मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Tuesday 8 July 2014

अंभगाचा जिव्हाळा तु.... डोंगर माथ्याचा पन्हाळा तु.... जागतीक किर्तिचा धुरंदर तु.... प्रौढप्रताप पुरंदर तु....

��॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥��

मंदिराचा कळस तु.....
अंगनातील तुळस तु.....
ग्रिष्मात फुललेला पळस तु.....
शिवशाहीची ओळख तु.....
गारव्याची झुळुक तु.....
मराठी मुलुख तु.....
अंतरीचे बोल तु.....
कष्टाच मोल तु.....
मैदानी तोफ तु.....
क्रांतीच रोप तु.....
दरावाजा बुलंद तु.....
गुलामगीरीला पायबंद तु.....
फौलादी साखळदंड तु.....
मोगला विरुध्द बंडतु.....
हिमालयाहुन उंच तु.....
निष्ठावानांचा संच तु.....
भगवा यलगार तु.....
स्वातंत्र्याचा दरबार तु.....
हिंदुस्थानाचा प्राण तु....
भगव्याची शान तु....
महाराष्ट्राचा पहिला मान तु....
या मातीची आण तु....
वाघाची गर्जना तु....
गाईच दुध तु....
मकरांदाचा मध तु....
डफावरची थाप तु....
चांदण्याचे मोजमाप तु....
अठवणीचा बांध तु....
टाळ चिपळ्यांचा नांद तु....
मराठीच दैवत तु....
दौलतीचा नौबत तु....
सळसळनारा वारा तु....
सागराचा किनारा तु....
चंदनाची शितलता तु....
शिल्पकाराची कुशलता तु....
प्रत्येकाचा भविष्यकाळ तु....
विजयाची माळ तु ....
आमच्यावरचे उपकार तु....
वसुधंरेचा सत्कार तु ....
स्वताःच एक चमत्कार तु....
दैवाचा साक्षात्कार तु .....
सावली घनदाट तु ....
मावळ्याची गडवाट तु....
पाखराचे घरटे तु ....
महाराष्ट्राचे मराठे तु....
वासराची गाय तु ....
अनाथांची माय तु ....
छातीची कमान तु....
मातीची तहाण तु....
मराठ्यांचा उध्दार तु....
जगाचे प्रवेशव्दार तु....
स्वराज्याची मुहुर्त मेढ तु....
मानबिंदु रायगड तु....
दौलतीचा धुरकरी तु....
जन्मताच शिवनेरी तु....
अंभगाचा जिव्हाळा तु....
डोंगर माथ्याचा पन्हाळा तु....
जागतीक किर्तिचा धुरंदर तु....
प्रौढप्रताप पुरंदर तु....
सत्सगांचा मार्ग तु....
विजय सिंधुदुर्ग तु...
विशालगडाचा बुरुज तु....
गरजुची गरज तु....
संस्काराचा धडा तु....
सह्यान्द्रिचा कडा तु....
कर्तुत्वाचा धनी तु....
सागराच पाणी तु....
पंढरीचा संत तु....
विशाल आसमंत तु....
पाठीवरची ढाल तु....
अजिंक्य तलवर तु....
समर्थक खंदा तु....
लाखाचा पोशिंदा तु....
रणमर्द मराठा तु....
अठवणीचा साठा तु....
गनिमी काव्यात माहिर तु....
शब्दांचा शाहिर तु....
मांगल्याची स्वप्नंपुर्ति तु....
देव्हाऱ्यातील मुर्ति तु....
बहरलेला माळ तु....
दाटलेल आभाळ तु....
वादळाचे तुफाण तु....
समुद्राचे उफान तु....
झाडांची हिरवळ तु....
सुंगधाची दरवळ तु....
आन्यायावीरुध्द आग तु....
जातिवंत वाघ तु....
संकटात बळ देनारा भास तु....
जगात एकमेव खरा ईतिहास तु....
धमन्यातल रक्त तु....
दिल्लीच तख्त तु....
यशकिर्तिचा भक्त तु....
राजा एकटा फक्त तु....
राजाधिराज तु....
पहिला युवराज तु....
श्रीमंत श्री श्रीमान योगी तु....
सर्व सुखाचा त्यागी तु....
भुपती तु....
जलपती तु....
गढपती तु....
गजपती तु....
अश्वपती तु....
रयतेचा प्रजापती तु....
"राजा शिवछत्रपती" तु....
"राजा शिवछत्रपती"तु....

!!"जय जिजाऊ"जय शिवराय"!!

No comments:

Post a Comment