मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Tuesday, 19 February 2013

शिवजन्माची पहाट





सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत

शिवनेरीवर भगवाही होता खेळत ,

येणार्‍या नव्या पर्वाची लागली होती चाहूल

शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाउल …


मराठ्यांचा प्रत्येक आश्रू

जिजाउन साठवला होता ,

आई भवानीस तेच आश्रू देऊन

पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता …


मंदिर थराराली , शिवनेरीची तोफ कडाडली

वार्‍याची कोवळी झुळुक दर्‍या खोर्‍यात दरवळली ,

जिजाउपोटी मराठ्यांचा राजा अवतरला

सांगत मुकी पाखरही किलबीलली ….


नगारा वाजला ,शाहिरी साज चढला

डंका डोंगरा आड सांगत सुटला ,

आता सह्याद्रीवर भगवा फडकनार

मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार ….


इतिहासच पाहील पान

शिवजन्मान लिहाल गेल होत ,

हिरव्या दगडावर आता भगवे रक्त

स्वराज्याचा इतिहास कोरत होत!


                          - श्याम वाढेकर


No comments:

Post a Comment