ही अशी उडी बघताना ।
कर्तव्य मृत्यू विसरला ॥
बुरुजावर फडफडलेला ।
झाशीतील घोडा हसला॥ १॥
वासुदेव बळवंतांच्या ।
कंठात हर्ष गदगदला ॥
क्रांतीच्या केतूवरला ।
अस्मान कडाडून गेला ॥ २ ॥
दुनियेत फक्त आहेत ।
विख्यात बहाद्दर दोन ॥
जे गेले आईकरिता ।
सागरास पालांडुन ॥ ३ ॥
हनुमंतानंतर आहे ।
या विनायकाचा मान ॥
लावुनिया प्राण पणाला ।
अस्मान कडाडून गेला ॥ ४॥
८ जुलै - त्रिखंडात गाजलेली स्वा. विर सावरकरांची मार्सेलिसची उडीः अर्थातच साहसदिन :
स्वातंत्र्य विर सावरकरांना विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment