड दाखवू नये म्हणून लिहले,तर तसेच करून गेले"
प्रतापरावांच्या मृत्यूची मानस लागलेली टोचणी शिवरायांनी प्रतापरावांच्या कन्येचा विवाह राजाराम महाराजांशी लाऊन काहीसी कमी केली.
१)विसाजी बल्लाळ
२)दिपाजी राउतराव
३)विठ्ठल पिलाजी अत्रे
४)कृष्णाजी भास्कर
५)सिद्धी हिलाल
६)विठोजी शिंदे
७)सरनौबत प्रतापराव गुजर
"सात दौडले सात दौडले म्हणती सारेसारे,
नेसरखिंडी लोककथा ही अजून 'प्रताप'वारे"
त्या सात स्वामिनिष्ठ मावल्यांस गुढघे टेकून त्रिवार वंदन
शिवपाईक भगव्या झेंड्याचा शिपाई

''छत्रपतींचे'' नावघेतल्याशिवाय माझा दिवसउगवत नाही...

जागवल्याशिवाय जाग येत
नाही......
.
.
ओढल्याशिवाय काडी पेटत
नाही.......
.
.
तसे,
''छत्रपतींचे'' नाव
घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही...!!.
.
.
.
|| जय शिवराय ||

सह्याद्रीच्या वाघांनीइतिहास घडविला आहे कैकांचा तख्तो-ताजईथे पायदळी तुडविला आहे

सह्याद्रीच्या वाघांनी
इतिहास घडविला आहे
कैकांचा तख्तो-ताज
ईथे पायदळी तुडविला आहे
सह्याद्री अजिंक्यतेसाठी
केले रक्ताचे शिंपणं गडकोट रक्षणार्थ केले
निधड्या छात्यांचे कुंपण
कित्येक आहुत्या अर्पूनं
सह्यसूळका गगनास भिडविला आहे
सह्याद्रीच्या वाघांनी
इतिहास घडविला आहे. ईथेच आमुच्या शिवरायांनी
अफजुल्ल्याची कोथळी काढली,
अन् लाल-महाली शिरलेल्या
विंचवाची नांगी तोडली,
सह्याद्रीच्या काळडोहात
अवरंग नावाचा कलिया नाग बुडविला आहे सह्याद्रीच्या वाघांनी
इतिहास घडविला आहे.
जय शिवराय...!!
जयोस्तू मराठा..!

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे व तमाम मराठ्यांचे आराध्य दैवत तरगडकिल्ले आणि सह्याद्री महाराष्ट्राचा मूलाधार.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , महाराष्ट्राचे - || छत्रपती शिवाजी महाराज || म्हणजे महाराष्ट्राचे व तमाम मराठ्यांचे आराध्य दैवत तर
गडकिल्ले आणि सह्याद्री महाराष्ट्राचा मूलाधार.
सुलतानांची गुलामगिरी हेच आयुष्याचे इति कर्तव्य समजणाऱ्या कणाहीन झालेल्या समाजाला महाराजांनी भानावर आणलं.एवढचं नाही तर जगाने कौतुक करावे आणि अखिल हिंदूस्थानाने अभिमान बाळगावा असं अखंड हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या साक्षीने उभे केले.
बाराशेव्या शतकापासून भारतात प्रस्थापित झालेल्या आणि स्थिरावलेल्या सर्व सुलतानांच्या टोळधाडी छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडकिल्ले आणि सह्याद्री यांच्या मदतीने थोपवले.
बंगाल पासून इराण-इराक पर्यंत अथांग पसरलेल्या मोंगलशाहीचा पातशहा औरंगजेबाचे सुद्धा दक्षिण विजयाचे स्वप्न स्वप्नच राहिले, ते फक्त आणि फक्त शिवराय, त्यांचे सर्व मावळे, गडकिल्ले आणि अनादी काळापूर्वी प्रगट झालेला सह्याद्री.
यां मुळेच हेच महारा­ष्ट्राचा इतिहास-वर्तमान आणि भविष्य.

परवाच शिव-जयंती झाली. त्या निमित्त माझा एक चांगला अनुभव सर्वां बरोबर वाटून घ्यावा असे वाटते

परवाच शिव-जयंती झाली. त्या निमित्त माझा एक चांगला अनुभव सर्वां बरोबर वाटून घ्यावा असे वाटते.
११९६ जुलै मध्ये म्हणजे सुमारे १७ वर्षांपूर्वी वर्तमान पत्रात एक बातमी वाचली कि एक संघटना शूर वीर बाजी प्रभू देशपांडेंच्या पुण्यतिथीला पन्हाळगड ते विशालगड पदभ्रमण आयोजित करीत आहेत. सोबत संपर्कासाठी दूरध्वनीक्रमांक. दिले होते. मी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्याशी संपर्क साधला आणि माझे नाव दिले. पदभ्रमण शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवसांचे होते. आजही मला ते जसे च्या तसे आठवत आहे. सुमारे ७० चा ग्रुप होता. वय-वर्षे ८ ते ७०, पण बहुतेक १५ ते ४० या वयोगटातील होती. आम्ही मुंबईहून गुरवारी रात्रीच्या महालक्ष्मी एक्ष्प्रेस या गाडीने कोल्हापूर ला गेलो. कोल्हापूर स्थानकातून बस ने पन्हाळगड किल्ल्यावर गेलो. सकाळीसुमारे दोन तास पन्हाळगड किल्ला संपूर्ण बघितला आणि जेऊन झाल्यावर साधारण २-२.३० वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. पन्हाळगड किल्ला उतरल्यावर थोडीशी चढण आहे आणि मग म्हसाईचे एक विस्तीर्ण पठार लागते. त्याच्या पुढे मग आम्ही पाऊल वाटेने वाटेतले नद्या नाले वाहाळओढे सारे काही तुडवत निघालो पहिल्या दिवशी आम्ही सुमारे ८ तास चाललो आणि पाटेगाव म्हणून एका गावात रात्रीचा मुक्काम केला. त्या वेळी त्या वाटेवर मध्ये मध्ये काही वस्त्या होत्या, पण तिथे जायला डांबरी रस्तादेखील नव्हता. वाटेत फक्त ओढ्यातले दगड गोटे आणि पाला पाचोळा होते. माझ्या मनात शंका आली कि जर कोणी त्या वस्त्यातली व्यक्ती आजारी पडली आणि इस्पितळात पोहोचवायची वेळ आली तरकाही किमी. अंतर डोलीतून जाऊन मगचवाहनाची सोय होऊ शकेल इतका तो मागास भाग आहे. मुंबई पुण्या सारख्या शहरातल्या मुलांना त्याची कल्पनाच येणार नाही. असो. तर अश्या रस्त्यांतून चालत आम्हीपहिल्या दिवशी सुमारे ७-८ तास चालल्यावर पाटेगावला पोहोचलो. वाटेत काही तिकडची लहान मुले आम्हाला काही खाऊ द्यायची. गावातल्याच एका घरात आमची झोपण्याची सोय होती. दुसऱ्या दिवशी साधारण सकाळी ८ वाजता चालायला सुरुवात केली आणि दुपारी२-३ वाजता आम्ही पांढरपाणी या मुक्कामाच्या गावात पोहोचलो. तिथे एका शाळेत आमची सोय केली होती. सात- आठ तास सतत पाठीवर स्याकचे वजन घेऊन चालताना पाय दुखायचे आणि मध्ये विश्रांती साठी म्हणून बसलो कि मग दोन पाऊलेसुद्धा चालायला जीवावर यायचे ! चालताना दोन तीन वेळा दमल्यामुळेवाटले कि आता पुरे, आता नको, पण एकटे तिथे वाटेत कुठे बसणार ? आणिमनात कुठेतरी बाजी प्रभू देशपांडे, मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज कधी काळी याच वाटेवरून गेले असतील, त्यांचे पाय या भूमीला लागले असतील आणि तेतर रात्रीच्या वेळी धो धो पावसात,विजा चमकताना, पाठीवर शत्रुसैन्यपाठलागावर असताना कसे गेले असतील? !! या विचाराने परत आम्ही हुरूप आणून चालायला लागायचो. पांढरपाणीच्या मुक्कामी रात्री आम्ही काहीमनोरंजनाचे कार्यक्रम केले. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता चालायला सुरुवात केली ती गजापुरची खिडी कडे ( पावन खिंड) साधारण सकाळी ९-१० वाजता पोहोचलो.ती पवित्र जागा बघून ऊर भरून आला. बाजींच्या आठवणीने डोळ्यात आसवे तरळली. तिकडे तेव्हा आतासारखी शिडी नव्हती. त्यामुळे झाडाला बांधलेल्या दोरखंडाच्या साह्याने सुमारे चाळीस-पन्नास फूट खोल खिंडीत आम्ही उतरलो आणि परत त्याच आधाराने वर चढलो. खिंडीच्या दोन्ही बाजूंना मोठ मोठे खडक पाहून वाटले नरवीर बाजींच्या अतुलनीय पराक्रमाचे हे खडक साक्षी आहेत !
पावन खिंड बघून आम्ही विशाळगडाच्या वाटेला लागलो. मध्ये मध्ये हिरवीगार शेते होती त्या शेतांच्या बांध्यावरून चालत आम्ही मध्ये रस्ता सोडत होतो आणि जवळचा मार्ग पत्करून पुन्हा पुढे त्या रस्त्याला मिळतहोतो. पांढरपाणीच्या पुढे डांबरीरस्ता लागला. विशाळ गडावर सुद्धा चढायला लोखंडी शिड्या आहेत. त्या चढून आम्ही दुपारी सुमारे २ वाजता विशाळगडावर पोहोचलो. तिथे एका मंदिरात आमची सोय केली होती. विशाळगडावर शिवाजी महाराजांच्याकाहीच खुणा नाही हे बघून मन फार दु:खी झाले.
पन्हाळगड ते विशाळगड हे अंतर सुमारे ७० किमी आहे. एवढे अंतर तीन दिवस चालल्यावर आमच्या तळ-पायांवर गठ्ठे आले होते ! ( जसेडंब बेल्स पहिल्यांदाच उचलल्यावर हातावर येतात )
विशाळगडाहून आम्ही बसने मध्ये तिकडून जवळच असलेले मार्लेश्वर येथील निसर्गरम्य धबधबा आणि मंदिर बघून मुंबईला परतलो. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असा होता. माझ्यातला निसर्ग प्रेमी तर खुश झालाच पण माझ्यातला इतिहास प्रेमी जास्त खुश झाला होता.

Mahesh Nadkarni

गड बघायला गेलो पण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणणार्यांनी हा माझा अनुभव नक्की वाचवा.

गड बघायला गेलो पण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणणार्यांनी हा माझा अनुभव नक्की वाचवा.

माझ्या जवळ दोन तासांचा वेळ होता अजिंक्यातार्यासाठी. घोड्याला टाच मारावी तशी मी गाडीला किक मारली आणि खेकळत निघालेली घोडी किल्ल्याच्या दिशेने उधळली. गाडीचा वेग वाढतहोता तशी मनगटातली रग आणि छातीतली धगही वाढू लागली होती.रानटी जनावरासारखा मी वळणांचारस्ता कापीत होतो.
मी माझ्याच जोशात असताना माझ्या दोन्ही बाजूनी गारांचापाऊस पडावा तसा टापांचा खडखडाट उसळला.....हिरवे झगे फरफरू लागले......धिन धिन च्या किल्कार्या घुमू लागल्या ........ मोघली सैतानी तोफा आ वासून आग ऒकु लागल्या.... धुराचे लोट उतू लागले.......... .. नंग्या तलवारी गडाच्या दिशेने उगरु लागल्या.......
राजा नही रहा अब इनका मिट्टी मे मिला दो काफिरोन्को ..........
दुसर्याच क्षणी हरहर महादेव ची आरोळी आसमंतात उठली....... ढगांचा प्रचंड गडगडाट माजावा तशा काळ्या फत्तरी , शिळा कडेकपारीतून झेपावू लागल्या. झाडे वेली चिरडीत अन टप्प्यात भेटेल तो गनीम जमीनदोस्त करीत पायथ्याला जावून विसावल्या.
सुलतान धावा गडाला भिडला अन शिड्या अन दोर ताटाला खेटु लागले.तसा मुख्य दरवाजाच्या माथ्यावरून ढाण्या वाघ चवताळून उठावा तसा एक नरवीर समशेर उपसत कडाडला.
हर हर महादेव......... .. मराठ्यानो जिता सोडायचा न्हाय गनीम! कोण होता तो जन्ग्बाझ ? ते होते किल्लेदार प्रायागजी प्रभू!
हुकुम सुटू लागले . शिड्या उलटावा ...दोर कापा ....भाजून काढातेलान ......दरवाजे ढील पडू दिवू नका.
कणभर मराठ्यांनी संपूर्ण जिद्द पणाला लावली होती आणि मनभर गनिमानी आपली संपूर्ण ताकत !
मोग्लांनि किल्ल्याच्या तटा खली दोन भुयारे खणली आणि त्यातसुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि धुराचा, आगीचा अन दगड मातीचा लोळ उंच उडाला. अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण ज्वालामुखी उसळावा तसे प्रयागाजी मातीच्या ढिगार्यातून वर निघाले.आणि माझ्या मुखातून आपोआपच शब्द फुटले हर हर महादेव......
दऱ्याखोर्यातून तोच आवाज फिरून माझ्या कानावर पडला आणि मी शुद्धीवर आलो आणि माझ्या लक्षात आले कि मी गडाच्या उंच दरवाजावर उभा होतो आणि खाली दिसत होती खोल दरी.ते मावले,तो गनीम, ते प्रायागजी हवेत विरूनगेले होते.लोहाराच्या भात्यासारखी माझी छाती धपधपत होती,डोळ्यात अंगार फुलाला होता, अंगावर काटा उभा राहिला होता आणि बोचरी हवा अंगाशी झोबत होती. आसपासचे लोक मला वेड लागल्यासारखे माझ्याकडे बघत होते.
मी खाली उतरलो आणि दोन पावलं चालतो तोच ती रणधुमाळी पुन्हा माझ्या आसपास पुन्हा फुलली. तटफुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले.मराठ्यांच् या तलवारी गनीमाच्या छातीचा वेध घेवू लागल्या बघता बघता रक्ताचा आणि माणसाचा चिखल तुडवीत मराठे पुन्हा सज्ज झाले.
समोरच्या पठारावरून एक भरधाव घोडा उधळत आला आणि एक रनमर्दानी वीज कडकडावी तशी चमकली. पाठीवरच्या भात्यातून एक बाण धनुष्याला लावीत तटाकडे निघून गेली.त्या होत्या महाराणी ताराबाई.......मुख्य दरवाज्याच्या पायर्या चढत एक राजबिंड्या थाटातली एक मूर्ती वर चढत होती
मराठ्यांचे राजकुमार शंभूराजे!
माझी मान झुकली आणि मी मुजर्याला कमरेत शुकलो.शंभूराजे राजवाड्याच्या दिशेने निघाले होते आणि मी हि त्यांच्या पाठोपाठ राजवाड्यात पोहोचलो. शंबूराजांच्या चाहुलीने निद्रिस्त असलेले आबासाहेब उठले आणि समोर राजकुमार बघून चेहेर्यावरचे तेज आणखी दाट झाले.राजांनी शंभूराजांना अलीगन दिले,पितापुत्रा ची भेट झाली,माझ्या डोळ्याच्या कडा ऒलावल्या. मी अश्रू टिपे पर्यंत दोन्ही मुर्त्या पुन्हा विलीन झाल्या.
मी राजवाड्यातून बाहेर आलो पाण्याची टाके, धान्याची कोठारे, तुपाच्या विहिरी, घोड्याच्या पगा, मुकपाद्खाना जश्या च्या तश्या माझ्या सोर उभ्या ठाकल्या होत्या.एके काळी राजवैभव अनुभवलेली हि स्वराज्याची राजधानी जरी आज भग्न अवस्थेत असली तरी मला ती आजही सुस्थितीत दिसत होती.
मी अजिंक्यतारा कधीच विसरू शकत नाही कारण दिवास्वप्ना का होईना पण त्या निमित्ताने मला एक अदभुत अनुभव मिळाला होता.
--------भाऊ मराठा.

"हमे किसीका डर नही लगता लेकीन हमारे वजेसे सबको डर लगता है"

औरंगजेब संभाजी राजेंना बघुन म्हणतो.
नौ बरस का था संभा तबये मिलाता आग्रा मे तो पुछा था हम ने इसे.
'क्युं रे संभा तुमे हमारा डर नही लगता',
तब इसने जवाब दिया था,
"हमे किसीका डर नही लगता लेकीन हमारे वजेसे सबको डर लगता है"
"ये मरहट्टे क्या खिलाते है अपणे बच्चों को
क्युं पैदा नही हुवा ऐसा एकबी शक्स हमारे जनाने मे"
                        -औरंगजेब.

आम्ही रक्ताचा सडा शिंपला या मातीसाठी ।।आम्ही तख्ताचा मोह सोडला जातीसाठी ।।

का उगाच नांद सह्यांद्री गर्जे मराठ्यांचा ।।

का उगाच तुडविला रस्ता काट्यांचा।।

का उगाच तो हिमालया झुके मुजऱ्‍याला ।।

का उगाच ना जमले ऐसे धाडस दुसऱ्‍याला ।।

आम्ही रक्ताचा सडा शिंपला या मातीसाठी ।।

आम्ही तख्ताचा मोह सोडला जातीसाठी ।।

आम्ही घेतल्या हाती जेंव्हा तलवारी ।।

आम्हीच धडक्या भरविल्या शत्रुच्या उरी ।।

आ रे
झुंज मोगलांशी घेणारे आम्हीचती वादळे ।।

झुंज मृत्युशी घेणाऱ्‍या शंभुची मावळे ।।

नाही झुकनार कुठे
सांगा त्या दगडाला ।।

मंदीर ते एकच मानतो आम्ही
फक्त रायगडाला ।।
जय शिवराय

काळजात भगव्याच्या दाटती कळा..ll सांगती दुनियेस हज्जार वेळा..ll

आमचा सन्मान भगवा..ll
निशान भगवा..ll
अभिमान भगवा..ll
आमचे कुळ भगवे..ll
मुळ भगवे..ll
आमचा हर्ष भगवा..ll
स्पर्श भगवा..ll
आमची जात भगवी..ll
कात भगवी..ll
आमचे धर्म भगवे..ll
कर्म भगवे..ll
आमच्या भावना भगव्या..llसंवेद ­ना भगव्या..ll आमचा विचार भगवा..ll
प्रचार भगवा ..ll
आमची छाती भगवी..ll
माती भगवी..ll
आमचे तन
भगवे..ll
मन भगवे..ll
आमचा मान भगवा..ll
हिंदुस्थान भगवा..ll
आमचे रक्त भगवे..ll
तख्त भगवे..ll
आमचा उच्चार भगवा..ll
आचार भगवा..ll
आमचे वस्त्र भगवे..ll
शस्त्र भगवे..ll
आमचा श्वास भगवा..ll
ईतिहास भगवा..ll
आमचे कपाळ भगवे..ll
आभाळ भगवे..ll
आमचा सन्मान भगवा..ll
निशान भगवा..ll
आमचा महाराष्ट्र भगवा..ll सर्वश्रेष्ठ भगवा..ll
काळजात भगव्याच्या दाटती कळा..ll सांगती दुनियेस हज्जार वेळा..ll नका ठेऊ आम्हावर तिरका डोळा..ll नाहीतर आमचा नांद लयी खुळा..ll
॥जय भवानी॥
|| जयजिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभु राजे||
जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र
प्रत्येक मराठ्याने शेअर करा.. कळू दे जगाला आपला राजा

वाघ असल्याची जाणीव करणारा.होय आहे शिवराय नावाचा माझा भगवा आहे..

भगवा म्हणजे...?
भ - भिक न मागणारा
ग - गनिमाला कापणारा
वा - वार्यालाहि लाजवणारा
होय आहे शिवराय नावाचा माझा भगवा आहे..
भगवा म्हणजे...?
भ - भवानी आई चा आशीर्वाद
ग – गजर हर हर महादेवाचा
वा – वारकरी आई जगदंबेचे
होय आहे शिवराय नावाचा माझा भगवा आहे..
भगवा म्हणजे...?
भ - भय भयीत करणारा.
ग - गुलामी न करणारा
वा - वाघ असल्याची जाणीव करणारा.
होय आहे शिवराय नावाचा माझा भगवा आहे..
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे!

तलवार से दुनिया बदलने का जज्बा है.....आकाश को देखो गद्दारो वहा भि हमाराकब्जा है.....

हम शहाजी राजे की
औलाद है.....
हम पत्थर नही
फौलाद है.....
हम जिजाऊ के
चिते है.....
... अपने दम पर
जिते है.....
शिवबा के हम वही
शेर है.....
जिसके आगे सारी दुनिया
ढेर है.....
हम संभा कि
जान है.....
हा मरहठ्ठे हि ईस देश कि
पहचान है.....
ये आवाज नही शेर कि
दहाड है.....
हम खडे हो जाये तो
पहाड है.....
हम ईतिहास के वो सुनहरे
पन्ने है.....
जो भगवान ने
चुने है.....
ये शेर जब रास्ते से
चलते है.....
तो गिधड खुद अपना रास्ता
बदलते है.....
तलवार से दुनिया बदलने का
जज्बा है.....
आकाश को देखो गद्दारो वहा भि हमारा
कब्जा है.....
भगवे से काफर कहा
बचता है.....
ये रंग बस मरहठ्ठोपे
जजता है.....
दुनिया आज भि उन्हे याद
करती है.....
जिस संभा से मौत
डरती है.....
हम
हम है
ना कलंक
ना बट्टा
दिल्ली तख्त पे बैठेगा
तो
वो
सिर्फ
मरहठ्ठा
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....!!

पेटविला रणांगनी देह झिजविला मातिसाठी.

पेटविला रणांगनी देह
झिजविला मातिसाठी...!!!
मरणाच्या दारातही लढलो
आम्ही प्रत्येक जातीसाठी...!!!
शिवशंभूं मरूनही
हे स्वराज्य राखण्याची साद आहे...!!!
म्हणूनच लाखो करोडो मावळा
येथे महाराजांवर
हसत हसत कुर्बान आहे...!!!
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शिवशंभूराजे

माघार घेणेमराठ्यांच्या रक्तात नाही

मराठा,
बात मराठा,
जात मराठा,
श्वास मराठा,
आस मराठा,
ध्यास मराठा,
सहवास मराठा,
प्रेम मराठा,
दयावान मराठा,
मी मराठा,
आम्ही मराठा,
जय मराठा,
जयोस्तु मराठा.. मराठा,
मराठा आणि फक्त
मराठाच..
!! माघार घेणे
मराठ्यांच्या रक्तात नाही आणि जोमाघार
घेतो तो मराठा नाही.. !!
जय शिवराय

अनेक झाले पुढेही होतीलअगणित ह्या भुमीवरतीजाणता राजा एकची झालातो फक्त “राजा शिवछत्रपती”

!! जय शिवराय !!
अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।
|| जय जिजाऊ ||...|| जय शिवराय ||....|| जय शंभुराजे||

अरे मी, मी मराठी माणूसजागा झालोय, आठवूनी बाजींची पावनखिडं,

अरे मी, मी मराठी माणूस
जागा झालोय,
आठवूनी बाजीची पावनखिडं,
हातात तलवार घेऊन, दुश्मनांची वाट पाहतोय.......
अरे मी, मी मराठी माणूस
भुकेला झालोय,
आता परप्रातीयांची काही खैर नाही,
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
अरे मी, मी मराठी माणूस
अंगात माझ्या मराठयाचं रक्तं,
शपथ शिवरायांची घेऊन,
उभा करतो आज महाराष्ट्राचा तक्तं......
अरे मी, मी मराठी माणूस
आवाज उठवतोय, अत्याचारावरच नाही तर,
रक्त भ्रष्टाचारी मानसाचं साडूंन
भविष्य मराठय़ाचं जपतोय........
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
☀जय भवानी जय शिवराय☀
!!! जय महाराष्ट्र !!

आम्ही म्हणजे द ग्रेट मराठा, जगात आमचा सिंहाचा वाटा

आम्ही म्हणजे द ग्रेट मराठा ,
जगात आमचा सिंहाचा वाटा ,
आमचे कर्तृत्व म्हणजे सागरी लाटा ,
आम्ही आहोत गुलाबाचा काटा ,
 काळजात आमच्या प्रेमाचा साठा ,
आणि छञपति राजे हाच आमचा बायोडाटा....

जय शिवराय

हा गंध महाराष्ट्राच्या ­ ­ मातीचामी मर्द मराठा आहे जातीचा...

हा गंध महाराष्ट्राच्या ­ ­ मातीचा
मी मर्द मराठा आहे जातीचा...
सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात
गर्जतो हा नाद मराठ्यांचा ...
सांडले रक्त इथे मराठ्याचे
पावन झाली हि धरणी माय....
 स्वराज्याच्या रक्षणासाठी
अर्पण करतो प्राण मराठा ...
आजही डौलात डोलतो आहे
हा भगवा झेंडा मराठ्यांचा...
करितो ललकार हा मराठा
जयजयकार हा शिवरायांचा...
राजाधिराज, कर्तव्यदक्ष
छत्रपती शिवराय दुर्गपती,
गजअश्वपती, भूपती, प्रजापती,
सुवर्णरत्नंश्रीपती, अष्टावधानजागृत,
अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडीत,
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर,
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रीयकुलावतंस,
सिँहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज,
श्रीमंत पुण्यश्लोकश्री
श्री छ. शिवाजी महाराज की जय||

मर्द आहे मी , मराठा आहे,माणुसकीच्या नात्याने गप्प आहे.

मर्द आहे मी , मराठा आहे,
माणुसकीच्या नात्याने गप्प आहे,
नादी लागायच काम करू नका,
आमच्या मर्दानकीला ललकारू नका,
नाहीतर परिणाम विचारा एकदा,
... त्या इतिहासाला ,
अफजल्याच्या कोथळयाला,
शायेस्तेखानाच्या बोटांना ,
औरंग्याच्या तख्ताला ,
विचारा त्या दिल्लीला ,
त्या सिंहाच्या जबड्याला ,
पाडलच भाग तुम्ही आम्हाला
तलवार हाती घेण्याला ,
तर लक्षात ठेवा
वंश उरणार नाही तुमच्या जातीला .
जय भवानी ,जय शिवराय .!!! ...

बिदरशाहीची" शकले ­उडाली, नाश पावली" आदिलशाही

बिदरशाही ची" शकले ­ ­ उडाली,
नाश पावली" आदिलशाही"
­ ­,
"मोगलायीच्या" तर ­ चिंद्या उडल्या,
नायनाट झाली" निजामशाही" ­­

रोवोनी पाय ह्या जुलमीनच्या छातीवरती,
आजही जगावर राज्य करते
आमच्या शिवरायांची"शिवशाही..

☀जय भवानी जय शिवराय☀

चळचळ कापे मोगल ज्यांना ......! "छत्रपती शिवाजी राजे भोसले" म्हणतात त्यांना......!

सह्याद्रीच्या दर्याखोर्यात
जेव्हा शिवसिँह गर्जतो......!
गर्जना ऐकताच शिवसिँहाची
दुश्मन भितीने
अन्नपाणी वरजितो......!
चळचळ कापे मोगल ज्यांना.....!
"छत्रपती शिवाजी राजे भोसले"
म्हणतात त्यांना......!
॥ जय भवानी जय शिवराय

दोन ओळी कायम लक्षा ठेवा

दोन ओळी कायम लक्षात ठेवा..
..
..
...
..
..
..
..
..
..
शिवरायांनी तुमचे भविष्य जाणले होते .....!!
निदान तुम्ही त्यांचा इतिहास
तरी विसरू नका .....!!
जय शिवराय

मुजरा माझा राजांना

मुजरा माझा राजांना, अरे घाबरत
नाही मी नामर्दांना
जात माझी मावळ्यांची, भीती न
मजला कावळ्यांची..... ­ ­ ­ !!
आहे जरा आड वाट,पण इथेच दिसतो आमचा थाट
कधी पडलीच मोघलांशी आपली गाठ,
तर दाखवून देईल काय आहे मर्द मराठ्याची जात ...!!
भगवे रक्त आम्ही शिवरायांचे भक्त!
!! जय भवानी !!
जय जिजाऊ !!
!! जय शिवराय!!
!! जय
शंभुराजे !!

वाघ म्हणतात मराठ्यांच्या जातीला|

वाघ म्हणतात मराठ्यांच्या जातीला|
कपाळी लावतो महाराष्ट्राच्या ­ -मातील||
डोँगराशी भीडवतो छातीला|
तोड नाहि जगात कुठे
आमच्या हिँमतीला||
रक्त पाजतो स्वत:चे तलवारीच्या पातीला|
पुजतो फक्त त्या शिवछत्रपतीँना||
जय शिवराय

आपल्या गावा गावात रोजच्या रोज देवाच्या आरतिवा णी नचुकता शिवचरित्राचे परायण होण गरजेचं

आपल्या गावा गावात..,
जोपर्यँत,
रोजच्या रोज देवाच्या आरति वाणी
नचुकता शिवचरित्राचे परायण होणार नाहि ,
तोपर्यँत क्रांतिच्या केवळ गप्पाच मारल्या असं समजा..!

-Hammer of Bahujan
Hrishikesh Bibrale

बचेंगे तो और भी लडेंगे

बचेंगे तो और भी लडेंगे"
या मराठी बाण्याच्या वरून
स्फुरलेल्या ओळी हजार घाव
झेलूनही खिंडीत बाजी बाकी
आहे,
जोवर येत नाहीत तोफांचे
आवाज तोवर लढण्याचा
हट्ट बाकी आहे,
पडला जरी वज्रगड तरी पुरंदरवर
मुरारबाजी बाकी आहे,
कंठनाल छेदुनही झुंजणारा
देह बाकी आहे,
घात करूनही आप्तांनी साथीस
सह्याद्री बाकी आहे,
कैद होवूनही शंभू अंतरी स्वराज्य
बाकी आहे,
एक लढाई संपली तरी युद्ध
अजून बाकी आहे,
जरी पराभव झाला क्षणभर
तरी लढण्याची जिद्द बाकी आहे |
हर हर महादेव
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे

एक होते राजे शिवाजीभिती नव्हती त्याना जगाची..

एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची..
चिंता नव्हती परिणामांची ..
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची..
...
त्यांची जात मर्द मराठ्याची,
देशात लाट आणली भगव्याची,
आणि मुहर्तमेढ रोवली
स्वराज्याची...
म्हणूनच म्हणतात,
"जय भवानी जय शिवाजी"

"कैसे है ये मरहट्टे!

"कैसे है ये मरहट्टे!
पथ्थरों से खेलते है,
नंगे पैर घुमते है.
बदन की तो बोटी बोटी दिखती है
लेकिन मुक्कदर को
बदलने की ताकद रखते है''
जय शिवराय....!!

शिवरायांसारखा राजा होणे नाही

शिवाजीराजांनी यावर्षी (दि। २ 3 ते 3 ० एप्रिल १६५७ ) एका अत्यंत अवघड अशा धाडसी राजकारणात हात घातला. मोगलांसारख्या दैत्य बळाच्या सत्तेविरुद्ध पहिला हल्ला केला. मोगली ठाणी मारली. औरंगजेबानं सर्व पाताळयंत्री डाव आणि ढोंगबाजी करून दिल्ली कब्जात घेतली. त्याने बापाला आग्ऱ्याला कैदेत ठेवले. तो ‘ आलमगीर ‘ बनला. म्हणजे जगाचा सत्ताधीश! या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजीराजांवर काय परिणाम झाला ? राजांवर दहशत बसली का ? छे! पण ते खिन्नतेने बहुदा हसले असावेत राजपुतांच्या राजनिष्ठेला.
पण इराणच्या बादशाहवर मात्र परिणाम झाला. याचे नाव होते शहा अब्बास सानी. त्याला औरंगजेबाचा राग आला. तिरस्कार वाटला आणि कीवही. पण त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिले. त्यांत शहा अब्बास लिहितो : ‘ अरे! तू आलमगीर केव्हा झालास ? जगाचा सत्ताधीश! आलमगीर ? तो दक्षिणेकडे ( म्हणजे महाराष्ट्रात) असलेला शिवाजी तुला हैराण करतोय. त्याचा बंदोबस्त तुझ्याने होईना आणि तू आलमगीर ?’ म्हणजे या आणि पुढच्या काळात शिवाजीराजांच्या धुमाकुळाची रणधुमाळी इराणच्या तेहरान राजधानीपर्यंत पोहोचली.
शिवाजीराजांच्या राज्यकराभारात आणि रणकारभारात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने दिसून येते। ती म्हणजे स्वावलंबन. कुठेही , कुणाकडेही मदतीच्या-भिक्षे च्या आशाळभूतपणाने ते बघत नाहीत. अन्नधान्य , युद्ध साहित्य , गडकोटांची बांधणी , दारूगोळा आणि आथिर्क खजिना सदैव समृद्धच असला पाहिजे , हा त्यांचा कडक आग्रह होता. स्वराज्याला कधीही आथिर्क कर्ज काढण्याची वेळ आलीच नाही. यात अनेक गोष्टी प्रकर्षानं नजरेत भरतात. आवश्यक तेवढा खर्च , आवश्यक ती काटकसर , उधळपट्टीला पुरता पायबंद , शिस्त चिरेबंद , भ्रष्टाचारी , गुन्हेगारी पक्की जेरबंद. एकदा का सरकारी सेवकांना लाच खायची सवय लागली की , रयतेची दु:खे आणि तेवढेच शाप राज्यर्कत्याला सोसावे लागतात हे राजांनी पक्कं जाणलं होतं. ‘ रयतेस आजार देऊ नये. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. रयत दु:खी झाली तर म्हणू लागेल की, यापेक्षा मोगल बरे! मग मराठीयांची इज्जत वाचणार नाही. ‘ हा महाराजांचा राज्यकारभार. राज्यसंसार. एखाद्या दक्ष पण तेवढ्याच प्रेमळ अशा गृहिणीसारखा राज्यकारभार महाराजकरीत होते. न्याय चोख होता. अन्यायकरणाऱ्यांना कडक शिक्षा होत होत्या. कामगिरी करणाऱ्यांना ते पोटाशी मायेनं घेऊन कौतुक करीत होते.
म्हणूनच जुन्या पत्रांत राजांच्याबद्दल शब्द येतात बेलाफुलासारख्या भक्तीचे , तुळशी- दवण्यासारख्या अन् चाफा-बकुळीसारख् या सुगंधांचे। हे बघा ना! ‘ राजश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी ‘, ‘ हे श्रींचे राज्य आहे ‘, ‘ हे श्रींच्या वरदेचेराज्य आहे.
‘ शिवाजी महाराज फार फार प्रेमळ होते। गुणी आणि कष्टाळू परमार्थवंत आणि चारित्र्यवंत संतसज्जनांचे ते नम्र भक्त होते. कोणत्याही धर्माच्या , पंथांच्यावा जातीच्या ईश्वरभक्तापुढे ते हात जोडून होते. पण कोणत्याही राजकारणात वा राज्यकारभारात त्यांनी या संतांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. त्याही संतांनी फक्त देवभक्ती , लोकजागृती आणि लोकसेवाच केली. यात कोणीही सरकारी संत नव्हताच.
शिवाजीराजा एक माणूस होता। तो अवतार नव्हता. आपण शिवाजीराजांच्या दैदिप्यमान पराक्रमी कृत्यांनी आणि उदात्त आचरणाने दिपून जातो. आपले डोळे भक्तीभावाने मिटतात. नको! ते डोळेउघडण्याची आवश्यकता आहे.
शिवाजीमहाराजांन ी अचूक संधी साधून , आपल्या कर्दनकाळासारख्य ामहाभयंकर असलेल्या सत्तेवर जुन्नर , नगर , श्रीगोंदे इत्यादी ठाण्यांवर हत्यार चालविले , हे पाहून औरंगजेबाचे डोळे खाडकन उघडले. वटारले गेले. तो या गोष्टीचा बदला नक्कीच घेणार होता। पण दिल्ली ताब्यात आल्यावरस्थिरस्थावर व्हायला वेळ लागणार होता. त्यावेळचाही फायदा घेणार होते. शिवाजीराजे! त्यांनी औरंगजेबी सत्तेखालचे कोकणातले उत्तर ठाणे जिल्ह्यातले काही किल्ले घेतलेच. राजांच्यासारखा अचूक संधीसाधू राष्ट्राला नेहमीच हवा असतो.
याचवेळी ( इ। स. १६५७ उत्तरार्ध) राजांनी कोकणात आपला घोडा उतरविला. कारण त्यांना संपूर्ण कोकण समुदासकट स्वराज्याच्या कब्जात हवे होते. राजांनी दादाजी रांझेकर आणि सखो कृष्ण लोहोकरे यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण आणि भिवंडी जिंकावयास रवाना केले , जिंकले. या दोघांनीहीएकाच दिवशी कल्याण , भिवंडी काबीजकेली. या दिवशी दिवाळीतील वसुबारस होती. (दि. २४ ऑक्टो. १६५७) दुर्गाडी किल्ल्यावर झेंडा लागला. इथे भूमीगत धन हंडे भरून राजांना मिळाले. लक्ष्मीपूजन सार्थ झाले. कल्याणच्या खाडीत मराठी आरमाराचा शुभारंभ झाला. आगरी , भंडारी आणि कोळी जवान सागरलाटेसारखे महाराजांच्याकडे धावत आले. आरमार सजू लागले. पैशात किंमतच करता येणार नाही, हिऱ्यामाणकांनी तुळा करावी अशी ही कोकणची जवान आगरी , कोळी , भंडारी माणसं आरमारावर दाखल झाली. कोकणची किनारपट्टी हळूहळू स्वराज्यात येऊ लागली. आंबा पिकत होता , रस गळत होता पण कोकणचा राजाउपाशीपोटीच झोपत होता. आता स्वराज्यात आमराया बहरणार होत्या. नारळी सुपारी चवरीसारख्या डुलणार होत्या. कोकणचा हा उष:काल होता.
कल्याण भिवंडीपासून दक्षिणेकडे कोकणवर महाराजांची मोहीम सुरू झाली. एकेक ठाणं भगव्या झेंड्याखाली येऊ लागलं.

सौजन्य ::: प्रा.नितीन बानुगडे - पाटील

कारण हि जात हाय मराठ्यांची

पिडीताला साथ देऊ।
अन्यायावर मातदेऊ।
गरजवंताला बोट देऊ।
सच्चाईला वोट देऊ।
आणि वाकड्यात गेलाच कोण
तर नरडीचा घोट घेऊ।।
।। कारण हि जात हाय मराठ्यांची ।।

"जय जिजाऊमाता"
"जय शिवराय "
सौजन्य ::: प्रा.नितीन बानुगडे - पाटील

जगाच्या पाठीवर "गनिमी कावा" म्हटले की लोकांना फक्त आणि फक्त मराठ्यांचीच आठवण का येते

जगाच्या पाठीवर "गनिमी कावा" म्हटले की
लोकांना फक्त आणि फक्त
मराठ्यांचीच आठवण का येते
त्याचे उत्तर यात आहे...
"जिथे काहीच बदल होउ शकत नाही
असे ४०० वर्ष येथील लोकांना वाटत होते
त्यावेळी परिवर्तन करूनच दाखवू या हट्टाने पेटलेले मराठे
शेवटी बदल करूनच दाखवतात
हाच तो मराठ्यांचा वज्रनिर्धार मराठ्यांना
जगातील १३ अव्वल लढाऊ जमातीतून
एकदम एक नंबर वर नेउन बसवितो.
युद्धतंत्राचा भाग म्हणून मराठे नक्कीच माघार घेत होते
परंतु त्याच्या आडून लगेच ते शत्रूला
पूर्ण पराभवा पर्यंतही आणून सोडत होते..."
जय शिवराय..
जय जिजाऊ...

सौजन्य ::: प्रा.नितीन बानुगडे - पाटील

शिकविले आम्हा संभाजी महाराजांनीशेवटच्या श्वासापर्यंत लढायचे ...

शिकविले आम्हा
संभाजी महाराजांनी
शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे ...
कितीही संकटे आले तरी...
मागे नाही सारायचे...
जय शंभूरुद्र...!!
जय शिवराय

प्रसंगाप्रमाणे किंवा आपल्या आवश्यकतेनुसार गनिमी काव्याची काही उद्दिष्टे

गनिमी काव्याची काही उद्दिष्टे असतात आणि ती साध्य करण्यासाठी असा हा
नियोजनबद्ध कार्यक्रम असतो. प्रसंगाप्रमाणे किंवा आपल्या आवश्यकतेनुसार
गनिमी काव्याची काही उद्दिष्टे असू शकतात. त्यातील
काही प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे असू शकतात.

१. शत्रूला आर्थिक रित्या कमजोर करणे.

२. शत्रूला दहशत बसविणे.

३. शत्रू सैन्याची प्रचंड कत्तल करून कायमस्वरूपी दरारा निर्माण करणे.

४. शत्रूचा म्होरक्या एका झटक्यात मारून बाकी सैन्यावर दहशत बसविणे.

५. शत्रूला कोंडीत पकडून बिनशर्त शरण येण्यास भाग पडणे.

६. शत्रू सैन्याला पळून जाण्यास मार्ग ठेवणे माणुसकी दाखवणे.

७. शत्रूला पूर्ण पराभूत करून खस्त करणे.

८. शत्रुमध्ये गोंधळ माजवून बेबनाव तयार करणे.

९. शत्रुसैन्यात संशय आणि भीतीचे वातावरण तयार करणे.

१०. अचानक शत्रूच्या प्रदेशात दाखल होणे किंवा शत्रूच्या तावडीतून अचानक
गायब होणे. हाही एक गनिमी कावा आहे.

{ शिवरायांच्या जीवनातील काही लढायांच्या विचार केल्यास आपणाला ते
सप्रमाणे दिसून येते..}

१. शत्रूला आर्थिकरीत्या कमजोर करणे सुरत बसनूर छापा.

२. शत्रूला दहशत बसविणे अफजल खान वध.

३. शत्रू सैन्याची प्रचंड कत्तल करून कायमस्वरूपी दरारा निर्माण करणे.
प्रतापगडाची लढाई ते पन्हाळा किल्ला जिंकणे.

४. शत्रूचा म्होरक्या मारून दहशत बसविणे - शास्ताखान प्रकरण.

५. शत्रूला कोंडीत धरून शरण येण्यास भाग पडणे - उंबरखिंड कारतलबखान
प्रकरण.

६. उमराणीची लढाई - बहलोलखान पराभव.

७. शत्रूचा पूर्ण पराभव करणे - साल्हेर मुल्हेर लढाई.

८. गोंधळ बेबनाव - विजापुरातोल अंतर्गत राजकारण.

{ वाचा, विचार करा आणि शेअर करावे.}

सौजन्य ::: प्रा.नितीन बानुगडे - पाटील .

शिवरायांच्या विचारांनीजगाल तरछत्रपती व्हाल !!

दुःखामध्ये डोळ्यातु धार
आणु नका .
संकुचित जगण्यालाच सार
मानु नका .
जीवनाला कधी भार मानु नका .
शिवरायाची शपथ कधी
हार मानु नका .
गाढवाच्या संगती रहाल तर
माती व्हाल .
शिवरायांच्या विचारांनी
जगाल तर
छत्रपती व्हाल !!
जय भवानी जय शिवाजी ...!!!

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा फौजेसाठी घालून दिलेली शिस्त !!

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा फौजेसाठी घालून दिलेली शिस्त !!
१. सरनौबाताने घोडदळ घेऊन वर्षातील आठ महिने मुलूखगिरीस जावे.
२. शत्रूच्या सधन मुलुखातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करावे.
३. स्वारीस जाताना प्रत्येक शिपायाच्या बिशादिची तपशीलवार यादी करून त्याची किंमत सरकारात नमूद करावी.
४. हीच यादी मोहिमेवरून परत आल्यावर पुन्हा तपासून पहावी .
५. या यादीव्यतिरिक्त त्या स्वाराकडे काही अधिक माल सापडल्यास तो लुटीचा समजून स्वराज्याच्या तिजोरीत जमा करावा किंवा तेवढी किंमत त्याच्या पगारातून बळती करावी.
६. स्वाराच्या जमा बिशादीपैकी एखादा जिन्नस गहाळ झाल्यास सरकारतून भरपाई करून द्यावी.
७.मोहिमेवर असताना शिलेदाराचा घोडा मेल्यास किंवा निरुपयोगी झाल्यावर सरकारातून ताबडतोब दुसरा घोडा दिला जावा .
८. स्वारीस जाणाऱ्या कोणाही शिपायाने आपली बायको बटीक किंवा कलावंतीन बरोबर नेऊ नये तसेच स्वारीबरोबर कलाल नसावे.
९. या नियमाचा भंग केल्यास देहांतशासन केले जाईल..
१०.शेतकऱ्यास आणि स्त्रियांस कदापि लुटू नये.
११. श्रीमंत लोकांकडून खंड वसूल करावा.नेक माणसांना त्रास देऊ नये.
१२. लुटीच्या वेळी स्त्रिया व मुले ह्यांना त्रास होता कामा नये.
१३. पावसाळा सुरु होऊन नद्यानाले भरण्याअगोदर लष्कराने स्वदेशी यावे.
१४. लुटीची एकंदर यादी करून तपासून राज्याच्या तिजोरीत जमा करावी.
१५. स्वारीत चांगले काम करण्यार्यांना नावाजले जाऊन बढती द्यावी.
१६. कोणी लढाईत मरण पावले तर त्यांच्या बायकामुलांना लष्करातनोकरी द्यावी.
१७. युद्धात कोणास कायम अपंगत्व आल्यास त्याला तह ह्यात वेतन सरकारतून मिळाव
१८. जखमी सैनिकास आजारी सैनिकास औषधोपचार सरकारातून व्हावा.
१९. बेकैद वर्तन करणाऱ्याला बडतर्फ केले जावे.

( वाचा, विचार करा आणि शेअर करा...)
सौजन्य ::: प्रा.नितीन बानुगडे - पाटील —

ज्याच्या मनी शिवरायांचे विचार।।तो नसे लाचार।।ज्याच्या अंगी आहे शिवनिती।।त्याला कशाची भिती।।

ज्याच्या मनी शिवरायांचे विचार।।
तो नसे लाचार।।
ज्याच्या अंगी आहे शिवनिती।।
त्याला कशाची भिती।।
ज्याच्या हृदयात शिवरायांची मुर्ती।।
त्याची होई जगभरात किर्ती।। जो करेल शिवरायांची पुजा।।
त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा।।
जो धरे शिवरायांची वाट।।
त्याचा असे राजेशाही थाट।।
ज्याच्या ओठातुन गरजे स्वराज्याचा सोहळा।।
तोच खरा शिवरायांचा मावळा।। ज्याच्या नजरेत उतरतो ईतिहास पराक्रमी।।
त्याच्या आयुष्यात कशाची कमी।।
ज्याची भगव्याला पाहुनफुगते छाती।।
त्याला अशिर्वाद देई राजा शिवछत्रपती।।
जय शिवराय...

(share करून सर्वांपर्यंत पोहचवा...)
सौजन्य ::: प्रा.नितीन बानुगडे -पाटील

तरुण वयात संपुर्ण जगाच्या इतिहासा मध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारे,जगाच्या इतिहासातील एकमेव असायोध्दा की बाकी सर्व सैनिकांसाठी प्रेरणास्थान आहे.

तरुण वयात संपुर्ण जगाच्या इतिहासा मध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारे,
जगाच्या इतिहासातील एकमेव असायोध्दा की बाकी सर्व सैनिकांसाठी प्रेरणास्थान आहे. जगाच्या पाठीवर तलवारी बरोबरच बुधभूषण,नायिकाभ ेद,सातसतक व निखशिखा हे ग्रंथ बालवयात लिहिणारा एकमेव साहित्यीक,
जगाच्या पाठीवर एकमेव राजा की फक्त आणि फक्त एकच स्त्रिशी विवाह करुन निष्ठावंत व चारित्र्यसंपन्न जपणारा राजा.
आयुष्याच्या केवळ 32 वर्षात त्यातीलही शेवटच्या 9 वर्षात 2500 लढाणारे व एकही न हरणारे एकमेव यौध्दो,
जागतिक इतिहासामधील एकमेव राजा की ज्यांनी स्वराज्यासाठी मरण पत्कारले, पण शरण गेले नाहीत.
असे अनेक विविध पैलु
'छत्रपती संभाजी राजेँचे' आहेत. ज्यांच्यावर लिहीयचे झाले तर जगभरातील संपूर्ण साहित्यीकांचा, लेखकांच्या लेखण्या बंद पडतील पण त्यांचे चरित्र संपणार नाही..
संभाजीराजांचा इतिहास जर घराघरापर्यँत गेला तर या देशात परिवर्तन 100 टक्केच होईल. कोण म्हणतय परिवर्तन होतनाही ? गरज आहे फक्त शंभुराजांचे चरित्र घराघयात घेउन जाण्याची, गरज आहे. शंभुराजांचा विचारांचा जागर करण्याची, गरज आहे शंभूराजांना जागर करण्याची.
अहो मेलेल्यांना जागे करण्याची ताकत या शंभुराजेँच्या चरित्रात आहे..
महापराक्रमी छत्रपती संभाजी राजेँना आमचा मानाचा मूजरा !!!

इथे शरमले देवत्वही त्या शूरत्वाच्या तेजात |

इथे शरमले देवत्वही त्या शूरत्वाच्या तेजात |

शंभू नृपा शत प्रणाम करतो,
अनेक म्हाणती वीर तुम्हाला,
अनेक म्हाणती नर शेर |

कोणी म्हाणती 'नृपती
धैर्यधर, मूर्तिमंत रन-समशेर |

वज्रा अपुली दृष्टी दानिते सर्वाविनाशी आघात

छत्रपती शंभू राजेंना मानाचा मुजरा
_______/\______

एकच देव माझा...ईतिहासाचा बाप श्री छत्रपति शिवाजी राजा....

एकच देव माझा...
ईतिहासाचा बाप श्री छत्रपति शिवाजी राजा....
एकच दैवत माझे ...
कर्तृत्वान महाराज शहाजी राजे....
एकच माझी माता....
संस्काराचा सागर आउसाहेब जिजाऊ राजमाता....
एकच आदर्श माझा.....
पराक्रमाच आभाळ शंभुराजा माझा....
एकच माझे निशान....
गनिम थरथर कापे पाहुन त्या भगव्याचा अभिमान.....
एकच माझे राज्य.....
लाखो मावळ्यांच्या बलीदानान उभ राहिलेल
स्वराज्य.....

एक भयान वादळ

एक भयान वादळ..
जव निघर्म होता
कौर्य गाजवी धर्म,
जागती शौर्य
तख्त झुकवितो,
औंरग्यास रडवितो
असा मर्द शिवबाचा "शंभूछावा"..!!

शंभू समशेरीचे पुण्य
जाहली स्वराज्य दौलत
बेशक,
रणमर्द मराठा
मर्द शिवबाचा "शंभूछावा"..!!

काळ समोर उभा
तरीही ललकारीतो नभा
धर्मवीर हा मराठा
शेर शिवबाचा
शंभूछावा..!!

राजं मुजरा
राजं मुजरा
।। जय शिवशंभु !!
__/\__

।। "हे हिन्दुशक्तिसंभु ­तदिप्तितमतेजा". ­.....।।।। "हे हिन्दुशक्तिसंभु ­तदिप्तितमतेजा". ­.....।।

।। "हे हिन्दुशक्तिसंभु ­तदिप्तितमतेजा". ­.....।।
।। "हे हिन्दुशक्तिसंभु ­तदिप्तितमतेजा". ­.....।।
।। "हे हिन्दुशक्तिसंभु ­तदिप्तितमतेजा". ­.....।।
।। "हे हिन्दुतपस्यापुत ­ईश्वरिओजा"..... ­...।।
।। "हे हिन्दुश्री सौभाग्यभुतिच्या ­साज्या"।।
।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभोशिवाजी राजा" ....।। ।।".प्रभोशिवाजी राजा"....।।
।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभोशिवाजी राजा" ....।। ।।".प्रभोशिवाजी राजा"....।।
।। "करि हिन्दुराष्ट्र हे तु ते....".वंदना"... ­.... ।।
।। "करि अंतःकरणज तुज..."अभिनंदना". ।।
।। "तव चरणी भक्तिच्याचर्चि. ­.."चंदना "......।।
।। "गुढाशा पुरवी त्या न कथुशकतो जा".. ।।
।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभोशिवाजी राजा" ....।। ।।".प्रभोशिवाजी राजा"....।।
।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभोशिवाजी राजा" ....।। ।।".प्रभोशिवाजी राजा"....।।
।।"जि शुध्दि ह्रदाचि रामदास शिर डुलवी ".. ।।
।।"जि बुध्दि पाचशाह्यास शत्रुच्या झुलवी" ... ।।
।।"जि युक्ति कुटनितिक खलासि बुडवी" ..... ।।
।।"जि शक्ति बलोन्मत्तास पदतलि तुडवी "....।।
।।"ति शुध्दि हेतुचि कर्मि..राहुदे" .......... ।।
।।"ति बुद्धि भाबड्या जिवा....लाहुदे "....... ।।
।।" ति शक्ति शोणिता माजि..वाहुदे"

Friday 22 February 2013

शिवराय तूम्ही नसता तर आजही जगलो असतो हे जिवन गुलामीचे

केलेत अनंत उपकार आम्हावरी
म्हणून पाहतो हे दिस सुखाचे
शिवराय तूम्ही नसता
तर आजही जगलो असतो
हे जिवन गुलामीचे
जय शिवराय

आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता

आमच्याबद्दल
आम्हालाच काय विचारता
आमच्याबद्दल
विचारायचे असेल तर विचारा
सह्याद्रिच्या कड्याकपारिंना
खणखणणार्या तलवारिंना
अरबा सागराला,
मराठि मनाला
आणि
पाणी पीताना ही शिवाजी महाराज
दिसले
म्हणून चार पावले मागे फिरणार्या
मोगल्यांच्या घोड्यांना
जय शिवराय

शिवराय म्हणजे जितक्या उपमा देऊ तितक्या कमी आहेत

शिवराय म्हणजे मंदिर
शिवराय म्हणजे मुर्ती
शिवराय म्हणजे शक्ती
शिवराय म्हणजे भक्ती
शिवराय म्हणजे विश्र्वास
शिवराय म्हणजे प्रकाश
जितक्या उपमा देऊ तितक्या कमी आहेत
जय शिवराय

तुफ़ानो से कह दो,जरा औकाद में रह ..."मराठे" है हम.!!!

पेड से गिरे हुए
पत्ते नही है हम ...
तुफ़ानो से कह दो,
जरा औकाद में रह ...
"मराठे" है हम ..!!
जय जिजाऊ ...!!!
जय जय शिवराय ...!!!

शिवकाळ हा जगाच्या इतिहासतला पहिला काळ जिथ माणसमरण्यासाठी स्पर्धा करत होती....

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा ­ ­ ची गोळी झाडुन
झालेली हत्या टि.व्ही.वर बघता येते. पण
ती हत्या एवढ्या विकसीत
दुर्बीनी असुनसुध्दा रोखता येत नाही.
परंतु , महाराजांवर घाव घालणारा हात
खाली येवु दिली नाही, तो वरचेवर
उडवला गेला. त्यांच कारण,
ही माणस महाराजांवर प्राणापलिकड
प्रेम करणारी आणि प्रसंगी मृत्युला अलिँगण
देणारी होती.
जगाच्या इतिहासतला पहिला काळ जिथमाणस
मरण्यासाठी स्पर्धा करत होती....
जय शिवराय.....!!!

शिवराय हे५० वर्षे जगले पण आज ४०० वर्षे झालेतरी लक्षात आहेत.

लोक १०० वर्षे जगतात पण ५ वर्षे
साधी लक्षात राहात नाहीत.
.
शिवराय हे
५० वर्षे जगले
पण आज ४०० वर्षे झाले तरी लक्षात आहेत.

ज्याच्या मनी शिवरायांचे विचार।।
तो नसे लाचार।।
ज्याच्या हृदयात शिवरायांची मुर्ती।।
त्याची होई जगभरात किर्ती।।

संकटे येतिल हजार तु मात दे मराठ्या !!दिप ऊजळवु उत्कर्षाचे वात दे मराठ्या !!

संकटे येतिल हजार
तु मात दे मराठ्या !!
दिप ऊजळवु उत्कर्षाचे
तु वात दे मराठ्या !!
एकमेका साह्य करु
तु साथ दे मराठ्या !!
काळाची गरज आहे
तु हात दे मराठ्या !!

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे

राख होते शत्रुंची अशी डोळ्यात आमच्या आग आहे.. लांडग्याची जात तुझी मीसह्यांद्रिचा वाघ आहे...

असे कुनापुढे झुकनारी
हि मान नाही..
मी राजा आहे रयतेचा
शैतान नाही..
आभिमान आम्हाला
आमच्या मातीचा..
या छातित धमक आहे
स्वराज्य उभे करण्याची..
राख होते शत्रुंची
अशी डोळ्यात आमच्या आग आहे..
लांडग्याची जात तुझी मी
सह्यांद्रिचा वाघ आहे...

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभुराजे॥

आम्ही रानभर फिरणारी वादळे.. आम्ही शिवबाची मावळे..

तुफान सळसळते रक्तात..
अशी ताकद या शिवभक्तात..
सागरी लाटा उसळती काळजात..
शिवरायांचा मावळा तोच
ज्याला नसे धर्म जात..
कसली हि मंदिरे दगडांची..
जाती पातीच्या भगदडांची..
आम्ही रानभर फिरणारी वादळे..
आम्ही शिवबाचे मावळे.. जय जय जय जय
जय शिवराय

राजाधिराज

राजाधिराज, कर्तव्यदक्ष
छत्रपती शिवराय दुर्गपती,
गजअश्वपती, भूपती, प्रजापती,
सुवर्णरत्नंश्रीपती, अष्टावधानजागृत,
अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडीत,
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर,
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रीयकुलावतंस,
सिँहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज,
श्रीमंत पुण्यश्लोकश्री
श्री छ. शिवाजी महाराज की जय||

तलवारीचे घावअन छातीत छत्रपतिंचे नावहे कितीही पीढ्या झाल्यातरी कधीच पुसनार नाही

एकवेळ
मर्द मावळ्याच्या अंगावर
कपडे दिसनार नाहीत
पण
छातीवर तलवारीचे घाव
अन छातीत छत्रपतिंचे नाव
हे कितीही पीढ्या झाल्या
तरी कधीच पुसनार नाही

राजाधीराज कर्तव्यदक्ष
छत्रपती शिवराय दुर्गपती,
गजअश्वपती, भूपती, प्रजापती,
सुवर्णरत्नंश्रीपती, अष्टावधानजागृत,
अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडीत,
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर,
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रीयकुलावतंस,
सिँहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज,
श्रीमंत पुण्यश्लोकश्री
श्री छ. शिवाजी महाराज की जय||
जय शिवराय

जब-जब तेरी तलवार उठी, तो दुश्मन की टोली डोल गयी।

जब-जब तेरी तलवार उठी,
तो दुश्मन की टोली डोल गयी।
फीकी पड़ी दहाड़ शेर की,
जब-जब तुने हुंकार भरी॥
जय शंभुराजे

जाउन सांगा,तुमची 'शिवबाच्या मावळ्यांशी' गाठ­ आहे.

मी प्रत्येक वादळ पेलिन,
मला आत्मविश्वास आहे...
माझ्या पायाशी जमिन,
पाठीशी आकाश आहे,
पाय जमीनीत घट्ट रोवुन,
मी सह्याद्रि सारखा ताठ आहे..
जाउन सांगा,
तुमची 'शिवबाच्या मावळ्यांशी' गाठ­ आहे.
जय जिजाऊ
जय शिवराय
|| जय शिवराय ||

रक्ताचा अभिषेक केलाशपथ स्वराज्याची...

जगताचा राजा माझा
गरीबांचा कैवारी
नाद घुमतोय दरीदरीतून
सह्याद्रीच्या कड्याकपार्यातून
"जय शिवराय जय शिवराय"
भगवा झळकतो डौलात
वीर मराठ्यांच्या उरात.
पेलतील भगवा बाहू आमचे,
आशिर्वाद आम्हा आई भवानीचां,
भीती नाही उरी आमच्या
राजे असता पाठीशी., वार्याशी संगत आमुची
नात तलवारीशी
रक्ताचा अभिषेक केला
शपथ आहे स्वराज्याची...
होय.!!
पुन्हा एकदा चटक
लागली या मातीला मराठ्यांच्या रक्ताची...
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभुराजे !!
!! जय महाराष्ट्र !!

कवी- गणेश पावले

"शिवाजी" हा शब्दच देतो जगण्याचा विश्वास !

"शिवाजी" हे शब्दच
कितीतरी सांगून जातात,
त्यांचा अर्थ स्पष्ट
करायची गरज नाही !
याच तीन अक्षरात दडला आहे
या मातीचा जाज्वल्य इतिहास,
या नावातच दडला आहे
शिवप्रभूंचा वास,
हा शब्दच सांगतो
इथल्या लोकांच्या पराक्रमाचा ध्यास,
हा शब्दच देतो जगण्याचा विश्वास !
|| जय शिवराय ||

तुम्ही नसता तर नसती दिसली अंगनात तुळस!

सह्याद्रीचा सिँह जन्मला
आई जिजाऊपोटी!
हर हर महादेवाची
घुमली गर्जना
गडकिल्याच्या ओठी!
रायगडावर तुम्ही ऊभारली
शिवराष्ट्राची गुढी!
राजे तुम्ही नसता तर
सडली असती हिँदुची मढी!
तुम्हामुळे तर आम्ही
पाहतो देवळाचे कळस,
तुम्ही नसता तर
नसती दिसली अंगनात तुळस!
जय शिवराय

रणांगनातुन आता पळणे नाहीहातात तलवार आहे खेळने नाही

तलवारीची धार
या मनगटातील ताकद तुमची
रक्ताने वीर मी
छाताडातली आग तुमची
संस्कार जिजाऊचें
प्रेरणा शिवरायांची
उरात आठवण शंभुची
हिच परपंरा मराठ्यांची
मोडेन पण वाकनार नाही
मृत्यु जवळ पण झुकनार नाही
या रणांगनातुन आता पळणे नाही
हातात तलवार आहे खेळने नाही
जगायच तर जगीन मराठ्याचा वाघ म्हणुन
देह पडला तरी शत्रुच्या डोळ्यात घुशीन राख बनुन
लोटले पुर्वजांनी माझ्या छातीने तोफाचे गाडे
घेतले मी आईच्या कुशीतच ईतिहासाचे धडे
आजही जाणवतो मला शंभु रक्तात
सळसळताना
पाहिले मी शंभुच्या दारात
ईतिहासाला पाणी भरताना
तळमळतो जिव माझा ऐकुन युवराज सर्जाची कहाणी
रांगडा मर्द गडी शिवबाचा पुत्र वीर बलीदानी
मि जातीने मराठा अशिर्वाद द्यावा
हा देह फक्त स्वराज्यासाठीच पडावा
घे ऐकुन एकच मागने देवा
देव छत्रपति माझा तुम्ही राग न घ्यावा
अभिमान मला शंभुचा त्याचाच वाटतोहेवा
मुजरा मानाचा..
जय जिजाऊ….!!
जय शिवराय….!!

पावनखिंडीतील लढाई


बाजीप्रभू शिवाजी महाराजांना पुढे जाण्यास विनंती करताना

दिनांक जुलै १३ १६६०
ठिकाण पावनखिंड, जिल्हा कोल्हापूर,महाराष्ट्र, भारत
परिणती मराठ्यांचा विजय
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्य आदिलशाही
सेनापती
बाजीप्रभू देशपांडे सिद्दी मसूद
सैन्यबळ
६०० १0,०००
बळी आणि नुकसान
३०० ३०००
शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचू देण्याचे उदिष्ट सफल


पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई जुलै १३,१६६० रोजी विशाळगडनजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटूनशिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजीच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने शिवाजींना विनंतीवजा आदेश् दिला की शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील. अशी लढाई युद्धशास्त्रात लास्ट स्टँड मानली जाते.


पार्श्वभूमी:

शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील भल्या भल्या सेनापतींना पराभवाची चव चाखायला लावली.अफझखानासारख्या मोठ्या सेनापतीचा वध केला. या सर्वांचा परिणाम म्हणून आदिलशाहीने विजापूरहून सिद्दी जौहरला सर्व शक्तीनीशी शिवाजींवर हल्ला करण्यास सांगितले. तसेच त्यावेळेस आदिलशाहीने मुघलांशी संगनमत करून शिवाजींवर आक्रमण करण्यास विनंती केली. सिद्दी जौहरने शिवाजीं महाराज पन्हाळ्यावरअसताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऎवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला व नव्या दमाने दुसऱ्या किल्ल्यावरुन (विशाळगडावरुन्) जौहरचा सामना करायचे ठरले.
पावनखिंडीतील आजची चिंचोळी वाट

आदिलशाही फौजेचे नेतृत्त्व सिद्दी जौहर कडे होते, त्यालासिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती. जौहरची एकूण फौज १0,००० ची होती तर शिवाजींचे फ़क्त ३०० ते ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री शिवाजींनी पोर्णिमेच्या रात्री गडावरुन उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केली. एका आख्यायिकेप्रमाणे शिवाजींनी आपल्यासारख्याच दिसणाऱ्याशिवा काशिद नावाच्या नाव्ह्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणींसाठी पाठवले होते. व या भेटी दरम्यानच्या काळातच शिवाजींनी पन्हाळ्यावरून पलायन केले. जेव्हा जौहरला शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळाले आहेत असे सुगावा लागला तेव्हा सिद्दी मसूदला शिवाजींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने शिवाजी व साथिदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची जाणीव ज़ाली व काही वेळातच ते गाठतील व शिवाजींना व इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूने शिवाजींना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करायचा विनंतीवजा आदेश दिला व जो पर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले.

खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगड गोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अश्या प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल ह्यांनी आपपल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभूच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदूकधाऱ्यांना कड्यावर चढून बाजीप्रभूवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. तसे आदेश त्यांनी पार पाडले. बाजीप्रभू जखमी झाला तरी त्याने सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका असा आदेश दिला. काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा गजर ऎकल्यानंतरच त्याने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला.मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले जवळपास ३००० सैनिक मारले गेले.

इकडे शिवाजींनी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला. विशाळगडाचा किल्लेदार रंगो नारायण सरपोतदार याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले.


लढाईनंतर

बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. शिवाजींनी या लढाईत बलिदान देणाऱ्यांचे यथोचित सत्कार केले. स्वता: बाजीप्रभूंच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या मुलांना पालखीचा मान देण्यात आला. संभाजी जाधव यांचा मुलगा संताजी जाधव यांना मराठी सेनेत समावण्यात आले.


संदर्भ
पावनखिंडीचे फोटो. मराठीमाती.
Baji Prabhu Loyal Friend and Soldier of Shivaji

अफझलखान प्रकरण


आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्याप्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवाचिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलाखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचाजनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.
शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.

अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

ह्यांनी घडविला महाराष्ट्र

मराठी भाषा आणि शिवराय

शिवकाल : राजभाषेचं सौख्य -

छत्रपती शिवाजी महाराजांनी शके १५६२ (इ.स.१६४१-४२) ह्या सुमाराला आपला स्वराज्यस्थापनेच्या कार्याचा आरंभ केला आणि पुढील काळात त्याला यशही आलं. शिवकालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहाराची भाषा अर्थातच मराठी होती. त्या काळात अन्य राजवटींत राज्यकारभाराची मुख्य भाषा फारशी ही होती. शिवकालीन मराठीवरही फारशीचा प्रचंड प्रभाव असलेला दिसून येतो. मुजुमदार, सरनोबत, हवालदार इत्यादी अधिकार्‍यांची नावं, पीलखाना, जवाहरखाना आदी विभागांची नावं आणि सुत्तरनाल, तोफ इ. शस्त्रांची नावं असे अनेक फारसी शब्द मराठीत आले होते. अर्थात शिवकालात झालेल्या पद्यमय साहित्यव्यवहारात मात्र फारशीचा प्रभाव तितका जाणवत नाही. 

ह्या पार्श्र्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ह्या फारशी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द देणारा राज्यव्यवहारकोश रचला गेला. शिवाजी महाराजांच्या अधिकार्‍यांच्या मुद्रा ह्या काही अपवाद वगळता मराठी वा संस्कृतातच होत्या (मेहेंदळे, १९९६, पृ. ६४०). शिवकाळात राज्यव्यवहार मुख्यत्वे मराठीत होताना आढळतो. 

इंग्रजांकडून मराठ्यांकडे जी लेखी करारपत्रं वगैरे जात ती मराठीतच असत. मराठ्यांकडून इंग्रजांना जाणारी काही पत्रं तरी मराठीत असावीत असं अनुमान करायला वाव आहे. चौलचा सरसुभेदार बहिरोपंत ह्याने मुंबईचा गव्हर्नर हेन्री ऑक्झिंडेन ह्याला पाठवलेलं पत्र मराठीत होतं आणि नंतर त्याचं भाषांतर करण्यात आलं अशी माहिती आढळते. (मराठी संशोधनपत्रिका, जानेवारी, १९५४, पृ. १३)

शिवकालात आणि त्यानंतरच्या काळात गद्य मराठी भाषेवर फारशीचा काही एक प्रभाव आढळतो. ह्या दृष्टीने बखरींची भाषा पाहण्यासारखी आहे.

पेशवेकाळात राज्यव्यवहाराची भाषा मराठीच होती. तिच्यावर फारशीचा प्रभावही असलेला दिसून येतो. ह्या काळात मराठी सरदारांची संस्थानं महाराष्ट्राबाहेर निर्माण झाली. त्या भागांत मराठी भाषिक जनतेचं वास्तव्य होऊ लागलं, त्यातून त्या-त्या ठिकाणी मराठी भाषेचा प्रसार झाला.

भूतकाळातील मराठीच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा



एखादी भाषा नेमकी केव्हा अस्तित्वात आली हे सांगणं कठीण आहे. पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा किती मागच्या काळापर्यंत शोधता येतात ह्याचा शोध इतिहासकार घेत असतात. 
उद्योतनसूरी ह्या आठव्या शतकातल्या ग्रंथकाराच्या ‘कुवलयमाला’ ह्या ग्रंथात मराठे आणि मराठी ह्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. (तुळपुळे, १९७३ पृ. ५)
दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य
दिण्णले गहिल्ले उल्लेविरे तत्थ मरहट्टे

त्यात धिप्पाड, सावळ्या, काटक, काहीशा अहंकारी अशा मराठ्यांचा (मरहट्टे) उल्लेख येतो तसेच ते ‘दिले, घेतले असं बोलतात’ (दिण्णले गहिल्ले) असे म्हणताना त्यांच्या भाषेचाही उल्लेख येतो. इ.स. ८५९ मधल्या धर्मोपदेशमालेतही मरहट्ट असं भाषेचं नाव आलं आहे. मराठीच्या अस्तित्वाविषयीचे हे अप्रत्यक्ष पुरावे आहेत. इ.स. १०६० मधल्या दिवे आगरच्या ताम्रपट मराठीचं अस्तित्व ओळखता येईल इतपत महत्त्वाचे उल्लेख आढळतात. (तुळपुळे, १९७३, पृ. ५-६)

पेशवे काळ


धनाजी जाधव, खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ या सहकार्‍यांच्या मदतीने छत्रपती शाहू यांनी राज्यकारभारास सुरुवात केली. बाळाजी विश्वनाथांनी मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांस छत्रपती शाहूंच्या पक्षात आणले. दिनांक १६ नोव्हेंबर, १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांस छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे दिली. महाराणी ताराबाईंनी आपली सत्ता कोल्हापूरमध्ये प्रस्थापित केली. त्यामुळे मराठी राज्याचे दोन तुकडे झाले. सातारा आणि कोल्हापूर. १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ दिल्लीला गेले. त्यांनी बादशहाकडून छत्रपतींच्या नावे स्वराज्य, चौथाई, सरदेशमुखीच्या सनदा मिळविल्या. पेशव्यांनी मुघलांच्या कैदेतून छत्रपतींच्या मातोश्री येसूबाईंची सुटका केली. या सनदांमुळे दक्षिणेतील सहा मुघल सुभ्यांमध्ये चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला. छत्रपतींचे पूर्वार्धातील आयुष्य मुघलांच्या कैदेत गेल्यामुळे ‘त्यांनी आपणास जिवंत ठेवले व वेळ येताच सोडले’ या गोष्टीचा छत्रपतींच्या मनावर परिणाम झाला असल्यामुळे त्यांनी ‘‘दिल्लीची पातशाही रक्षून राज्यविस्तार साधावा’’ असा सल्ला पेशव्यांना दिला.

बाळाजी विश्वनाथांची आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी मराठा मंडळ अर्थात संयुक्त राज्यव्यवस्थेची निर्मिती केली. या योजनेनुसार मराठा सरदारांना त्यांच्या त्यांच्या प्रभावक्षेत्रात मर्यादित स्वायत्तता देण्यात आली व स्वराज्याचा चौफेर विस्तार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. अशा या अतुल पराक्रमी सेवकाचा मृत्यू सासवडला दिनांक २ एप्रिल, १७२० रोजी झाला. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले बाजीराव हे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. ते वडिलांच्या तालमीत तयार झाले होते. हे पेशवे आयुष्यात कधीही रणांगणावर पराभूत झाले नाहीत. त्या अर्थाने ते अजेय होते व मराठी सत्तेचे विस्तारक होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पराभव केला, छत्रसाल राजाची संकटातून मुक्तता केली. बंडखोर मराठे सरदारांचा बंदोबस्त केला. सिद्दी-पोर्तुगीजांचा नक्षा उतरविला. गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली भागात भीमथडीची तट्टे नेली. ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे’ अशी मराठी माणसाला अनुभूती दिली. गतिरुद्ध समाज आपसात संघर्ष करून संपतो, ही गोष्ट लक्षात घेऊन मराठी सरदारांच्या पराक्रमाला पेशव्यांनी आणि छत्रपतींनी नवे क्षितीज उपलब्ध करून दिले. या पेशव्यांच्या काळात दक्षिणाभिमुख असणारे मराठे ‘उत्तराभिमुख’ झाले. त्यामुळेच शनिवारवाड्याचे तोंड उत्तराभिमुख आहे. औरंगजेबाच्या मृत्यूने भारताच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली होती, ती मराठ्यांनी भरून काढली. अशा या पराक्रमी पेशव्याचा मृत्यू १७४० मध्ये झाला.
त्यांचे ज्येष्ठ पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. दुर्दैवाने या पेशव्यांनी मराठ्यांच्या साम्राज्याचा विनाशाची अकाली बीजे पेरली. इंग्रजांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचा त्यांनी इंग्रजांच्या मदतीने पूर्ण नाश केला. माळवा, राजपुताना भागातील हिंदू राज्यकर्त्यांना अकारण दुखविले. नागपूरकर भोसल्यांशी तंटा केला. पानिपतच्या स्वारीवर स्वत: जाऊन नेतृत्व करण्याऐवजी विश्वासराव, सदाशिवराव पेशव्यांना पाठवून स्वत:चा पराभव ओढवून आणला. अहमदशाह अब्दाली याने दिल्लीवर स्वारी केली असता, ‘हिंदुस्थान आमचा आहे आणि आम्ही तो सांभाळणारच’ या एकमेव उद्देशाने भारतातील एकमेव सत्ता लढली ती म्हणजे मराठ्यांची! पानिपतावरील पराभवाचा आघात नानासाहेब सोसू शकले नाहीत, त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे सत्तेवर आले. १७६१ ते १७७२ इतकाच कालखंड या पेशव्याच्या वाट्याला आला. या पेशव्यांनी पानिपतच्या आघाताने मोडून पडलेली मराठी सत्ता सावरून धरली. शिंदे-होळकरांच्या कर्तृत्वास वाव दिला. काका रघुनाथराव पेशवे व जानोजी भोसले, हैदर आणि निजाम यांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी लगाम घातला. १७७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांना मूल नसल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव गादीवर बसले. त्यांच्या निमित्ताने मराठ्यांचे सत्ताकारण ज्या गोष्टीपासून मुक्त होते त्या गोष्टी - म्हणजे खून व रक्तपात - घडण्यास सुरुवात झाली.

नारायणरावांचे काका रघुनाथराव यांनी पेशवेपदाच्या मोहाने गारद्यांच्या साहाय्याने नारायणरावांस ठार मारून पेशवेपद स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना राज्यात विरोध असल्याने नारायणरावांचे सुपुत्र सवाई माधवराव पेशवे यांस वयाच्या ४० व्या दिवशी पेशवेपदाची वस्त्रे देण्यात आली. सवाई माधवरावांच्या नावाने बारभाईंनी (नाना फडणीस, हरिपंत फडके, सखरामबापू बोकील, त्रंबकराव पेठे, मोरोबा फडणीस, बापूजी नाईक, मालोजी घोरपडे, भवानराव प्रतिनिधी, रास्ते, पटवर्धन, महादजी शिंदे, तुकोजी होळकर) कारभार पाहण्यास सुरुवात केली. नाना फडणीसांनी दक्षिण तर महादजींनी उत्तर सांभाळण्याचे ठरले परंतु १७९३ मध्ये शिंदे निधन पावले. १७९५ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांनी शनिवारवाड्यात आत्महत्या केली. त्यामुळे रघुनाथराव पेशव्यांचे पुत्र दुसरे बाजीराव पेशवे १७९६ मध्ये पेशवे झाले ते १८१८ पर्यंत. २२ वर्षे पेशवेपद त्यांच्यापूर्वी कोणालाच मिळले नव्हते. १८०० मध्ये नाना फडणीसांचा मृत्यू झाला. शिंदे व होळकर यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष सुरू झाला. १८०२ मध्ये दुसरे बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांबरोबर करार करून तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली.

इंग्रज-मराठे यांच्यात ३ युद्धे झाली, परंतु मराठ्यांच्या सत्तेचा नाश इंग्रजांनी घडवून आणला. मराठे हरले कारण ते प्रगत व विकसित होत चाललेल्या भौतिक संस्कृतीच्या प्रतिनिधींबरोबर १६-१७ व्या शतकात रेंगाळणार्‍या मनोवृत्तीने लढत होते. इंग्रज तोफा, बंदुका घेऊन लढत होते, तर मराठे ढाल-तलवार, भाले घेऊन लढत होते. इंग्रजांना औद्योगिक क्रांतीचे साहाय्य झाले. ‘ज्याचे हत्यार श्रेष्ठ, त्याची संस्कृती श्रेष्ठ’ हे मराठे विसरले. देशाभिमानाचा अभाव, ना धड उत्तर ताब्यात ना दक्षिण, प्रगत दळणवळण व्यवस्थेचा अभाव, सैन्यात शिस्त नाही, दिल्लीच्या गादीवर बसण्याची कुवत असूनही न दाखविलेली धमक, कार्यक्षम हेर यंत्रणेचा अभाव, कायमस्वरूपी कर्जे अशा अनेक कारणांमुळे मराठ्यांचा पराभव झाला. लुटालुटीने फार तर वेळा भागविल्या जातात, कायमची सोय होत नाही याचा मराठ्यांना विसर पडला म्हणून मराठे हरले. मराठ्यांनी केलेल्या चुकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना अंतिमत: पराभव स्वीकारावा लागला.

छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई



छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजारामांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी झाला. १२ फेब्रुवारी, १६८९ रोजी ते मराठी राज्याचे छत्रपती झाले. ते रायगड किल्ल्यात मुक्कामी असताना औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने गडाला वेढा दिला. गडावर छत्रपती राजारामांव्यतिरिक्त, छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू राजे व त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई होत्या. त्यामुळे सगळेच सापडले, तर स्वराज्य संकटात येईल म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करवून घेऊन कर्नाटकातील जिंजीस जावे असे ठरले. त्यानुसार महाराज जिंजीला गेले तर झुल्फिकारखानाने राजघराण्यातील अन्य मंडळींना कैद करून औरंगजेबाकडे पाठवून दिले. आता महाराष्ट्र आणि जिंजी येथे एक असमान लढा सुरू झाला. औरंगजेबाचे अफाट सैन्य विरुद्ध छत्रपती राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, प्रल्हाद निराजी प्रतिनिधी, हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर (हुकुमतपन्हा याचा अर्थ राज्याचा आधार) यांनी महाराष्ट्र लढत ठेवला. जिंजीच्या किल्ल्यात छत्रपती राजाराम महाराज असताना झुल्फिकारखानाने त्या किल्ल्याला वेढा दिला. पुन्हा एकदा त्या किल्ल्यातूनही स्वत:ची सुटका करून घेऊन  महाराज महाराष्ट्रात परतले. या सगळ्या कालखंडात औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण युद्ध जिंकू शकत नव्हता. अशा धामधुमीच्या प्रसंगात छत्रपती राजाराम महाराजांचे दिनांक ३ मार्च, १७०० रोजी निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते.  आता मराठी राज्याची अवस्था विचित्र झाली. छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू राजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची असा पश्न निर्माण झाला. या वेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. औरंगजेबाच्या प्रत्येक कृतीस महाराणी ताराबाईंनी प्रतिउत्तर दिले. महाराष्ट्रात मुघलांच्या विरुद्ध एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढा सुरू केला. औरंगजेब समोरासमोरच्या लढाईत मराठ्यांचे किल्ले घेऊ शकत नव्हता म्हणून त्याने पैसे देऊन किल्ले घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ९० वर्षांचे आयुष्य जगलेला हा मुघल सम्राट अत्यंत निराश अवस्थेत दिनांक २० फेब्रुवारी, १७०७ रोजी मरण पावला. रणांगणात मृत्यू आलेला हा एकमेव मुघल सम्राट!
कवी गोविंद यांनी महाराणी ताराबाईंच्या पराक‘माचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
‘‘दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळा।।’’

सर्वसामान्यांतून उभे राहिलेले असामान्य नेतृत्व, गनिमी कावा, साधेपणा, सरंजामशाहीचे पुनरुज्जीवन यांच्या जोरावर मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत केले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठी राज्यात फूट पाडण्यासाठी औरंगजेबाचा मुलगा आज्जमशाहने मुघलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंची ८ मे, १७०७ रोजी सुटका केली. शाहूराजे स्वराज्यात दाखल होताच अनेक मराठे सरदार त्यांना येऊन मिळाले. परंतु महाराणी ताराबाईंनी शाहूराजांचा सिंहासनावरील हक्क अमान्य केला. खेडच्या लढाईत महाराणी ताराबाईंचा पराभव करून शाहू राजांनी दिनांक १२ जानेवारी, १७०८ रोजी सातारा येथे स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला.

महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे

छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांचा जन्म दिनांक १४ मे, १६५७ रोजी पुरंदरवर झाला. त्यांच्या मातोश्री सईबाईंचे अकाली निधन झाल्याने आजी जिजाऊसाहेबांनी त्यांस वाढविले. आग्रा प्रकरणात संभाजीराजे शिवाजी महाराजांबरोबर होते. शिवराज्याभिषेकप्रसंगी संभाजी राजांस युवराजपदाचा मान देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे छत्रपती झाले. त्यांना आयुष्यात एकाच वेळी अनेक शत्रूंचा सामना करावा लागला. मुघल सम्राट औरंगजेबाचा पुत्र अकबर मराठ्यांकडे सहकार्याच्या अपेक्षेने बंड करून आला असता महाराजांनी त्यास मदत केली. आपल्या तलवारीचे पाणी त्यांनी सिद्दी, पोर्तुगीज, आदिलशहा, मुघल यांना पाजले. मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब स्वत: दक्षिणेत उतरला. त्याने आदिलशाही-कुतुबशाही नष्ट केली. संपूर्ण भारतात त्याला आता एकच शत्रू उरला होता, तो म्हणजे मराठे! औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने दिनांक १ फेब्रुवारी, १६८९ रोजी संगमेश्र्वर मुक्कामी छत्रपती संभाजी राजांस पकडले. छत्रपती संभाजीराजे आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. आग्रा येथून सुटका करून घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबास डोईजड झाले होते. त्याप्रमाणेच,  मागील इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नको व अन्य दोन शाहींप्रमाणेच  मराठ्यांचाही नाश करावा म्हणून औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांस ठार मारले. छत्रपती संभाजीराजांस हालहाल करून ठार मारले, ही बातमी कळताच मराठे राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले आणि त्यांनी अविरत संघर्ष सुरू केला.

शिवाजीराजे व मुघल


शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले. 

यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला.  दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.

स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज



बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.

दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली. 
प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)

आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड  बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.

मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा


मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा 
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा


राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा 
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा 
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा 
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी, 
वैभवासि, वैराग्यासी 
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा 
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥ 

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची 
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची 
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥


* कवी -गोविंदाग्रज * संगीतकार - वसंत देसाई  * मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह

शौर्याची तव परंपरा! महाराष्ट्रा वळुनि बघ जरा



शौर्याची तव परंपरा! महाराष्ट्रा वळुनि बघ जरा
शिवबाच्या कीर्तीचे झडति चौघडे
गडकिल्ले अजुनीही गाति पवाडे
दरि खोरे वीरकथा सांगे पठारा॥

सिंहगडीं अमरपदीं ताना पहुडला
अन्याया तुडवित संताजि दौडला
आंग्रयांनी जागविले अरबी सागरा ॥

चांदबिबी, लक्ष्मीनें खड्‌ग पेललें
तात्यानें समरावर वार झेलले
उमाजीनें डोंगरांत केला पुकारा ॥

वासुदेव ङ्गडक्यांना ङ्गांस
लोकमान्य टिळकांचे सिंह गर्जले
सत्यास्तव ज्योतिबांनी केले संगरा ॥

परशराम, बाबु गेनू, वीर कोतवाल
छातीवर गोळी झेली हसत बिंदुबाळ
बेचाळीस क्रांतीचा शूर सातारा ॥

लाखोंनी देशास्तव अर्पियले प्राण
गाति कोयना, कृष्णा त्यांचें कीर्तिगान
सह्याद्री अभिमानें ङ्गुलवि पिसारा ॥


 - द. ना. गव्हाणकर

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।



जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा । 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी 
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंव्ह गर्जतो, शिव शंभू राजा 
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दरिद्र्याच्या उन्हात शिजला 
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।



* कवी - राजा बढे       * संगीतकार - श्रीनिवास खळे        
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह


वाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही, लढण्याचा मोह आवरत नाही,


वाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही,
लढण्याचा मोह आवरत नाही,
जर औकातीवर उतरलो तर
मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही..
थाटला आम्ही अवघ्या महाराष्ट्राचा संसार,
घेऊन पदरी माँ साहेब जिजाऊंचे संस्कार ,
आम्हीच लाविले भगवे झेंडे अटकेपार,
तळपली शिवछत्रपतिंची भवानि तलवार..
या मातिची तहान आम्ही रक्ताने भागविली,
गुलामगीरीच्या काळजात ज्योत
स्वातंत्र्याची जागविली,
पेटविली रणांगने देह झिजविला मातिसाठी
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी..

| जय भवानी जय जिजाऊ | जय शिवराय |