मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Friday 4 July 2014

मर्दाची तुटली बघारं ढाल | रक्तानं शरीर झालं लाल ||

मर्दाची तुटली बघारं ढाल |
रक्तानं शरीर झालं लाल ||
हाताला गुंडाळितो शाल |
झेलितो वार, वार बघा तलवार ||

किल्ला हा कोंढाणा श्रेष्ठ |
रक्षक उदयभान दुष्ट ||
करतो अबलांना भ्रष्ट |
तयाला करावया नष्ट ||
निघाला तान्हा हा झुंजार |
झेलितो वार वार बघा तलवार ||

मराठे मोगलास भिडले |
कैक चे धडशिर उड़ले ||
कैक ते धरणीवर पडले |
कैक ते दबा धरून बसले ||
गातो थोडासा आधार |
झेलितो वर वार बघा तलवार ||

बघा त्या कोंढाण्यावरती |
रक्तानं लाल झाली धरती ||
मराठे मागे ना फिरती |
वर्णु मी काय त्यांची किर्ती ||
शोधीतो थोडासा आधार |
झेलितो वार वार बघा तलवार ||

शिवबा म्हणे सिंह गेला |
अवघा महाराष्ट्र रडला ||
तुकड्या पुढे हेच गाणार |
झेलितो वार वार बघा तलवार ||

- अनामिक 

No comments:

Post a Comment