वाघाला जो हरवतो,
अन शत्रूलाही रडवतो,
तो फक्त मराठाच .
अपमानही जो रिचवतो,
अन हलाहलही पचवतो,
तो फक्त मराठाच .
... कोणासही ना जो दुखवितो,
अन बाग मैत्रीची फुलवतो,
तो फक्त मराठाच .
अपार कष्ट जो सोसतो,
अन प्रेम... जगी वाटतो,
तो फक्त . मराठाच ,
वचनाची लाज जो राखतो,
अन दिल्या शब्दास जगतो.
तो फक्त .मराठाच ,
पर्वतालाही जो हरवतो,
अन आकाशाला नमवतो,
तो फक्त मराठाच
मराठाच ......
No comments:
Post a Comment