राजे ज्या पन्हाळ्यावर तुम्ही शिताफीने चकमा दिलात सिद्धीला,
त्याच पन्हाळ्यावरच्या पंचतारांकीत हॉटेल मधे आज तुमचेच मावळे नाचवतायत, नागवतायत, नासवतायत, कल्याण्च्या सुभेदारांच्या सुना
राज रोस….. राजे आता इथे अत्याचाराबद्दल केले जात नाहीत हात कलम उलट केले जातात
आणखी बळकट आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या कोटांचे प्रपंच चालवीण्यासाठी.
राजे आता तानाजी, बाजी आणि मुरारबाजी सुद्धा बोलू लाजलेत फितुरांच्या भाषा.
आणि आपल्याच डोळ्यादेखत आपल्याच बायकापोरांची कत्तल होत आसताना बदलत नाहीत त्यंच्या कपाळावरील रेषा……..
राजे तुमची आठवण येते कधीतरी सरकारी कचेरीतील तुमच्या तसवीरीकडे बघून…..
आणि मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचे पण घालतो वाद तुमचा जन्मसाल 1627 का 1630.
राजे या महाराष्ट्रात तुम्ही अलीकडे तीन तीनदा जन्माला येता नशीब तुम्ही जन्माला आला होता का नव्हता याच्यावर अजून वाद नाही सुरू झाला….. राजे तुम्ही गरजला होता मराठा तितूका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा…..
आता आम्ही गरजत असतो मराठा तितूका खेळवावा महाराष्ट्र धर्म बुडवावा…..
राजे तुमची ईच्छा होती हे राज्य व्हावे ही श्रीं ची ईच्छा आणी आता आम्ही गरजत असतो हे राज्या नष्ट व्हावे ही श्रीं ची ईच्छा…..
आणि अशावेळी वाटत राजे तुम्ही आसायला हवे होतात…. पण पुन्हा वाटत राजे तुम्ही नाही आहात तेच बरय…..
कारण तुम्ही असता तर पुन्हा स्वराज्याच्या मार्गी लागला असाता, पुन्हा गड किल्ले घेण्याच्या मागे लागला आसता.
पण आता गड किल्ले घेउन उपयोग नाही त्यासाठी तुम्हला एखादा सुरक्षीत मतदार संघ शोधावा लागला असता.
आणि आता मतदार संघ सुरक्षीत राहीलेत कुठे? त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर झोकावे लागले असते………
आणी राजे आग्य्राच्या भेटीत मागच्या रांगेत उभे केल म्हणून बाणेदार पणे दरबार त्यागणारे तुम्ही श्रेष्ठींच्या पायावर झुकाल कसे?
अरे महाराष्ट्राचा स्वाभीमान पुन्हा उभाळेल आनि म्हणाल अरे नसेल पक्ष नसुदे अपक्ष म्हणून उभा राहीन……….
अरे माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसली?????
पण राजे हे तानाजी बाजी मुरारबाजी तरी आता पहील्यासारखे राहीलेत कुठे????? आत्ताचे आमचे कर्यकर्तेच वेगळे………
सकाळी एकाकडे, दुपारी दुसर्यासकडे, संध्याकाळी जेवणावळीला तिसर्या्कडे आणि दुसर्यातदिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी अर्ज असतो
राजे….. तुम्ही म्हणाल नसेल तानाजी बाजी मुरारबाजी पण एखादा तानाजी तरी भेटेल जरूर माला,
पण राजे भेटेल तानाजी, तुम्ही संगाल त्याला जा कोंढाणा घेउन ये आणि विचारेल तानाजी पहील्यांदा पगार किती देणार,
महागाई भत्ता आहे काय? आणि एवढ सगळ होउन झालाच तानाजी तयार निघाला कोंढाणा घ्यायला……
पण हल्लीच युग मोबाईल युग आहे राजे, तानाजी कोंढाण्यावर लढत असेल आणि खालून कोणीतरी फोन करेल……
“ अरे काय तानाजी काय चाललय ओव्हरटाईम करतोस का काय लेका? ईथे सगळे गरमागरम शिजून तयार आहे तुझ आपल लढायच चललय….
तु लढून तुला काय मिळणार? किल्ला मिळणार राज्यांन, तु का मरतो फुका ये खाली ढाब्यावर पार्टी करू”
आणि मग तुम्ही म्हणाल राजे नसतील तानाजी नसुदे, नसतील लोक नसुदे…….
लढू रयतेसाठी झगडू जनतेसाठी करू यालोकांसाठी पण राजे ती रयत तरी त्या लायकीची राहीली कुठे???????
पैसे घेउन देह विकणारी बाई आणि पैसे घेउन मते देणारी जनता यात तरी आता फरक राहीलाय कुठ?????
म्हणून म्हंटले राजे तुम्ही नाही आहात तेच बरय…..
पण वातलच तुम्हाला याव एकदा तर एक करा……
येताना एकटे येउ नका……..
सोबत मॉसाहेब जिजाऊंना देखील घेउन या……..
कारण जोपर्यंत जिजाउ जन्माला येत नाही तो पर्यंत शिवाजी जन्माला येत नाही राजे……..
विश्वाचे राजे…. तुम्हाला एकाच नावापुरते/जातीपुरते/धर्मापुरते मर्यादित करू पाहणाऱ्या आम्हाला पाहायला ?
… आज आम्ही जे आपापसात तुमच्या इतिहासावरून भांडतो आहोत ते पाहायला ?
भविष्य एकीने घडविण्याऐवजी भूतकाळात कुणी काय केले यातून सकारात्मक
वागण्याऐवजी त्यातल्या चुका काढून त्यावर विचार करत बसलेल्या
आणि कुठंत जगणाऱ्या भेकाडांना पाहायला ?
स्वराज्यात पडत चाललेली फुट पाहायला ?
जाती-जातीमधील वाढत चाललेली दुरी पाहायला ?
भ्रष्टाचाराने बरबटलेला समाज पाहायला ?
आप्पलपोटी झालेल्या आम्हा सैतानांना बघायला ?
खुर्चीमध्ये नागासारखे जमून बसलेल्या भ्रष्ट राजकारण्यांना बघायला ?
तुमच्याच जयंतीवरून वाद घालत असलेल्या आम्हा घुबडांना पाहायला ?
तुमच्या गडकोटांवर मदमस्तपणे हुंदाडणाऱ्या माकडांना पाहायला ?
दिवसागणीस आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांना पाहायला ?
स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहूनही गप बसणार्यांना पाहायला ?
तुमच्याच नावावर शिरजोरी करत असलेल्या नराधमांना पाहायला ?
खून-दरोडे-बॉम्बस्फोट-लुटालूट-जाळपोळ-चोऱ्या पाहायला ?
घरात नाही दाना आणि बाजीराव म्हणा म्हणणाऱ्या नालायकांना पाहायला ?
तुम्ही पेटवलेली स्वराज्याची आग विझवून स्वतःचेच बघत असलेल्या आम्हाला पाहायला ?
मावळ्यांचे पाण्यासारखे झालेले आणि थंड पडलेले रक्त पाहायला ?
आणि हे सर्व पाहून तुम्हाला “राजे पुन्हा जन्माला या” म्हणणाऱ्या भेकड मावळ्यांना पाहायला ?
राजे आलात तर भवानी समशेर नक्कीच आणा…………… अशा मुंड्या छाटून टाका.
http://rajeshivchhatrapati.wordpress.com/2013/02/14/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%89-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF/
साभार: नितीन बानगुडे पाटील
-धन्यवाद
गणेश पावले (क्षत्रियकुलावतंस)या येथेही कधीतरी बसून बोलूया..
(क्लिक कराच)
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
!!.मी मराठा. !!_!!.जयोस्तु मराठा.!!
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
जय जीजाऊ _ जय शिवराय _ जय शंभूराजे
जय जीजाऊ _ जय शिवराय _ जय शंभूराजे
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
मराठी ही जगातली १५वी सगळ्यात मोठी बोलीभाषा आहे. जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करा.मी मराठी बोलताच कुणाच्या कपाळावर आठी पड़ता कामा नये आणि जर पडलीच तर त्या आठी बरोबर मुस्काड फोडीन.
No comments:
Post a Comment