
छातित उसळे दर्या शिवभक्तिचा..
थरथर कापे गनिम असा जरब शिवशक्तिचा..
गर्जे हर हर महादेव गर्जना..
जोश नभाचा चढे रणांगना..
छातित उसळे दर्या शिवभक्तिचा..
थरथर कापे गनिम असा जरब शिवशक्तिचा..
जातिशी कुणाच्या द्वेश नव्हता..
सत्तेसाठी माजलेला तो आवेश नव्हता..
गगनभेदी रन किलकाऱ्या तोफांना फुटे घाम..
रणांगनात मावळे उधळी विजयी रंग..
नाचे तलवारी हातात होई दंग..
पेटती रणांगने आम्हा पुढे येती शरण..
लढला मराठा त्वेशाने आले जरी मरण..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे
- अनामिक
No comments:
Post a Comment