मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Friday 4 July 2014

आज आषाढ शुक्ल अष्टमी , शालिवाहन शक १९३४ (शिवशक ३४१) !!! जागतिक महाशुद्धीकरण दिवस!!! याच दिवशी, शालिवाहन शके १५९८ ला एका अवलियाने घाट घातलेला- महाशुध्दीकरणाचा!!!

आज आषाढ शुक्ल अष्टमी , शालिवाहन शक १९३४ (शिवशक ३४१) !!! जागतिक महाशुद्धीकरण दिवस!!!
याच दिवशी, शालिवाहन शके १५९८ ला  एका अवलियाने घाट घातलेला- महाशुध्दीकरणाचा!!!

नेतोजी पालकर  (नेताजी नव्हे) हे नाव ठाऊक नाही असा मराठी माणुस नाही! जन्मगांव शिरूर ते पार काबुल कंदहार पर्यंत अतुलनीय शौर्य गाजवून आलेला हा महापराक्रमी योद्धा! किती पराक्रमी? की याला प्रतिशिवाजी असे नाव पडावे!!!
पण आपल्याला नेतोजी प्रकरण नीट समजलेच नाही की काय असे कधी कधी वाटते! नेतोजींचा पराक्रम एकवेळ बाजूला ठेऊया. परंतु या प्रकरणात शिवराय कसे वागले? हे अपार महत्वाचे आहे!!!

नेतोजीचा महंमद कुलीखान केला गेला व  तब्बल ९ वर्षे त्यांना इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे वागवले गेले, नाचवले गेले, दमविले गेले तरीही महाराजांनी त्यांच्यातली आशा सोडून दिली नाही!!!
जेंव्हा औरंग्याचा विश्वास संपादन करून अल्लाचा हा नेक (?) बंदा दक्खनला मोहीमेवर आला तेंव्हा शिवरायांनी नेमकी संधी साधून त्यास बोलाविले व तत्काळ हिंदू करून घेतले!! तोच हा दिवस!!!
तोवर असे शुद्धीकरणाचे विधीच कुणी हिंदू धर्मात करीत नव्हते! त्या प्रथेचे महाराजांनी पुनरुज्जीवन केले! समाजाला एक नवीच चेतना दिली, की अरे आपल्यासाठी जुन्या घराची दारे अजून उघडी आहेत!

सनीतन्यांना महाराजांनी त्याकाळी नक्कीच प्रबोधित तरी केले असेल किंवा गप्प तरी! धर्म महत्वाचा! स्वधर्म महत्वाचा!!!
"स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह:।"
या भगवद्गीतेतील वाक्याचा जिवंत नमुना म्हणजे नेतोजी प्रकरण व त्यात शिवरायांनी जातीने दाखविलेले स्वारस्य!! राजाच पुढाकार घेतो आहे हे कळाल्यावर त्या कळात अशी अनेक शुद्धीकरणे नक्की झाली असतील!!!

शिवराय जर सर्व धर्म समभाव मानत असते तर त्यांनी नेतोजीस महंमद कुली खान म्हणूनच स्वीकारला असता ना! कशाला हा खटाटोप केला असता? पण आज आपल्याला महाराजांहून अधिक अक्कल आली आहे अशा आविर्भावात महाराजांना सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष दाखविण्याचा आटापिटा काही लोक करताना दिसतात, त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीव करावीशी वाटते!
साधे गणित आहे! सर्वधर्म समान असते तर एकच धर्म अस्तित्वात असता ना! काहीतरी भेद आहेत म्हणुन तर इतके धर्म आहेत!
असो,

तात्पर्य: शिवरायांच्या माणसासाठी नेतोजी हा नेतोजीच! महंमद कुलीखान चालणार नाही! महाराजांनाही चालला नाही, आम्हालाही चालणार नाही.

No comments:

Post a Comment