मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

थोडस माझ्याबद्दल…


जय शिवराय , मराठ्यांनो,
    मित्रांनो, नमस्कार… म्हणण्यापेक्षा  मला "जय शिवराय" म्हणायला आवडत. आणि यातच माझी ओळख आहे. 
मी स्वताला शिवभक्त समजतो. पण काहींना मी तसा वाटत नाही.  काही जण नाव ठेवतात, काही जण हसतात, मला कामधंदे नसलेला माणूस म्हणत्तात. . (टोमणे मारणार्याना मी बायली चाळे करणारे समजतो)
मला पहायचं असेल तर खालील ब्लॉगवर पहा… 
जमेल तेव्हढी मेहनत घेतलीय… तुम्हाला आवडेल कि नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून… 
मित्रांनो जमेल तेवढी शिवरायांची महती शेअर करा… इतरांना पाठवा… 
शिवराय घरा घरात पोहोचावे अस मला वाटत… 
अहो, 
घराघरात का?… माझ्या राजांचा पराक्रम, त्याचं शौर्य, त्यांची नीती, आचार, विचार आईच्या गर्भा पर्यंत पोहचले पाहिजेत… 
तुम्ही पोहचवल ना…. !! 
   
हे माझे ब्लॉग… अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालेले आहेत 



आणि हा एक छंद म्हणून बनवलेला… विरंगुळा म्हणून लिहिलेला… 
हिंदी ब्लॉग 



मित्रांनो, 
लोकं आणि माझ्यात फरक ईतकाचं लोकं आयुष्यभर कोणी आपलं आहे का? 
   याचा शोध घेतात मी आपल्या लोकांत क्षणा क्षणात असलेले रम्य जीवन जगतो ...!!!

मला मराठी पिक्चर्स बघायला अवडतात.... 
खास करुन जर पिक्चर्स लक्ष्याचे आणि अशोक सराफचे असतील तर..... लईऽऽऽच भारी... 
अजय अतुल यांची गाणी मला नाचायला भाग पाडतात. अशी ही बनवा बनवी हा मझा all time fav आहे.......
मला जोक्स सांगयाला आणि ऎकयला खूप आवडतात. मुखतः आचरट आणी वातरट असतील तर मज्जाच..
माझे सगळ्यात जवळचे मित्र जयदास घाग, किशोर मोरे, सचिन मोरे आणि सचिन सावंत खुप चांगले आणि जिवलग मित्र आहेत. आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे मित्रमराठी परिवार.
मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीय आहे. मराठी बद्दल गर्व नाही माज आहे.
असा माझा स्वभाव

"चुकेल त्याला सत्याची वाट दाखवु , नडेल त्याला मराठ्याची जात दाखवु...."
जय हिंद, जय महाराष्ट्र...

मी तसा शांत स्वभावाचा आहे पण मित्रांमध्ये मला दंगा, मस्ती करायला आवडत. 
माझ ज्यांच्याशी पटत अशांशीच मी बोलतो त्यामुळे काही जणांना मी शिष्ठ हि वाटतो पण मी तसा नाहीये. 
मला जास्तीत जास्त वेळ मित्रांबरोबर घालवायला आवडतो. माझे मित्र हे माझ्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. 
मला स्वार्थी लोक अजिबात आवडत नाहीत शक्यतो मी त्यांच्यापासून चार हात लांबच असतो. 
मी वेळ काटेकोर पणे पाळतो आणि ती इतरांनीही पाळावा अशी माझी इच्छा असते.
मला नवीन नवीन मित्र, मैत्रिणी करायला आवडतात त्याचबरोबर जुन्या मित्र, मैत्रिणी न मी विसरत नाही. 
मला कविता करायला आवडता आणि बर्यापैक्की जमतातही. दुसर्र्यांना हसवण्यातच मला जास्त आनंद मिळतो. 
मला क्रिकेट खेळायला आणि बघायला आवडते आणि त्याचबरोबर कविता करायचाही विशेष रस आहेच.
 मला फिरायला आवडते आणि त्यात पावसाळ्यात तर अजूनच आवडते.
सचिन तेंडूलकर, सलमान खान, सिर्द्धाथ जाधव हे माझे आदर्श आहेत 
त्यापैक्की सलमान आणि सिर्द्धाथ जाधवला दोन-तीनदा भेटलोय पण सचिनला एकदातरी भेटावे 
अशी माझी मनापासून इच्छा आहे.
आयुष्यात अजून खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत 
आणि माझ्या क्षेत्रात मला काहीतरी स्पेशल बनायचे आहे......
मी मराठी
छ. शिवाजीराजे मराठी
शंभुराजे मराठी
सावरकर, टिळक मराठी
माझ रक्त मराठी..
माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती,
फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी.....
माझे शब्द, मराठी......
माझ्या कविता मराठी......
कारण.
मी मराठी…
या दोन शब्दात माझी ओळख आहे..
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे
जय महाराष्ट्र....
करा कष्ट......
व्हा श्रेष्ठ......
♥ मी मराठी..!! फक्त मराठीच..!!

Employment
  • रिकाम टेकडा :- कामधंदा काहीच करत नाही.. मुळात आवडतच नाही... गुलामी रक्तातच नाही ना..!! तुमच्यासारखी.... [आजचा छावा.. उद्याचा वाघ..]
    [रिकाम टेकडा]

    Education
  • लिहिता वाचता येण्यापुरतच... शिकलोय.. शिकून कोण मोठ झालंय?....... तरीही कसातरी ढकलत ढकलत चार पुस्तकं शिकलोच..
Places lived
Map of the places this user has lived
  • मुंबई

No comments:

Post a Comment